२ अंड्यातील पिवळे बलक
१ टेबलस्पून साखर
१ टेबलस्पून पाण्यात विरघळवलेली इंन्स्टंट कॉफी
सजावटीसाठी:
चॉकलेटचा चुरा, चॉकलेट स्ट्रॉज, लेडी फिंगर/स्पाँज फिंगर बिस्किटे, आमाराती बिस्किटे किंवा कुठलिही चॉकलेट बिस्किटे या पैकी काहिही.
'वर्ल्ड एग डे'
'संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे' ही जाहिरात आपल्या सगळ्यांच्याच परिचयाची आहे. अंडी खाल्याने होणारे अनेक फायदे आहेत.
ऑक्टोबर महिन्यातील दुसरा शुक्रवार हा 'वर्ल्ड एग डे' म्हणुन साजरा केला जातो. इंटरनॅशनल एग कमिशन तर्फे या दिवशी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.
यंदाचा वर्ल्ड एग डे या शुक्रवारी १४ ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार आहे. त्या निमित्ताने अंडी वापरुन बनवलेल्या काही पाककृती या आठवड्यात देण्याचा विचार आहे.
फंडु-अंडु - १ - 'मिनी पावलोवा' (ऑस्ट्रेलिया)
फंडु अंडु - २ - 'मार्बल्ड टी एग्ज' (चायना)
फंडु अंडु - ४ - 'ग्येरन झिम - Gyeran Jjim' (कोरिआ)
फंडु अंडु - ५ - डेझर्ट - 'स्नो एग्ज' (फ्रान्स)
**************************************************************************
'मोक्का साबायॉन/झाबायोन - Mocha zabaglione ' (इटली)
साबायॉन/झाबायोन हा क्लिसिक इटालियन डेझर्ट पेयाचा प्रकार आहे. नवव्या शतकात पहिल्यांदा साबायॉन/झाबायोन बनवला गेला असे विकीपेडियामधे दिले आहे.
ओरिजनल साबायॉन/झाबायोन मधे अंड्याचे पिवळे, साखर आणि मर्साला लिकर वापरली जाते. मर्साला ऐवजी मडिरा वाईन किंवा स्वीट शेरी किंवा शँपेन देखिल वापरली जाते.
क्रमवार पाककृती:
१. इंस्टंट कॉफी थोड्या पाण्यात विरघळवुन घ्या.
२. एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवा. उकळी आली की आच बारीक करुन पाणी तापू द्या.
३. त्या पातेल्यावर बसेल असे दुसरे हीटप्रुफ पातेले/बोल घेऊन त्यात अंड्याचा बलक आणि साखर घाला. हे मिश्रण थोडे हलके होईपर्यंत फेटुन घ्या.
४. या मिश्रणात आता कॉफी घाला आणि परत थोडे फेटा.
५. आता हे पातेले गरम पाण्याच्या पातेल्यावर ठेवा (डबल बॉयलर पद्धत). वरचे पातेले आतल्या पाण्याला लागणार नाही याची खबरदारी घ्या.
६. आतले मिश्रण सतत फेटत रहा. मिश्रण घट्ट पण फेसाळ दिसायला लागेपर्यंत फेटत रहा.
७. ग्लासात बिस्किटाचे, स्पाँज फिंगरचे तुकडे टाकुन त्यावर हे मिश्रण ओता. थोडे गार झाल्यावर त्यावर किसलेले चॉकलेट घालुन सजवा व खायला द्या.
- साबायॉन/झाबायोन - zabaglione हे युज्वली लिकर वापरुनच बनवले जाते. मी लिकर ऐवजी कॉफी वापरली आहे.
- हे करायला थोडी प्रॅक्टिस लागते. गरम पाण्यावर पातेले ठेऊन अंड्याचे मिश्रण फेटताना भरभर फेटावे लागते पण त्याचबरोबर पातेल्याच्या तळाला गरम पाणी लागणार नाही याची काळजी घ्यावी लागते. आपल्याला अंदे हळुहळु शिजवायचे आहे. नाहीतर ऑमलेट बनेल
- साबायॉन/झाबायोन - zabaglione हे गरम किंवा थंड कसेही सर्व्ह करता येते. बिस्किटाच्या तुकड्यांऐवजी फळांचे तुकडे, केक यावर सॉस सारखे घालुन देखिल खाता येते.
---------------
- माझे हात मिश्रण फेटत होते आणि दुसरे कुणी घरात फोटो काढायला नव्हते त्यामुळे या पाकृचे मधल्या स्टेप्सचे फोटो नाहीयेत.
लाजो, हि सिरिज म्हणजे
लाजो, हि सिरिज म्हणजे नेत्रसुख आहे अगदी.
छान आहे हे पण. चॉकलेट लिकर
छान आहे हे पण.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चॉकलेट लिकर वापरुन करुन पाहिले पाहिजे.
सही पाककृती. अंडुसिरीज
सही पाककृती.
अंडुसिरीज मस्तंय!
लाजो, तुझा उत्साहाला __/\__.
लाजो, तुझा उत्साहाला __/\__.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त सिरीज आहे!
डबल बॉयलर म्हणून एक खास भांडे
डबल बॉयलर म्हणून एक खास भांडे मी बघितले आहे. त्यात दोन भांड्यांच्या मधे एक इन्सुलेशन असते. त्यामूळे भांडे तसे अधांतरीच राहते. एक हात वापरुन कस्टर्ड शिजवता येते त्यात. भारतात मिळते का ते माहित नाही.
रेसिपी अजून पूर्ण वाचली
रेसिपी अजून पूर्ण वाचली नाहीये पण फोटो मस्तच.
जबरी आहेत या सीरीज मधल्या
जबरी आहेत या सीरीज मधल्या रेसिपीज. सीरीज ची आयडीया पण सहीच.
मस्त फोटो आणि मस्त पाककॄती
मस्त फोटो आणि मस्त पाककॄती![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
किती वेगवेगळ्या पाककॄती देते आहेस. ग्रेट
लाजो, हि सिरिज म्हणजे
लाजो, हि सिरिज म्हणजे नेत्रसुख आहे अगदी.>> +१.
माझ्यासारख्या अंडं न खाणारीला सुद्धा करून पहायचा मोह होतोय.
UDF चा तयर एगनॉग आणुन त्यत
UDF चा तयर एगनॉग आणुन त्यत इन्स्टंट चोफी विरघळवली तर हाच पदार्थ तयार होइल का?? सुंदर दिस्तोय पन कष्ट करायची तयारी नाही म्हणुन विचारतिये.
-शिरीन
भारीच आहे. इतक्या वेगवेगळ्या
भारीच आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
इतक्या वेगवेगळ्या कृती शेअर केल्याबद्दल खूप धन्यवाद.
मस्तं दिसतोय फोटो. लालुची
मस्तं दिसतोय फोटो.
लालुची आयडिआ भारीये चॉकलेट लिकर ची :).
चॉकलेट लिकर फंडा मस्तंय.
चॉकलेट लिकर फंडा मस्तंय.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
बेलीज आयरिश क्रीम घालून केलं तर फार जड होईल का? (कृपया करून बघितल्यास सांगा.)
मस्त दिसतयं हे डेझर्ट! फोटो
मस्त दिसतयं हे डेझर्ट! फोटो पण सुंदर! आता पुढे काय... उत्सुकता वाढली आहे!
वॉव ग्रेट आहेस. केक आणि
वॉव ग्रेट आहेस.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
केक आणि डेसर्ट मधली मास्टर एक्दम
सिरिज वेगळीच आणि नव्याच रेसिपी! हि डिश पहाताना वाटतही नाही की अंडे असेल यात.
मस्त.
मस्त.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वाव.. लाजो तुझ्या ह्या
वाव.. लाजो तुझ्या ह्या मालिकेतले आतापर्यंतचे तिनही पदार्थ करुन पाहायचा मोह होतोय.. काय उत्साह आहे गं तुझा एकेक पदार्थ करुन पाहण्याचा..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त!!
मस्त!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
__/\__
__/\__
हे मस्त आहे. पण झंझटगिरी
हे मस्त आहे. पण झंझटगिरी जास्त आहे.
मी करून बघणार नाही. आयतं कुणी बनवलं तर मला बोलवा. ![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मस्त. तुमचा माहेर मधला केक्स
मस्त. तुमचा माहेर मधला केक्स वरचा लेख पण छान आहे.
फारच मस्त! फोटो किलिंग आहे!
फारच मस्त! फोटो किलिंग आहे!
___/\___ सगळ्याच पाकृ मस्त
___/\___
सगळ्याच पाकृ मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त!
मस्त!
मस्त आहे हे!
मस्त आहे हे!
सर्वांना धन्यवाद दिनेशदा,
सर्वांना धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दिनेशदा, थँक्यु![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
@ शिरीन, एगनॉग हे कच्च्या अंड्याचे बनवतात. त्यात ब्रँडी किंवा रम घालतात. क्रिम देखिल वापरतात. साबायॉन मधे अंडी शिजवतात.
@ मृण्मयी, बेलिज आयरिश क्रिम, कलुआ सारख्या आफ्टर डिनर लिक्युअर्स ची कन्सिस्टंसी थिक असते. या रेसिपी मधे त्या कदाचित चालणार नाहित कारण त्याच्यामुळे साबायॉनचे टेक्श्चर बदलेल, किंवा कदाचित जो फ्रॉथी इफेक्ट हवाय तो येणार नाही. पण प्रयोग करायला कहिच हरकत नाही![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
@ अश्विनीमामी, धन्यवाद. मी स्वतःच तो लेख मासिकात आलेला पाहिला नाहिये...
लाजो, भारी दिसतं आहे गं हे!
लाजो, भारी दिसतं आहे गं हे!
फंडु अंडु मालिकाच मस्तय सगळीच
फंडु अंडु मालिकाच मस्तय सगळीच , लाजो जबरी हां!
मस्त आयतं कुणी बनवलं तर मला
मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आयतं कुणी बनवलं तर मला बोलवा. <<<<<<<मलाही (ब्रॅन्डी,रम,बेलीज आयरिश क्रीम, चॉकलेट लिकर घालुन केलेलं सुद्धा चालेल)
धन्स लोक्स
धन्स लोक्स![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages