Submitted by juyee on 8 October, 2011 - 07:43
दिवाळी सुट्टीमध्ये हैद्राबादला जाण्याचा योग आहे. ( नक्की भागाचे नाव माहित नाही )
हैद्राबादला मोती चांगले मिळतात असे खुप जणांकडून ऐकले आहे. कोणाला काही अनुभव आहे का?
साधारण मोतींची किंमत काय असेल , म्हणजे क्वालिटी आणि किंमत यातला फरक कसा ओळखावा ?
किंवा अजून काय चांगले खरेदी करण्यासारखे आहे तिकडे...
प्लिज सांगाल का ?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धंस ... जुई खरेदी म्हणजे
धंस ... जुई
खरेदी म्हणजे माझा विक पॉइंट !!!! फ़क्त ती करताना कुठे काय मिळेल हे कान आणि डोळे उघडे ठेवून बघत रहायचे. शक्य असल्यास पैसे टाकुन बघायचे. मला इतरां बरोबर खरेदीला जायला पण खुप अवडते. दागिने वगैरे तर मज्जा !!! मला रियल दागिन्यां पेक्षा खोटे दागिने घेताना जास्त मजा येते. ( खरे परवडले पाहिजेत ना!! असे कोण म्हणताय रे!!!!) तिकडे खिशाला फारसा चाट नसतो आणि वेग वेगले घेता येतात.
जुईवैनी, आता मोती घेतलेस की
जुईवैनी, आता मोती घेतलेस की इथे फोटु टाक बरं का.
ते खटाटोप असे हवे.
ते खटाटोप असे हवे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अश्विनी नुसतच जुयी म्हणा....
अश्विनी नुसतच जुयी म्हणा.... वैनी वगैरे नको...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
अश्विनिमामी
अगं असंच मजेत म्हटलं
अगं असंच मजेत म्हटलं इंद्रामुळे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
नेहमी जुईच म्हणते की. आणि तू का म्हणून अहोजाहो करत्येस?
इथे विषयांतर होणार नाही असे
इथे विषयांतर होणार नाही असे वाटतेय.
शिंपल्यामधे कुठलाही बाहेरचा पदार्थ गेला, जसे रेतीचा कण वगैरे तर त्याभोवती आतला जीव आपल्या स्त्रावाची पुटे चढवतो. आत गेलेली वस्तू ज्या आकाराची असेल तसा मोती बनत जातो. पण तो थरांचाच बनलेला असल्याने झिजतही जातो. हा खरा अस्सल मोती, पण तो मिळणे फारच दुर्मिळ असते.
त्याचा आकार अर्थातच गोल नसतो. आणि तो खुप म्हणजे खुपच महाग असतो.
सध्या मुद्दाम असे शिंपले जोपासून त्यात बाहेरून प्लॅस्टीकचा छोटा मणी टाकतात. त्यावर पुटे चढली कि त्याचा मोती होतो. याचा आकार नियंत्रित करता येतो. हेच कल्चर्ड पर्ल्स.
बहारीन आणि जपानमधे उत्तम मोती मिळतात. नायजेरियातही खुप मिळायचे, ते लायटर पेटवून त्यावर धरुन देखील दाखवतात. तरीपण त्याची खात्री मला देता येणार नाही.
मारुति चितमपल्लींच्या नवेगावबांधचे दिवस या नव्या पुस्तकात, तिथे सापडणार्या मोत्यांचा उल्लेख आहे. तसे मोती निसर्गतः मऊसर असतात. ते ज्याला सापडतात तो ते पटकन तोंडात टाकतो. तसे केले कि ते कडक होतात. पण पुरते कडक व्हायच्या आतच त्यांना सुईने भोक पाडावे लागते.
बरोबर दिनेश. धन्यवाद वेळात
बरोबर दिनेश. धन्यवाद वेळात वेळ काढून लिहीलेस. एक मोत्याचा कंठा नाहीतर शिरपेंच घेण्याचे करावे.
हैदराबाद हून मोती खरेदी केले
हैदराबाद हून मोती खरेदी केले आहेत त्यांचा सेट बनवायचा आहे, तन्मणी , नथ , बांगड्या , कानातले असा , मुंबई / ठाण्यात कोणी बनवून देत ह्याबद्दल माहिती हवी होती .
नमस्कार या धाग्या वर खूप
नमस्कार
या धाग्या वर खूप चांगली माहीती आहे.
आम्ही (४) २५ ऑगस्ट ते २८ ऑगस्ट हैदराबाद शहरात प्रवास करायचा विचार करत आहोत. कोणाला चांगले हॉटेल माहीत आहेत का? अगदी ओबेरॉई नोकोय पण बर्यपेकी हवय. शहरात फिरायला बरे पडेल असे.
अॅबिड्स भागात ताजमहाल आहे ते
अॅबिड्स भागात ताजमहाल आहे ते चांगले पडेल. एसी डबल रूम २००० च्या आसपास असेल. काची गुडा भागात पंच रतन म्हणून आहे महाराष्ट्र मंडळ पण आहे. ते बजेट अॅकोमोडेशन आहे. डोर्म पण आहे तिथे. बाकी महाग हॉटेले खूप आहेत.
धन्यवाद छान माहिती मिळाली
धन्यवाद छान माहिती मिळाली
आंतरराष्ट्रीय महिलांच्या
आंतरराष्ट्रीय महिलांच्या भेटवस्तूसाठी चेकआउट सर्वोत्तम भेट - https://www.ornatejewels.com/
Pages