मित्रांनो आणि मैत्रिणिंनो,
मागच्या वर्षी जॉब मार्केट मधे तेजी होती, प्रत्येक महिन्यात कोणत्या न कोणत्या प्लेसमेंट अजेंसी मधुन किंवा कंपनी च्या एच आर डिपार्टमेंट मधुन इंटरव्यु साठी इमेल असायचं, खुपदा असे होतं कि आपण जी नोकरी करत आहोत त्यात आपण समाधानी असतो तरीही आपण नोकरी बदलतो आणि आपली चुक आपल्याला कळेस्तोवर उशीर झालेलं असते, नोकरी बदलताना घ्यायचे काळजी वर आपण आपली मतं मांडुया.
*****************************************************
मुख्य कारण सद्य नोकरीत पगार कमी आहे असे आपल्याला वाटत आहे, वाढीव पगार मिळत आहे म्हणुन डोळे बंद करुन आपण नवीन जॉब ची ऑफर स्वीकारतो, नवीन जॉब मध्ये आपल्या कामाचे स्वरुप काय असणार आहे, हे आपण अपॉईंटमेंट लेटर अॅक्सेप्ट करण्यापुर्वीच इंटरव्यु मधे चर्चा करायला हवं
आपण फार वर्षे एका कंपनीत काम करुन एका साच्या मधे ढळलेले असतो, नवीन कंपनी ची वर्क कल्चर काही लोकांना अडॅप्ट करायला फारच कठीण जातं.
इंडस्ट्री / डोमेन चेंज होत असेल तर नवीन इंडस्ट्री / डोमेन चं ज्ञान असणं फार महत्वाचं असतं.
आपण कुणाला रिपोर्ट करु हे ही फायनल इंटरव्यु मधे जाणुन घ्यायचे, कारण नवीन कंपनीतले जुने लोक बॉसींग साठी सदैव तत्पर असतात.
आपल्या मित्र / मैत्रिणिंकडुन नवीन कंपनी बद्दल माहिती काढावयची, कंपनी पगार वेळेवर देते का, कंपनी ची आर्थीक परिस्थिती चांगली आहे की नाही, खुपदा असे होते कि इंटरव्यु मधे कंपनी बद्द्ल एच आर वाले ह्या सगळ्या गोष्टींची कल्पना देत नाही कारण ते ही मॅनेजमेंट कडुन प्रेशर मधे असतात त्यांना कसे ही करुन कँडीडेट सिलेक्ट करायचे असते. प्रिलीमनरी इंटरव्यु मधे तर आपणच त्यांना विचारायचे कि तुमच्या कंपनी चे एम्प्लॉयी रिटेंशन टक्का काय आहे ते.
नेहमी जॉब साईटस रिफर करत रहायचे, त्यावरुन कळतं कि त्या कंपनी मधे एका प्रकारचे वेकेंसीस साधारण किती वेळा येतात, ह्या वरुन कळतं कि त्या स्पेसिफीक कामा साठी तिथे नेहमीच वेकेंसी आहे म्हणजे काही तरी गौड बंगाल आहे, ह्यावरुन आपण आपल्याला पाहिजे ते पगार ही डिक्टेट करु शकतो.
कित्येकदा असं होतं कि घरा जवळ असलेली नोकरी सोडुन, पगार वाढवुन मिळत आहे म्हणुन आपण सेट झालेलो असताना सुध्दा वाढीव पगार मिळत आहे म्हणुन आपन लांब जातो, ह्यावर ही विचार करावं, कारण नवीन कंपनीत आपल्या ताटात काय वाडुन ठेवलंय ह्याचे आपल्याला कल्पना नसते.
इंटरव्यु मधे पगारा बद्दल मनात काहीही किंतु नाही ठेवावे, खुपदा एच आर वाले आपल्याला आपलं पगार फिरवुन आणि फुगवुन सांगतात, स्पष्टपणे विचारावे "What would be my take home salary if i'm present for the entire month".
लेट सिटींग बद्दल अणि कंपनी टायमिंग बद्दल ही पहिलाच विचारुन घ्यावे, आता एक नवीन ट्रेंड निघालाय, ८/८.३० तासाच्या शिफ्ट ऐवजी ९/९.३० चे शिफ्टस असतात.
- संजीव बुलबुले / १९ ऑक्टोबर २०११
म्हमईकर, छान धागा आहे. अनुभवी
म्हमईकर, छान धागा आहे. अनुभवी लोकांनी मार्गदर्शन करावं. विशेषतः एच.आर. मधे असलेल्यांनी.
नौकरी बदलल्या नंतर काय होईल
नौकरी बदलल्या नंतर काय होईल ही रिस्क तर सगळी कडेच आहे..
विषेशतः प्रायव्हेट सेक्टर मधे..
बर्याचदा नौकरी बदलण्याचे कारण फक्त पगार नसतो , तर प्रोमोशन/ रोल चेंज ह्या career growth साठी आवश्यक असणार्या गोष्टी मिळत नाही.. आणी आपली growth stagnant होते.
तसेच सध्याच्या नौकरी मधे ही काही हित शत्रु असतातच, आणी माबो सारखा कंपु बाजी हा प्रकार पाहायला मिळतोच
एखाद्या कंपनीबद्दल खरी माहिती
एखाद्या कंपनीबद्दल खरी माहिती हवी असेल तर याहू वर तसे ग्रुप्स आहेत. तिथे सोडून गेलेल्या लोकांनी बरीच खरी माहिती लिहिलेली दिसते.
वर्किंग अवर्स बद्दल आता पुर्वीसारखे आरामाचे जॉब्ज राहिलेले नाहीत. १०/१२ तास काम करणे आता तसे नॉर्मलच मानले जाते.
एम्प्लॉयी टर्नओव्हर बद्दल खरी माहिती मिळणे दुरापास्त आहे. लिन्क्ड ऑन सारख्या काही साईट्स आहेत तिथे जाऊन, एखादा अधिकारी तिथे किती काळ आहे ते बघता येते.
निदान आमच्या क्षेत्रात, ऑडीटेड बॅलन्स शीट्स बघितल्यास कंपनीसंबंधी आम्हाला बरेच आडाखे बांधता येतात.
जर सध्याच्या कंपनीत फारसा त्रास होत नसेल (नोन डेव्हील्स) तर परत आल्यावर कितपत स्वागत होईल याचा अंदाज घेऊन ठेवावा. आजकाल परत येणार्या माणसांचे सहसा स्वागतच केले जाते.
सीटीसी चा ब्रेकअप जरुर मागावा, काही महिन्यांनी पगार वाढवून देणार असतील तर तसे लेखी स्वरुपात घ्यावे (पण अनेकदा त्याचा फायदा होत नाही.) एच आर चा दोष नसतो कारण त्यांनाही खरे सांगण्यास मज्जाव असतो.
म्हमईकर, धागा छान आहे, पण
म्हमईकर, धागा छान आहे, पण कृपया शुद्धलेखन तपासून पुन्हा लिहावा.
उदाहरणार्थः- डोळे झापुन , उशीर झालेलं असते वगैरे.....
म्हमईकर, आमचा आता भारतात
म्हमईकर,
आमचा आता भारतात कायमचे परतण्याचा विचार आहे. शक्यतो आरामाचा जॉब मिळत असेल तरच.
आपण म्हणतात आणि इतर ठिकाणी पण वाचले आहे की
१) करियर डेव्हलपमेंट बद्दल विचारावे
२) कंपनीच्या रिटेन्शन रेट बद्दल विचारावे.
३) लेट सिटींग बद्दल अणि कंपनी टायमिंग बद्दल ही पहिलाच विचारुन घ्यावे.
या लेखांमध्ये असे लिहिले असते की HR ला असे प्रश्ण आवडतात कारण त्यामुळे उमेद्वार कसा जागरुक आहे हे कळते पण माझ्या मित्र मैत्रिणिंचे अनुभव असे आहेत की असे प्रश्ण जास्त विचारलेत तर हा माणुस आपल्याला डोइजड तर होणार नाही ना अशा विचाराने कित्येकदा हातची नोकरी जाते.
कधी कधी चांगली ओपनिंग पण गमावली जाउ शकते, शक्यतो मॅनेजमेंट मध्ये.
छान लेख.
छान लेख.
HR ला असे प्रश्ण आवडतात
HR ला असे प्रश्ण आवडतात >>>सॉरी. एचारच्या आवडण्यावर काहीही अवलंबून नसतं!
समोरच्याला आपली गरज किती आहे ह्यावर ठरतं सगळं.
म्हमईकर्,चांगला धागा. तेवढं
म्हमईकर्,चांगला धागा.
तेवढं त्या ''नौकरी''चं,''नोकरी'' असं कराल का प्लीज, ?
आयडू | 19 October, 2011 -
आयडू | 19 October, 2011 - 07:42 नवीन
HR ला असे प्रश्ण आवडतात >>>सॉरी. एचारच्या आवडण्यावर काहीही अवलंबून नसतं!
समोरच्याला आपली गरज किती आहे ह्यावर ठरतं सगळं.
ओके आयडु
समोरचा कोण?
मी आतापर्यंत जे इन्टरव्ह्यु दिलेत किंवा घेतले आहेत यात HR चा रिप्रेझेन्टेटेव्ह पण बरेचदा असतो.
आणि तो नसला तरी माणुस हाताळायला किती सोपा आहे हे समोरचा नेहेमी पहात असतो.
जस्ट माय ओब्झर्व्हेशन.
गरजेच्या बाबतीत म्हणाल तर देअर इस सेइंग
"ग्रेव्हयार्ड आर फुल ऑफ इनडिस्पेन्सेबल पिपल"
तुम्ही आर्थिक बाबतीतले किंवा
तुम्ही आर्थिक बाबतीतले किंवा अडचणीचे बाटू शकतील असे प्रश्न विचारले तर HR ला असे प्रश्न मुळीच चालत नाही, उमेदवार नको तेवढा शहाणा आहे आणि डोईजड होईल असा निष्कर्ष ते काढतात,
थोडक्यात उमेदवार अॅग्रेसिव्ह आहे असा शिक्का ते मारतात, हा स्वानुभव आहे आणि मी स्वत: मुलाखती घेत असतो त्यामुळे ह्या प्रकाराची मला थोडीफार जाण आहे
धन्यवाद मंदार, आवळा, दिनेशदा,
धन्यवाद मंदार, आवळा, दिनेशदा, दैत्य, निलिमा, अश्विनीमामी, आयडु, डॉक आणि प्रफुल्ल.
@ डॉक, आपण सुचवलेली बदल केले आहे.
लेखा मधे पुष्कळ विंग्रजी शब्द आले आहेत आणि शुध्द लेखनाचे ही बोंब आहे, कृपया संभाळुण घेणे.
*****************************************************
अजुन एक मुद्दा उपस्थित करावासा वाटतो, आपण कित्येकदा आपल्या बॉस च्या नावाने शिमगा करत असतो, म्हणुन आपण नोकरी बदल करावयावे ठरवतो, तत्पुर्वी खरंच आपला बॉस तसा आहे का, कि आपणच कामात कमी पडतो ह्याचे प्रांजळ आत्मपरिक्षण करावे. आपण कित्येक वर्षे एका कंपनीत काम करतो, चुका होतात, बॉस संभाळुन घेतो, नवीन नोकरीत संभाळुन घेणारा बॉस मिळेलच असे नाही.
लेखक, I need to talk to u,
लेखक, I need to talk to u, please give me your email id
मुग्धा, तुम्ही मला संपर्कातुन
मुग्धा, तुम्ही मला संपर्कातुन इमेल करु शकता
परदेशी नोकरी जात आहात तर
परदेशी नोकरी जात आहात तर पुर्ण कॉन्ट्रॅक्ट बारकाईने वाचावे.
मी असे पाहिले आहे कि लोकं गल्ले लठ्ठ पगाराच्या आमिषाने परदेशी जातात, पण जेव्हा परदेशात नविन नोकरी वर रुजु होतात आणि पगार होण्यास दर महिन्यात विलंब होते किंवा २-३ महिन्यांनी देतात तेव्हा त्यांचे भ्रम निरास होते.
कॉन्ट्रॅक्ट साईन करताना आवर्जुन आपल्या कडुन एक क्लॉस जरुर टाकावे, पगाराचे तारीख व पगार किती दिवस विलंब होण्या सारखे आहे ते, जर का त्याहुन ही पगार जर विलंब झाले तर मग तुम्ही ते नोकरी सोडु शकता and that would not be treated as breach of contract.
तसेच जर परदेश गेल्यावर तुम्ही शारिरीक / मानसिक दृष्ट्या जर तुम्ही काम करण्यास सश्क्त नसाल तर तुम्ही ते नोकरी सोडु शकता and that would not be treated as breach of contract.
संजीवजी, आपने तो लाखों कि बात
संजीवजी,
आपने तो लाखों कि बात कह दी !
तुम्ही तर या क्षेत्रात पट्टीचे अनुभवी दिसता..