इंग्लंडचा भारत दौरा २०११

Submitted by केदार on 14 October, 2011 - 08:32

आज पहिला सामना आणि तरी क्रिकेट बाफ वर प्रतिक्रिया नाहीत. भारताचा वाईट वॉश झाल्यामुळे असेल. पण घरके मैदानपे हम शेर है असे बरेच लोकं म्हणतात. चला तर मग ... नेहमीसारखेच आपल्या प्रतिक्रिया येऊद्यात.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इंग्लंड २११- ८. ४४ षटकं. खेळपट्टी फिरकी गोलंदाजीला अनुकूल. स्वानपासून सावध रहायला हवं. नवोदित एरॉनला स्लो खेळपट्टी असूनही त्याच्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात एक बळी. या खेळपट्टीवर इंग्लंडचा स्कोअर कमी झाला तरीही भारताला जपून खेळणं आवश्यक.

नव्या पिढीत कोहली आणि रहाणे ची बॅटिंग बघायला मजा येते. रैना पेटला तरच चांगला वाटतो. धोनी पुन्हा जुन्या फॉर्ममधे आला तर प्रेक्षणीय आहेच.

कोहली असाच बाहेर खेळला तर जबरी बॅट्समन मिळेल आपल्याला. काही दिवसांपूर्वीच कोणीतरी जुन्या क्रिकेटर ने तेंडुलकर ची रेकॉर्ड्स मोडण्याची क्षमता फक्त त्याच्यात आहे असे म्हंटले होते. त्याचे वय (२२) पाहता ते शक्य आहे.

जडेजाद्दलही इथल्या चर्चेत खास चांगलं मत व्यक्त झालं नसलं [ व तें समर्थनीयही होतं] तरी तोही एक 'ऑलराऊंडर' म्हणून चांगलीच कामगिरी करायला लागला आहे. एरॉनही चांगलाच वेगवान असूनही 'इरॅटीक' नसून छान 'विकेट टु विकेट ' गोलंदाजी करतो. क्षेत्ररक्षणही आतां जागतिक दर्जाचं वाटायला लागलं आहे. एकंदरीत, आशादायक चित्र दिसतंय .

जडेजा मला अजूनही आवडत नाही. एक दोन मॅच मध्ये चांगली कामगीरी केली असली तरी तो ज्या क्रमांकावर येतो तिथे युवराजसारखा मॅच विनर माणूसच जास्त चांगला आहे. जडेजाने फक्त ह्या दोन मॅचेस मध्ये चांगले प्रदर्शन केले आहे. तो पण मुरली विजय सारखाच धोणीचा आणखी एक पिद्दू आहे.. (त्याबदल्ल काही नाही, पण ह्या लोकांना खूप संधी दिली आहे, हे नाकारता येत नाही.) रहाणे ह्या टीम मध्ये फिट. सचिन, विरू आले तरी त्याला खाली खेळवावे, पण घ्यावेच. कारण त्याचात प्रचंड पोटँशियल आहे.

काही दिवसांपूर्वीच कोणीतरी जुन्या क्रिकेटर ने तेंडुलकर ची रेकॉर्ड्स मोडण्याची क्षमता फक्त त्याच्यात आहे असे म्हंटले होते >> जाँटी र्‍होड्सने म्हटलेय. थोडेसे अतिशोयक्त वाटतेय पण त्याच्या temperament talent बद्दल शंकाच नसावी. लंबे रेस का घोडा है.

जडेजा ह्यावेळी चांगला खेळला हे खरय, consistency दाखवेल का हा प्रश्न आहे. युवराज असेल तर तोच पहिली पसंती असणार हे साहजिकच आहे. जडेजा balling all rounder आहे तर युवराज batsman all rounder.

रहाणेच्या निव्वळ रणाजी रेकॉर्ड्स च्या जोरावर संघात असला पाहिजे. टेस्ट टीममधे रहाणे नि पुजारा दोघांनाही खेळवायला सुरूवात केली तर लवकरच तयार होतील. मागे भाऊ म्हणत होते तसे सचिन, द्रविड नि लक्ष्मण ह्यापैकी rotation basis वर दोघेच ठेवून रहाणे नि पुजाराला कायमस्वरुपी long run stretch द्यायला सुरू करायला हवे.

आजची मॅच सुरू होऊन आता २४ ओव्हर्स झाल्यायेत. भारताला फलंदाजीला आमंत्रीत करून इंग्लंडने चांगली सुरूवात केली आहे. भारताचे ३ गडी बाद झाले आहेत १०७ रन करून.
रहाणे ४२, गंभीर ३८ आणि कोहली ०. रैना ११ आणि मनोज तिवारी १५ वर खेळतायेत.

भारत -२७१. ह्या खेळपट्टीवर चांगलाच स्कोअर. धोनीला सलाम. अ‍ॅरोनकडून भरीव कामगिरी अपेक्षित.
इंग्लंडला हा शेवटचा सामना तरी जिंकणं 'इज्जतका सवाल' !!

धोनी मस्त खेळला. पिच स्लो वाटले, कमी बाउन्स पण स्विंग मिळत होता ब्रेस्नन ला. फिन ची बोलिंग पाहिली नाही.

उदास इडन गार्डन्स पाहायला वाईट वाटते. २००१ चे टेस्ट मॅच ला प्रचंड भरलेले स्टेडिअम आठवते सारखे.

धोनी चा हनिमून संपला. बायको आता सकाळी 'अहो उठा, दूध नाही का आणायचे? नि मी आज एक दोन ड्रेसेस घेऊन येणार आहे, पैसे ठेवा माझ्यासाठी' असे म्हणायला लागली तेंव्हा आता नोकरी टिकवलीच पाहिजे हे कळले त्याला.

इथे भाउंचे कुठलेच व्यंगचित्र कसे नाही? त्याशिवाय या बीबी ला ऑफिशियल कसे समजायचे?

आजच्या सामन्यापेक्षा झिम्बाब्वे-किवीज हा सामना मस्त चाललाय.

किवीज - ५० षटकांत ५ बाद ३२८
झिम्बाब्वे - आतापर्यंत ४१.३ षटकांत ५ बाद २७८ (जिंकायला ५० चेंडूत ५० धावा हव्यात)

अभिनंदन.. ५-० पूर्ण धुवून काढलं...
निदान इंग्लंडमधे काही सामने चुरशीचे झाले होते.. Happy

बीसीसीआयच्या मते समित पटेलच्या जागी स्वान आऊट झालाय.. (त्यांच्या पानावर).. Proud

Pages