देऊळ प्रिमियर

Submitted by मंजूडी on 4 November, 2011 - 05:38

"एका दर्जेदार चित्रनिर्मितीमध्ये माध्यम प्रायोजक म्हणून सहभागी होणं, हे 'मायबोली'साठी अतिशय आनंददायक आणि अभिमानास्पद आहे."

३ नोव्हेंबर, २०११ रोजी झालेल्या 'देऊळ' सिनेमाचा प्रिमियर बघताना याची पुरेपूर प्रचिती आली. अतिशय उत्तमरीत्या निर्माण केलेल्या या चित्रपटाच्या प्रिमियर शोला, अर्थात, 'फर्स्ट डे फर्स्ट शो'ला मायबोली.कॉमचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहण्याची अभिनव संधी आम्हाला दिली याबद्दल मायबोली, अ‍ॅडमिन आणि टीम माध्यम_प्रायोजक यांचे अनेक अनेक आभार!

अश्या प्रकारच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची माझी ही पहिलीच वेळ.. त्यामुळे थोडी धाकधूक मनात होती. दिलेल्या वेळेवर पीव्हीआर सिनेमा, लोअर परळ, स्क्रिन नंबर सात इथे पोचले. तिकिटे ताब्यात घेऊन 'देऊळ' स्पर्धा-खेळ विजेत्या मायबोलीकरांची वाट पाहत बसले. आपापली ऑफिसे संपवून जिप्सी, अश्विनी के, गजानन, साधना, आनंदयात्री हे मायबोलीकर माझ्यासारखेच थोड्या धाकधुकीने, बर्‍याचश्या उत्सुकतेने हजर झाले.

आठ वाजल्यानंतर मराठी चित्रपटसृष्टीतला एकेक तारा यायला सुरूवात झाली. मी आधीच सिनेमा लाऊंजमधे पोचलेली असल्याने परत खाली जाता येत नव्हतं त्यामुळे 'रेड कार्पेट' सोहळा बघता आला नाही. नाना पाटेकर पावणेनऊ वाजता आले, पत्रकारांनी त्यांना घेराव घातला, त्यांचे बाईट्स वगैरे देऊन झाल्यावर प्रिमियर समारंभ सुरू झाला.

चित्रपटाचे निर्माते अभिजीत घोलप यांनी कार्यक्रमाची सुत्रे हातात घेत सिनेमा निर्मितीमागचे पाच खंदे वीर, अर्थात, सिनेमाचे दिग्दर्शक उमेश कुलकर्णी, कथा-पटकथाकार आणि मुख्य अभिनेता गिरीश कुलकर्णी, कार्यकारी निर्माते नितीन वैद्य, प्रसिद्धी प्रमुख समीर जोशी आणि राम कोंडिलकर यांची ओळख उपस्थित प्रेक्षकांना करून दिली.
या चित्रपटाचे संपूर्ण महाराष्ट्रभरात एका दिवशी तब्बल ४०४ खेळ सादर होणार आहेत, यामागे केवळ 'मराठी सिनेमा प्रसिद्ध व्हावा, मोठा व्हावा' हा एकच उद्देश आहे हे त्यांनी मुद्दाम नमूद केले.

सिनेमा सुरू झाल्यावर श्रेयनामावलीत मायबोलीचा लोगो एकदम ठळक, सुस्पष्ट आणि मस्त दिसला आणि अंगावर शब्दश: रोमांच उभं राहिलं.

सगळे कलाकार घरगुती कौतुक समारंभाला यावे तसे अगदी जिव्हाळ्याने आलेले होते. कुठेही 'पेज ३' चमचमाट नव्हता. नीना कुलकर्णी, तुषार दळवी, निखिल (आडनाव आठवत नाही, विनोदी कलाकार आहे, अनेक जाहिरातींमधे असतो), सोनाली कुलकर्णी (एकदम सुंदर, शालीन दिसत होती. तिची साडी एकदम क्लासी होती), संदिप सावंत, सुलभा देशपांडे, दिलीप प्रभावळकर, स्वानंद किरकिरे, प्रतिमा कुलकर्णी, ज्योती सुभाष, अतिशा नाईक, शर्वाणी पिल्ले इत्यादी हजर असलेली, माहीत असलेली आणि सध्या आठवत असलेली नावे...

मध्यंतरात गिरीश कुलकर्णी खूपच गडबडीत होते. पण त्यांना गाठून आम्ही मायबोलीतर्फे आलो आहोत हे सांगितले. तेवढ्या गडबडीतही त्यांनी, 'मायबोलीचे अनेक आभार. तुम्ही खूप छान प्रसिद्धी कँपेन केलीत. तुम्ही संपूर्ण चित्रपट बघा आणि तुमचं खरंखुरं मत नक्की नोंदवा, आमच्यासाठी ते खूपच गरजेचं आहे' हे आवर्जून आम्हाला सांगितले.

एकूणच सोहळा सुरू व्हायला झालेला उशीर आणि घड्याळाचे पुढे धावणारे काटे यांचा विचार करत आम्ही सिनेमा मध्यंतरापर्यंत बघून निघायचे ठरवले. सिनेमा पूर्ण पाहिलेल्या मायबोलीकरांकडून चित्रपटाविषयी वृत्तांत येईलच. आम्हाला 'फर्स्ट डे हाफ शो' बघितल्याची हळहळ आहे, त्याचे प्रायश्चित्त म्हणून सिनेमा पूर्ण पाहिल्यावरच परीक्षण लिहू.

'देऊळ' सिनेमाविषयी मायबोलीवर सादर केलेल्या स्पर्धा-खेळांमुळे, मुलाखतींमुळे तुम्हालाही सगळ्यांना चित्रपट बघण्याची प्रचंड उत्सुकता असेलच, तुमची निराशा होणार नाही एवढी माझ्याकडून खात्री Happy

Groups audience: 

अस्सल ग्रामीण बाज अनुभवायचा असेल तर उमेशचे चित्रपट बघावेत.

'देऊळ'पण त्याला अपवाद नाही.
शहराच्या वासापासून जास्तीत जास्त दूर असलेल्या गावाची निवड, तिथले रंगढंग, तिथली भाषा, तिथले दैनंदिन व्यवहार, राजकारण आणि त्याला यथायोग्य तोलणारे कलाकार. हे सगळे कमालीच्या सहजतेनं गाव उभा करतात. मग एखाद्या गुराख्याने माळावर ठोकलेली मुक्त आरोळी असो की टिव्हीत मुंडके घुसवण्याची सोय असती तर तेही केले असते इतक्या वेड्या नादाने घराघरातून बघितलेल्या टिव्ही शिरियली असोत. (मोतीबिंदूच्या ऑपरेशनानंतरही डोळ्यावर जाड काळा चष्मा लावून पण आमी टिवी बग्तो.) बोलीचालीतले, देहबोलीतले, वेशभूषेतले बारकावे इतक्या सुरेख आणि जसेच्या तसे साकारले आहेत की दिग्दर्शनाला आणि अभिनयाला त्यासाठी खास दाद द्यावीशी वाटते.

नाना पाटेकर-सोनाली कुलकर्णी (कांदाफोडणी LOL!), गिरीश कुलकर्णी, ज्योती सुभाष, मोहन आगाशे मस्तच. अतिशा नाईकने गावची सरपंच भारीच उभी केलीय. गावातली सरपंच अशीच असते!

(एक गोष्ट मात्र - चंद्रप्रकाशात चित्रित केलेल्या प्रसंगांत पडद्यावर येणारे पांढर्‍या रंगातले सबटायटल्स टाळता आले असते तर बरे झाले असते. त्या सुंदर वातावरणात ते रसभंग करतात.)

अन्कॅनी, ह्यो बघ मी काढलेला नानाचा फोटू -
nana.jpg

मस्त वृतांत Happy
मायबोलीसाठी तर हि फक्त सुरवात आहे. पुढेमागे मायबोलीच निर्मिती क्षेत्रात उतरली तर नवल वाटायला नको.>>>>दिनेशदा, +१ Happy

जिप्सी तू फोटो टाकले नाही तर तुला अजिबात माबोवर येऊ देणार नाही>>>>:फिदी: काल रात्री उशीरा जागून फोटो वृतांत लिहिला आणि मगच माबोवर आलो. Happy

हार्दिक अभिनंदन. माझं पण माबो च्या लोगो वर फार प्रेम आहे. मी पाहिला तो आय बी एन लोकमत वरील कार्यक्रम.

Pages