Submitted by Kiran.. on 8 October, 2011 - 00:58
नुकतंच रिक्षावाल्यांविरूद्ध खळ्ळ खट्याक आंदोलन झालं. त्या आंदोलनाच्या श्रेयावरून महाभारतही झालं. ईसकाळच्या बातमीमधे श्रीराम वैद्य नामक एका वाचकाची प्रतिक्रिया वाचली... फार छान झालं. मला पण एक तरी रिक्षा पेटवायची आहे. ही प्रतिक्रिया प्रातिनिधीक आहे का ? प्रतिक्रिया पटते का ? असल्यास का ? अशा प्रकारे लोकांनी कायदा हातात घेणं योग्य आहे का ?
रिक्षावाल्यांनी काय करावं अशी अपेक्षा आहे ?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
असं कसं? मुद्दा काय?
असं कसं? मुद्दा काय? मानेइकिनी (म्हणजे लेखक हं) काय लिहिलय - प्रतिक्रिया प्रातिनिधीक आहे का ? प्रतिक्रिया पटते का ? असल्यास का ? लिहिताय काय?
पहिली पोस्ट एडिट करा भ वरचा अनुस्वार काढून य वर द्या![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रिक्षेवाल्याच्या प्रामाणीकपणा वर पुन्हा केव्हा तरी हवं तर लिहा![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
तुम्ही बसा मी तुम्हाला थोडे
तुम्ही बसा मी तुम्हाला थोडे पुढे नेऊन सोडतो!!![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
![Light 1](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/light1.png)
>> का ही ही
बरं झालं त्याच्याकडून ९ रु. घेणे नव्हते. नायतर एक किमी पुढे सोडले असते अन तुम्हला तितके परत चालत यावे लागले असते. आता अमेरिकेतल्या लोकांना तेवढे चालणे म्हणजे काही विशेष नाही म्हणा, एका जागी बसून माशा मारायला ते काय भारतीय आहेत?:फिदी:
असो. पुढच्या वेळी याल तेव्हा लांब अंतरासाठी विंग्स कॅब मागवा हो. ऑटोवाल्याशी भांडाभांडी करुन, वेळ्-पैसा-शक्ती-मूड घालवून काही फायदा नाही. साधारण तितक्याच पैशात एसी कारमध्ये जावे, कारवाला अदबीने वागतो शिवाय एफेम ऐकवतो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शान टॉकिज ते इन्फिनिटी,
शान टॉकिज ते इन्फिनिटी, वर्सोवा हे अंतर रोज जातेय आणि येतेय सध्या.
जायची वेळ सकाळी ९:३० किंवा ११:३०. यायची वेळ रात्री १०:०० नंतर.
आधी इर्ला लेन आणि मग जुहू सर्कल पासून लक्ष्मी इंडस्ट्रियल इस्टेट पर्यंत कैच्याकै गर्दी असू शकते त्यामुळे गर्दीच्या प्रमाणात पैसे कमी जास्त होतात. कमीतकमी ३:२० आणि जास्तीतजास्त ४:१० एवढा फरक असू शकतो. काल रात्री १२ ला आले. कणभर गर्दी नाही. सिग्नल नाही आणि मीटरमधे ५:००. मीटर फास्ट केलाय ही आधीच कळलं होतं पण घरापर्यंत येईतो काही बोलले नाही. मधेच उतरायला लागलं असतं तर अजून प्रॉब्लेम झाला असता. नंतर मीटर फास्ट केलाय का विचारल्यावर निर्लज्ज आणि गलिच्छ हसणे. सुदैवाने शानच्याइथे बर्याचदा पोलिस तैनात असतात त्यामुळे गपगुमान योग्य तेवढेच पैसे दिले त्याला तरी तो काही करू शकला नाही हे माझं नशिब.
आज सकाळी नेहमीपेक्षा कमी गर्दी असूनही अर्ध्या अंतरालाच मीटरमधे ३:५० झाले होते. त्यावरून बोलल्यावर 'उतना ज्यादा नही किया है थोडा किया है. आपको क्या है?'
'पुलिसस्टेशन चलो फिर'
'वहापे क्या होगा. ५०० का नुकसान होगा मेरा. मैने नही किया है मीटर फास्ट. रिक्षा भाडेपे है. जिसकी है उसने की है तो मै क्या करू?'
म्हणजे हा पण ग्राहकाचाच गुन्हा?
नाही माझी कणभरपण सहानुभूती या रिक्षावाल्यांच्या अरेरावीला.
पण करणार काय? आँ! जाळणार
पण करणार काय? आँ! जाळणार रिक्षा?
त्यापेक्षा नताशा -एक फूल यांना विचारा त्यांची कूल कॅब का विंग कॅब कुठे मिळेल. एफेम ऐकवतील!! पैसे पैसे काय, लोकांना तर सांगता येईल, आम्ही कूल कॅबने जातो!! भारतात त्याला फार महत्व आहे.
पुण्यातल्या रिक्षेवाल्याची आणखी एक आठवण. मी एकदा रिक्षाने जात असताना नेहेमीचा रस्ता कुठल्यातरी राजकीय पक्षाच्या निदर्शनानिमित्त बंद होता. त्या रिक्षेवाल्याने दोन शिव्या हासडून दुसरीकडून रिक्षा काढली तर तोहि रस्ता बंद! असे सगळे बंद रस्ते त्याने मला दाखवून आणले. जोडीने शिव्यांची लाखोली होतीच. मी त्याला म्हंटले त्याच त्याच शिव्या काय देतोस, मी तुला दोन चार नवीन शिव्या सांगतो! त्याने माझ्याकडून चक्क मीटरपेक्षा दोन रुपये कमी घेतले! अशी ही त्याची कृतज्ञता!
पुढच्या वेळी याल तेव्हा लांब अंतरासाठी विंग्स कॅब मागवा हो. ऑटोवाल्याशी भांडाभांडी करुन, वेळ्-पैसा-शक्ती-मूड घालवून काही फायदा नाही. साधारण तितक्याच पैशात एसी कारमध्ये जावे, कारवाला अदबीने वागतो शिवाय एफेम ऐकवतो
गेली चाळीस वर्षे वर्षाकाठी उन्हाळ्याच्या दीड दोन महिन्यात एसी कारमधून तीन चार हजार मैल तरी जाऊन येतो (झक मारत!). आता रिक्षात बसायला इकडे कसे मिळणार? म्हणून पुण्यात गेल्यावर रिक्षात बसायचे.
पुण्याचे रिक्षेवाले जगप्रसिद्ध आहेत! लक्ष्मी रोड, तुळशी बागेतून काय पण रस्ता काढत जातात!! जिथे जायचे तिथे पोचल्यावर, एकदम इथल्या फूटबॉल मधल्या रनिंग बॅक सारखे आपण टचडाऊन केला असे वाटते. लै मज्जा राव!!
आयुष्यात सगळ्या प्रकारचे लोक भेटतात. चांगले पण भेटतात, वाईटांकडे दुर्लक्ष करावे! आपण आपले आनंदी रहावे!!
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Dial-an-Auto
Dial-an-Auto rickshaw..:)
http://www.rickshawale.com
कुणाचा काही अनुभव..
एक अनुभव चांगला की वाईट
एक अनुभव चांगला की वाईट तुम्ही ठरवा...
सगळे नो. नो... राजाराम ब्रिजवरच्या एका रिक्षात जबरदस्तीने बसलो, त्याने ताथवडे उद्यानात नेऊन सोडले... तिथे एक बिहारी रिक्षेवाल्याने आम्हाला येन केन प्रकारेण आप्पा बळवंत चौकात नेऊन सोडले. तिथेपर्यंत पोचायला एक तास वगैरे लागला... मुळात सिंहगडरोडच्या आसपासच्या सर्कल मधुन बाहेर पडायलाच अनेक दिव्य करावी लागली. १७४/- रू. बिल झालं. मीटर व्यवस्थित होतं. मी कृतज्ञतेने त्याला थँक्स म्हणलं.
रमेश वांजळे गेले तेव्हा, सिंहगड रस्त्यावर ही प्रचंड गर्दी, मला व मैत्रिणीला मोठ्या मुश्किलिने त्या दिवशीची(च) डॉक्टरांची अपॉईंटमेंट मिळाली होती. दुर्दैवाने एक ही मराठी रिक्षावाला आम्हाला सोडायला तयार झाला नाही.
इतके लोक रिक्षात बसायला तयार
इतके लोक रिक्षात बसायला तयार आहेत... मी स्वतःच वर्कशॉप बंद करून रिक्षा सुरू करतो. मला बोलवत चला. डॉक्तर जसे व्हिजिट फी चे जास्त पैसे घेतात तेव्हढे द्या म्हणजे झालं ! घरी येऊन पाहीजे तिथ सोडीन..
आणि सुट्टे नसल्यावर झ.का. फॉर्म्युला![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
हजार ची नोट काढली आणि शंभरच्या आत बिल असलं तर डायरेक्ट मुंबई
पुण्यात दुकानातला सर्वात
पुण्यात दुकानातला सर्वात दुर्लक्षित घटक म्हणजे गि-हाईक असं कुणी तरी थोर लेखकाने म्हणून ठेवलेलंच आहे. मग त्याला रिक्षावाले तरी कसे काय अपवाद असतील ? ज्याला आपण उर्मटपणा म्हणत आहात ते पुणेरी असल्याचं प्रमाणपत्र आहे. पुणेरी रिक्षावाला ओळखू येतो. पुण्याबाहेरचा असला कि दक्षिणाला आले तसे चमत्कारिक अनुभव येतात. अशानेच पुण्याचं नाव खराब होतं
(स्वगत : झ.का. इफेक्ट झाला वाटतं )
मला वाटते रिक्षा व्यावसायिक
मला वाटते रिक्षा व्यावसायिक सहानभुती गमावत आहेत... पण शिक्षीत आणि व्यावसायाने तुलनेने सुरक्षीत अशा समाजाने मन विशाल करुन त्यांना समजावुन घ्यायला हवे.
रिक्षा चालवणार्यांचे भविष्य काय असते? यांना कॅज्युअल, शनिवार, रविवार, सणाला सुटी असते कां? ४ दिवस आजारी पडले तर यांना सुटीचा पैसा मिळतो का? अशा काळात, बँका हफ्ते घेणे थांबवते का? वृद्धपकाळात यांना निवृत्ती वेतन मिळते कां? अतोनात पावसाने रिक्षा बंद पडली तर त्या काळात यांची गुजराण काय असते. मुलगा, आई आजारी पडल्यास, उपचार खर्च मिळतो कां?
बंद पुकारणारे राजकाराणी पुढारी, नेते सर्वांचे कोटीचे आर्थिक व्यावहार असतांत. कुठे काही राडा झाला तर दंगलीला सामोरे जाणारा रिक्षावालाच असतो... एक दगड काचेवर आल्यास १००० रुपयांचा चुराडा काही क्षणात होतो. आपण त्या काळात दुरचित्र वाणी वर केवळ बातम्या बघतो... पण
आता काही रिक्षा व्यावसाय करणारे फसवणुक करतात... पण प्रत्येक व्यावसायांत हे फसवणारे लोकं आहेत.... प्रवास पुर्ण झाला माझ्या कडे देण्यासाठी पैसे नाहीत असे सांगणारे पण प्रवासी आहेत. अनेकांना त्यांची पैशाची बॅग, अतिशय महत्वाची कागद पत्रे परत मिळालेली आहेत. ५०,००० रुपये बॅगेत आहेत (हे समजल्यावरही) तशीच्या तशी पोलिसांना देणारे पण आहेत (अशा अर्थाच्या घटना आपण वर्तमान पत्रात अनेकदा वाचतो).
"मला वेळेवर तुझी मदत झाली, योग्य वेळी कामावर पोहोचवले" म्हणुन किती लोकं स्वत: त्यांना जास्तीचे पैसे टिप म्हणुन देतांत? (टिप देण्याअगोदर बाबारे कृपया दारु किंवा मटक्यासाठी नको वापरु असे मी विनवतो)... धन्यवाद म्हटल्यास त्यांना थोडे चुकल्यासारखे (त्यांना चुकल्यासारखे वाटणे हे आपले अपयश आहे
- काय सवय लावली आहे आपण?) होते.
वज्र, आपण जे मुद्दे लिहिले
वज्र, आपण जे मुद्दे लिहिले आहेत ते अतिशय योग्य आहेत. मी असेच लिहायचा प्रयत्न केला होता, पण सर्वांनाच रिक्षावाला द्वेषाने पछाडले आहे. आपण त्यांच्यापेक्षा कैक पटीने सुस्थितीत असतो त्यामुळे जरा त्यांच्या बाजुने विचार करून पाहिला तर काय हरकत आहे. मी अनेकदा गप्पा मारत असतो त्यातुन त्यांचे प्रॉब्लेम्स समजतात. आणि मग अशा गप्पा मारल्यावर अनेक जण खुप आदराने आणि सहानुभुतीने वागतात.
मध्यंतरी मला पुण्यात कसबा पेठेतुन मार्केटयार्डला जायचे होते. रात्रीचे अकरा वाजुन गेलेले, मुले झोपली होती, पाऊस पडत होता. मी एकटाच छत्री घेऊन शनिवार वाड्या पर्यंत चालत आलो आणि स्वारगेटच्या दिशेने जाणार्या रिक्षा शोधत होतो, बरेच जण नाही म्हणत होते, एक जण थांबला तो पण नाही म्हणत होता, पण त्याला शांतपणे सांगितले की लहान मुले आहेत, पाऊस आहे, वाटल्यास हाफ रिटर्न देतो, मग तयार झाला आणि सुट्टे नव्हते तर वरचे पैसे राहू द्यात म्हणाला.
त्यांनीपण आततायी पणे वागायचे आणि आपण (प्रवाशांनी) पण, मग हा तिढा सुटणार कसा ?
नाही तर मी आधी म्हणालो तसे हा व्यवसाय पुर्णपणे बंदच करून टाकणे (टांगे बंद झाले तसे)
मला वाटते भाडे स्ट्रक्चर
मला वाटते भाडे स्ट्रक्चर बदलायला हवे! म्हणजे अंतराच्या व्यस्त प्रमाणात मिटरचे रनींग हवे. जवळ जायचे असल्यास जास्त भाडे व जसे अंतर वाढत जाईल तसे टेपरीग. ह्याने जवळच्या भाड्या बाबत उदासीनता कंइ होइल. त्याच प्रमाणे प्रत्येक शहरात ऑन अॅव्हरेज किती अंतर एक प्रवासी घेतो त्याला मध्य मानुन त्याप्रमाणे रेट फिक्स व मिटराधारीत करावेत.
अत्त मिटर व रेट कसे ठरवतात कोणला काही कल्पना?
जवळ जायचे असल्यास जास्त भाडे
जवळ जायचे असल्यास जास्त भाडे व जसे अंतर वाढत जाईल तसे टेपरीग. >>> पेशवा म्हणजे "relatively" असे म्हणायचे आहे ना? आयडिया चांगली आहे. पण मिनिमम भाडे त्यासाठीच ठरवले होते. ते वाढवले तर तू म्हणतोस तसे होईल का?
तुझ्या दुसर्या पॉईंटबद्दलः पुण्यात कदाचित एकापेक्षा जास्त पॅटर्न्स असतील. उदा: १. कोथरूड सारख्या उपनगरात एका ठिकाणाहून दुसरीकडे, जेथे योग्य बस नाही २. उपनगरातून डेक्कन किंवा स्टेशन सारख्या ठिकाणी ३. संध्याकाळी मध्यवर्ती भागांमधून पुण्याबाहेर च्या बाजूला जाणारे ४. शहरातील कोणत्याही ठिकाणाहून रेल्वे, विमान, एसटी किंवा प्रायव्हेट गाड्यांच्या स्टॉप्स वर ई.ई.
शिक्षीत आणि व्यावसायाने
शिक्षीत आणि व्यावसायाने तुलनेने सुरक्षीत अशा समाजाने मन विशाल करुन त्यांना समजावुन घ्यायला हवे.
ते खरे आहे हो. पण सध्या जो समाज आहे त्याचे काय? ते नुसते शिव्या देणार, गुंडांकडून रिक्षा जाळून घेणार!
जाउ द्या झाले. मायबोलीवर
जाउ द्या झाले.
मायबोलीवर लिहीले की सगळे प्रश्न सुटतात. पहा ना, आता नाव तरी ऐकू येते का भ्रष्टाचाराचे? नाही. कारण भ्रष्टाचार संपला! स्विस बँएकेतील पैशाचा प्रश्न - सुटला!
तसेच हाहि प्रश्न निकालात निघेल. सर्व रिक्षेवाले वाजवी दरच आकारतील, सर्वांशी अदबीने वागायला लागतील, कुठूनहि कुठेहि केंव्हाहि जायला तयार होतील.
मी तर ऐकले की मनसे चे प्रताप ऐकून, भीतीने, पुण्याचे यू. पी. नि बिहारी रिक्षाचालक केंव्हाच मराठी बोलायला तयार होते. पण त्यांना पुण्यात मराठी बोलणारे कुठे भेटणार? तेंव्हा मनसे असो की शरीरसे असो, पुण्यात काही कुणि मराठी बोलणारे नाहीत, म्हणून त्यांनी हिंदीतून हुश्श म्हंटले.
वज्र मी रिक्षेवाल्यांच्या
वज्र मी रिक्षेवाल्यांच्या विरूद्ध गटात असून सुद्धा एक माणूस म्हणून त्यांच्याबद्दल सहानुभुती आहे मला. तुम्ही लिहिलेले सगळे मुद्दे सुद्धा पटलेत मला. सगळ्यांनीच जर आपल्यापेक्षा वरच्यांकडे पाहिलं तर आपलं ठिगळ मोठंच दिसेल. मी आणि माझा बॉस ऑफिसात सारखाच वेळ देतो तरिही त्याला पगार जास्ती आहे, या गोष्टीचं दु:ख मी करत राहिले तर कसं होईल? मी कधीच सुखी होणार नाही. रिक्षेवाल्यांना सुट्टी नसते, बाकी फॅसिलिटीज नसतात, अगदी मान्य. पण त्यांनी जर आलेल्या प्रत्येक ग्राहकाला सेवा दिली, आणि छोटं अंतर जाणार नाही, मोठंच भाडं घेईन, असल्या फालतू अटी न बाळगता सचोटीने व्यवसाय केला तर त्या रिक्षेवाल्याला दैवदयेनं काहीही कमी पडणार नाही. हे माझं वैयक्तिक मत आहे. पण आत्मसमाधान नावाची गोष्टच आजकाल दुनियेतून नाहीशी होत चालली आहे बहुतेक. थोडक्या कष्टात मोठं घबाड मिळवण्याच्या मागेच असतात सगळे.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
आता ग्राहक हा पण माणूस असतो
आता ग्राहक हा पण माणूस असतो आणि तोही सततची भाववाढ, न वाढणारे पगार आणि इतर तत्सम गोष्टींनी त्रासलेला असतो ह्याची आठवण करून द्यायची वेळ येणारे....
रिक्षावाल्यांबद्दल तक्रारी
रिक्षावाल्यांबद्दल तक्रारी आणि अपेक्षा :
१. अवाजवी भाडं
२. अस्वच्छता
३. उर्मटपणा
४. मीटर फास्ट असणे
५. भाडं नाकारणे
अपेक्षा
१. सेवा चांगली द्यावी
२. पैशाच्या मानाने सेवेचा दर्जा
पैकी क्रमांक ३ चा मुद्दा माझ्या अनुभवाला आलेला नाही म्हणून त्यावर भाष्य करत नाही.
पहिल्या मुद्याबद्दल इतकं म्हणता येईल कि ज्याला रिक्षा वापरायची आहे तो बसने जाऊ शकत नाही. कारण काही असो. रिक्षा ही थोडी वैयक्तिक सेवा झाली. ती ही ड्रायव्हरसहीत. मागे एका स्वयंसेवी संघटनेने रिक्षाला बाटली लावून एका लिटर मधे तिती किमी जाते ते दाखवून दिलं होतं आणि त्याप्रमाणे दर काय असले पाहीजेत हे वर्तमानपत्रात लिहीलं होतं. त्यात त्यांनी रिक्षासाठी केलेली गुंतवणूक, त्याचा हप्ता, एक माणूस दिमतीला असल्याने त्याचे होणारे पैसे हे काहीच ग्रूहीत धरलं नव्हतं. लोकांचा असा दृष्टीकोण कसा काय असू शकतो.
माझे काही मित्र हॉटेलात गेलं कि पो-याला ऑर्डर्स सोडतात. वेटरला चांगल्या सर्विसबद्दल लेक्चर देतात. जागरूक असणं वेगळं आणि आख्खं हॉटेल आपण खरेदी केलय अशा थाटात वावरणं वेगळं. वेटर उलट उत्तर देत नाही पण इतर लोक देतात.
रिक्षावाल्याचं भाडं तसं काही जास्त नसतं. त्यात लोकांना नेमकी कसली सर्विस हवी असते ? इच्छित स्थळी गेल्याशी कारण. माझ्या मते भाडं नाकारायचा हक्क त्याला असायला हवा. ज्यांना लक्झरी सेवेची अपेक्षा आहे त्यांच्यासाठी विंग्ज ट्रॅव्हल्सने रेडिओ कॅब सुरू केलेली आहे. एक टोल फ्री नंबर आहे त्यावर फोन केला कि तुम्हाला हवं तिथे एसी गाडी येते आणि हवं तिथे सोडते. वर सौजन्यपूर्ण वागणूक मिळते. अर्थात त्यांचं बिल द्यायची तयारी असेल तर. रिक्षाच्या भाड्यात ही सर्विस नाही मिळणार.
ज्यांना त्या ही पेक्षा लक्झरी हवी आहे त्यांच्यासाठी कोरेगाव पार्कमधे एकाने मर्सिडीझ बेंझची सर्विस सुरू केलेली आहे. तिचाही लाभ घेता येऊ शकतो. चार्जेस तसे द्यावे लागतात.
बिग बझार मधे धान्याचे दर पाहीले. दर्जा पाहीला आणि मार्केट यार्डातून स्वस्तात चांगलं धान्य आणलं. तिथं लूट केली तर चालते पण रिक्षाचे दर वाढले किंवा त्यासाठी संप करावा लागला कि कपाळाला आठी का चढते हे मला अजूनही नीट समजलेलं नाही. केवळ आरटीओने रिक्षावाल्यांसाठी दर आखलेले असतात आणि नियम केलेले असतात म्हणून ते आपले नोकर झाले का ही माझी शंका आहे.
नियमाने कुठला व्यावसायिक धंदा करतो ? व्हॅटचा परतावा आपल्याला देतो ? एमआरपी मधे सवलत देतो ? बिल देतो ?
स्वारगेटला जेधे चौकात कित्येकदा रस्ता ओलांडताना लाल दिवा असतानाच वाहतूक सुरू होते आणि दुचाकी वाहनचालक आपल्यालाच गलिच्छ शिव्या देत जातात. याउलट रिक्षावाल्यांना ओ माऊली बाजूला सरका अशी हाक मारताना पाहीलेलं आहे.
सगळे दोष रिक्षावाल्यांच्या माथी कशाला ? जितकी स्ट्राँग रिअॅक्शन रिक्षावाल्यांविरूद्ध होतेय तितकी मॉल आल्यापासून डाळीचे भाव २८ रू वरून १०० रू वर गेले तेव्हा का नाही होत ? फ्लॅटसचे भाव ७०० वरून आज चार हजार, आठ हजार आणि काही ठिकाणी सतरा हजार झालेत त्याविरूद्ध असं खळ्ळ खटाक का नाही होत ?
हातावर पोत असलेल्या व्यावसायिकांकडे पहायचा दृष्टीकोण जरा बदलायला हवा. इतर गोष्टींबाबत आपण चर्चा करू शकतो. मी करतोय. तुम्हीही करा. बाबांशीही बोलूयात. सौजन्याचा प्रश्न सुटेल. भाडं नाकारण्याबाबतही तिथल्या स्टॅण्डच्या रिक्षावाल्यांशी बोलायला हवं. चर्चेने प्रश्न सुटतील. कायद्याच्या बडग्याने काहि होणार नाही.
एकमेकांना समजून घेण्यासाठी पहीलं पाऊल सुशिक्षितांकडून पडायला हवं असं मला वाटतं.
रिक्षावाल्याचं भाडं तसं काही
रिक्षावाल्याचं भाडं तसं काही जास्त नसतं. त्यात लोकांना नेमकी कसली सर्विस हवी असते ? इच्छित स्थळी गेल्याशी कारण.>>>>
कसली सर्व्हिस हवी असते??? वर एवढ्या लोकांनी एवढे अनुभव लिहिलेत ते वाचलेच नाहीत की काय? इच्छित स्थळी प्रमाण पद्धतीनुसार बिल होऊन, उर्मटपणा अनुभवास न येता जाता यायला हवं. ही अतिशय बेसिक अपेक्षा आहे. जे काही भाडं (वाढलेली महागाई, खर्चांनुसार) असेल ते एकमताने ठरवा, छापा आणि नेहमी फॉलो करा, मीटर व्यवस्थित ठेवा, एवढंच म्हणणं आहे. तेवढी सर्व्हिस तरी देता येतेय बहुतेकजणांना? त्यांनी प्रमाणित पद्धतीने भाडं आकारलं तर द्यायला ना नसतेच, पण पहाटे रिक्शा मिळत नाहीत म्हणून ट्रॅव्हल्समधून उतरणार्या लोकांना मीटर न लावता तोंडाला येईल ती रक्कम सांगायची, हे अवाजवीच आहे.
हॉटेल किंवा मॉलांमध्ये दर चढे असतात पण ते घटकेघटकेला बदलत नाहीत. पण रोज ठराविक ठिकाणाहून दुसर्या ठराविक ठिकाणी गेलं तरी गर्दी वगैरे फॅक्टर धरूनही भाड्यात कैच्याकै फरक अनुभवाला येतो. नीधपनेही वर उदाहरण लिहिलं आहे तिचं.
याउलट रिक्षावाल्यांना ओ माऊली बाजूला सरका अशी हाक मारताना पाहीलेलं आहे. >>> सगळ्याच रिक्शावाल्यांना? भारीये हे! कारण मी तर इतरांसारखे सिग्नल तोडणारे, शिव्या देणारे रिक्शावालेही पाहिलेत.
चांगले रिक्शावालेही असतात, पण 'हाताच्या बोटावर मोजता येतील' इतकेच. बाकी लोकांना आलेले वाईट अनुभव तुम्हांला कानांआडच करायचे असतील तर तुमचं चालू द्या.
येथे क्रॉस लाईन्स खूप
येथे क्रॉस लाईन्स खूप झाल्यात, त्यामुळे कोणाची पोस्ट कशाला उद्देशून आहे ते कळत नाही.
किरण - शेवटचे दोन पॅरा सोडले तर बाकी पोस्टशी पूर्णपणे सहमत होऊ शकत नाही. माझे मुद्दे मी आधी लिहीले आहेत.
आता "नकाराधिकार" द्यायचा असेल तर आरटीओ चे नियंत्रण असणे किंवा नसणे म्हणजे काय ते लिहीतो. काही चुकले/राहिले तर सांगा.
आरटीओचे नियंत्रण असणे म्हणजे आत्ता जसे आहे तसे अधिक काही सध्या अंमलबजावणी न होणारे नियम (बेकायदा रिक्षा, दरपत्रक, भाडी नाकारण्याबद्दल तक्रार करता येणे ईई.). हे जर काढले तरः
फायदे
१. रिक्षा कोठे केव्हा जाईल हे रिक्षावाल्याने ठरवायचे. त्याला यायचे असेल तर तो येइल नाहीतर नाही.
२. कोणत्या ठिकाणासाठी केव्हा किती भाडे घ्यायचे हे ही त्यानेच ठरवायचे. प्रत्यक्षात मार्केट ठरवेल.
३. त्यांनी काय कपडे घालावेत, बिल्ले लावावेत की नाही, कोठे उभे राहावे कशावरही नियंत्रण नाही
४. बेकायदा रिक्षा हा प्रकारच नाही. ज्याला रिक्षा चालवायची आहे त्याने चालवावी.
तोटे:
१. शहरात कोणीही लोकांची वाहतूक करू शकेल. सध्याच्या रिक्षांप्रमाणेच सहा आसनीदेखील येतील, लोकांना आणखी स्वस्त पर्याय मिळेल, त्यामुळे रिक्षा करणारे लोक कमी मिळतील. नाहीतर गोव्यासारखे (तेथे असे आहे असे ऐकले आहे) दुचाकीवरूनही लोकांना असे नेणारे निघतील.
२. मिनीमम भाडे हा प्रकारच राहणार नाही. ५ रू. मधे एका चौकातून दुसरीकडे जायला कोणीही रिक्षावाला तयार झाला तर लोक जातील. कोणतेही फिक्स भाडे राहणार नाही.
३. स्टॅण्ड खाजगी बांधावे लागतील, तेथे थांबायला कदाचित पैसे द्यावे लागतील. तसेच तेथे १० रिक्षा लाईनीत असताना तेथूनच जाणारी पण लाईनीत नसलेली रिक्षा करण्याचे स्वातंत्र्य लोकांना असेल.
मला वाटते नियंत्रण काढणे त्यांच्याच हिताचे नाही.
न्यूयॉर्कातही भाडं
न्यूयॉर्कातही भाडं नाकारण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. ही आजची बातमी:
http://news.yahoo.com/blogs/new-york/abbies-e-side-stand-break-rules-ril...
पण इथला आणि भारतातला फरक असा वाटतो की इथे त्या भागातला नगरसेवक/सेविका नागरिकांची बाजू ऐकून घेऊन त्यांच्या बाजूने लढताना दिसतात.
रिक्षा संघटना हा फंडाच मला कळलेला नाहीये. ह्या संघटनेचे सभासद कोण असतात? म्हणजे ज्यांच्याकडे अधिकृतरित्या रिक्षा चालविण्याचा परवाना आहे फक्त ते ह्याचे सभासद हवेत. आणि परवाने देणे बंद झाले असून सुद्धा अनधिकृतरित्या परवाने देणार्यांवर कारवाई करण्यासाठी यांनी सरकारवर दबाव आणला पाहिजे. हे सगळं सोडून उठसूठ फक्त भाडे वाढविण्याची मागणी करताना दिसतात हे लोक. असल्या फडतूस संघटनांचा काय उपयोग?
वज्र३००, तुमचे मुद्दे काही पटले नाहीत. रिक्षा चालवणे हा एक धंदा आहे. ती काही नोकरी नाही. धंदा म्हटला की अनिश्चितता आलीच. त्यामुळे सुट्टी, पेन्शन, आजारपण हे सगळे मुद्दे अनावश्यक आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन भाडं ठरवतात ना. हे सगळं हवं असेल तर सरळ नोकरी करावी.
सहसा सहानुभूति लोकांची असतेच. पण धड सेवा नाही, मीटरमध्ये गोंधळ, रेट्समध्ये गोंधळ. असे असताना फुकाची सहानुभूति कोण देणार?
श्रद्धाताई जनरलाईज्ड
श्रद्धाताई
जनरलाईज्ड स्टेटमेंटस कृपा करून नकोत. मी सगळे रिक्षावाले अशी हाक मारतात असं म्हटलेलं नाही. तुम्ही समजून घेतलं तर लक्षात येईल कि उर्मट किंवा शिवराळ भाषा ही रिक्षावाल्यांची मक्तेदारी नाही. मी पुण्याचा आहे. रस्ता ओलांडताना आमच्या इथे लहान मुलं, बायका, म्हातारी माणसं यांची पर्वा न करता अंगावर गाड्या घातल्या जातात. अक्षरशः जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागतो. लासुसिग्ना आहे म्हणून रस्ता ओलांडावा तर सिग्नल तोडून रहदारी सुरू होते आणि वर शिव्या देत दुचाकीस्वार जातात.
फक्त ऑफीसला येणं आणि जाणं एव्हढ्या प्रवासात दुचाकीस्वारांची इतकी चिडचिड होत असेल तर सतत रस्त्यावर व्यवसाय करणा-याची किती होत असेल ?
एक लक्षात घ्या रिक्षावाल्यांचं समर्थन करणं हा हेतू इथे नाही. तर फक्त रिक्षावाल्यांच्या माथी दोष चिकटवणं याव्बद्दल आक्षेप आहे. जे दोष इतरांच्यातही आहेत त्याबद्दल मौन बाळगून एकाला फाशी देणं मला तरी पटत नाही. मला रिक्षावाल्याचा उर्मटपणा अनुभवाला आलेला नाही. उर्मटपणाची व्याख्या काय आहे ? नेमके काय अनुभव आहेत याबद्दल मला कल्पना नाही. आपण काहीही न बोलता रिक्षावाला दुरूत्तर वगैरे करतो का ?
मी इथं लिहून थांबत नाहीये. या थ्रेडचे प्रिंट आउटस घेऊन बाबा आढावांकडे जाणार आहे सौजन्याने वागणूक मिळावी हे मला मान्य नाही असं अजिबात नाही. फक्त असे अनुभव ज्यांना आलेत त्यांच्याकडून रिक्षावाल्यांना सौजन्यपूर्ण वागणूक मिळालेली असावी ही अपेक्षा आहे. माझा अनुभव असा आहे कि समोरच्याला व्यवस्थित विचारलं तर व्यवस्थित उत्तर मिळतं. कदाचित काही विशिष्ट भागातले रिक्षावाले असं करीत असतील तर माहीत नाही.
कोथरूड भागातल्या रिक्षावाल्यांबद्दल जास्त तक्रारी आहेत असं दिसलं. पहाटे रिक्षा मिळण्याबाबत माझा अनुभव असा आहे कि गोवा एक्सप्रेसने कुणाला जायचं असेल तर रिक्षावाल्याला आदल्या दिवशी सांगून ठेवल्यास तो पहाटे पावणेतीन वाजता मिस्ड कॉल देऊन घरी येतो. रात्रीच्या वेळी किंवा भल्या पहाटे सर्विस देणारे कुठलेही व्यावसायिक जास्त दर घेतातच.
आता परगावाहून येण-यांना अवाजवी दर सांगण्याबद्दल. हे सगळीकडेच घडतं. टॅक्सीवाले पण त्याला अपवाद नाहीत. या लोकांकडे दुर्लक्ष करून रिक्षास्टँड पर्यंत चालत आल्यास वाजवी दरात रिक्षा मिळते. खरं म्हणजे लांबचा पवास करून थकून आलेले प्रवासी हेच रिक्षावाल्यांचं खरं गि-हाईक. त्यामुळं जास्त पैसे सांगून तर बघू.. असा दृष्टीकोण तिथं असतो. तुम्ही नकार द्या ना..!
इतर व्य्वसाय आणि रिक्षासारखे व्यवसाय यात बेसिक फरक असा आहे कि चांगली सेवा देण्याने त्या धंद्याची भरभराट होते. रिक्षावाल्याने चांगली सेवा दिली काय, न दिली काय.. मला हीच रिक्षा हवी आहे असं कुणी म्हणत नाही. प्रवास संपला कि नातं संपलं. चांगलं वागलं तरी एक दोन वाईट अनुभवाने हेटाळणी मात्र नशिबी येते.
मी यावर उपाय शोधतोय. संघटनेशी बोलण्याआधी इथं मांडतोय.
लोकांना जवळचं भाडं स्विकारणारा रिक्षावाला हवा आहे..
यासाठी जवळचं भाडं आकर्षक होईल असे दर आकारले तर त्याने लांबच्या प्रवाशांना रिक्षा मिळणार नाही. एमजी रोडला जे रिक्षेवाले व्यवसाय करतात त्यांचं असं म्हणणं आहे कि एक किमीच्या वर रनिंग होत नाही पण सुरूवातीच्या किमीला जास्त दर असल्याने आणि सतत ग्राहक असल्याने आम्हाला ते परवडतं. पण आता तिथे रिक्षेवाल्यांची गर्दी वाढत चालली आहे. काही दिवसांनी ग्राहकापेक्षा रिक्षेवाले वाढतील आणि मग जवळचं भाडं घेऊन रांगेत थांबण्याचा काळ वाढेल अशी भीती त्यांना वाटते.
माझा उपाय असा आहे.
दोन प्रकारचे रिक्षेवाले असावेत.
अ) प्रत्येक एरियातल्या रिक्षांना कुठल्या एरियात धंदा करणार हे ठरवू द्यावं. त्यांना कमी अंतराचे सर्कल आखून द्यावेत. त्याच्या रिक्षेवर कोथरूड, औंध, पुणे कँप असं लिहीलेलं असावं. संघटनेला मान्य होत असेल तर एकमेकांच्या सर्कलमधे अतिक्रमण होणार नाही असे नियम त्यांचे त्यांनी बनवावेत. या सर्कलमधेच धंदा करणा-यांना कमी अंतरासाठी चांगलं पण अवाजवी नसलेलं भाडं आकारू द्यावं. यांचं भाडं थोडं वेगळ असावं. जिथं ग्राहक सातत्याने मिळतो आहे तिथं ही योजना यशस्वी होईल जिथं मिळत नाही तिथं बोजवारा उडेल. रिक्षेवाल्यांवर सक्ती मात्र नसावी. या रिक्षेवाल्यांना हाफ रिटर्न घेऊ देण्या बंदी असावी.
ब) लांबचं भाडं स्विकारणारे रिक्षेवाले वेगळे असावेत आणि त्यांच्या रिक्षावर पुणे शहर असं लिहीलेलं असावं. यांच्या भाड्याच्या पद्धतीत अ पेक्षा फरक असेल. यांना हाफ रिटर्न घेऊ द्यावा.
सक्ती मात्र कुणावरच नसावी. दुस-याच्या जिवावर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही कल्पनाच अजब आहे. ज्यांना स्वतःची सार्वजनिक वाहतूक नीट चालवता येत नाही त्यांनी स्वतःचे पैसे ओतून लोकांची सोय कुणीतरी पहावी ही अपेक्षा करणं चुकीचं आहे.
पैसे घातल्यानंतर त्याचा परतावा मिळायला हवाच. साधं रस्त्याचं टोलचं कंत्राट घेतलं तरी पैसे वसूल होऊन दहापटीने नफा झाला तरी वसुली चालू राहते. गाडी भाड्याने दिली तर इंधन सोडून तिचं भाडं मिळतं. रिक्षेचं भाडं किमान पाच हजार आणि ड्रायव्हरचा पगार आठ तासांचा किमान दहा हजार गॄहीत धरायला हवा. जास्तीच्या कामाचे अडीच पटीने म्हणजे १२ तास काम केल्यास पंधरा हजार किमान मिळतील असं भाडं मिळेल असं गृहीत धरायला हवं. अधिक रिक्षेचं भाड वेगळ. पेट्रोलचे पैसे वेगळे. ते मीटरप्रमाणे वसूल व्हावेत.
यासाठी किमान धावही गृहीत धरली जावी. कष्ट नसेल तर व्यवसाय नाही. ग्राहक मिळणार नसेल तरी नाईलाज आहे कारण व्यवसाय आहे. हे मुद्दे मी संघटनेसमोर ठेवणार आहे.
काय म्हणणं आहे ?
किरण १०१% अनुमोदन, मी पण अनेक
किरण १०१% अनुमोदन, मी पण अनेक रिक्षावाल्यांशी बोलत असतो, अनेकांचा बाबा आढावांवर विश्वास आहे. तुम्ही बोलुन बघा त्यांच्याशी.
सिझनच्या वेळी (सणांना, सुट्ट्यांना) प्रवासी वाहतुक करणारे भाडेवाढ करतात ते कसे चालते लोकांना ?
बसेस, विमाने यांची हमखास भाडेवाढ असते आणि नंतर परत कमी करतात. मग तिथे लोक का नाही ओरडत ? यात केवळ प्रायव्हेट नव्हे तर सरकारी सेवा सुद्धा असे करतात.
रिक्षा चालवणार्यांचे भविष्य
रिक्षा चालवणार्यांचे भविष्य काय असते? यांना कॅज्युअल, शनिवार, रविवार, सणाला सुटी असते कां? ४ दिवस आजारी पडले तर यांना सुटीचा पैसा मिळतो का? अशा काळात, बँका हफ्ते घेणे थांबवते का? वृद्धपकाळात यांना निवृत्ती वेतन मिळते कां? अतोनात पावसाने रिक्षा बंद पडली तर त्या काळात यांची गुजराण काय असते. मुलगा, आई आजारी पडल्यास, उपचार खर्च मिळतो कां? >>>>>> हे सगळे प्रॉब्लेम्स काय फक्त रिक्षावाल्यांनाच असतात का? हातावर पोट असलेले सगळेच लोक या परिस्थितीला तोंड देतात. रिक्षावाल्यांच्या निवॄत्ती वेतनाबद्दल बोलताय पण ते तर फटाक्याच्या कारखान्यात काम करणार्या लोकांपासुन ते हमाल, बुटपॉलिशवाले, फेरीवाले... अनंत प्रकारच्या लोकांना मिळत नाही. पण यातले बरेचसे व्यावसायिक "लोकांशी संपर्क येईल" असे काम करुनही इतका उर्मटपणा दाखवत नाहीत जितके रिक्षावाले दाखवतात.
रिक्षा चालवणे हा व्यवसाय आहे आणि त्या अनुशंगाने येणार्या रिस्क्स त्यात असणारच की.
भाडेवाढीबद्दल फारसा विरोध नाहीये, त्या बदल्यात मिळणारी सेवा किमान दर्जाची असावी इतकीच अपेक्षा.
कालचे उदाहरण, ठाण्यातल्या वाघबिळच्या आतल्या भागातुन माजिवड्याला जाण्यासाठी रिक्षा हवी होती.. किमान भाडे ६५-७० रु. जे कमी नक्कीच नाही. हा माणुस पेपर वाचत बसला होता, सोबत सामान होते आणि ५० वर्षाचे जे ना.त्याला म्हटले कमीतकमी मेन घोडबंदर रस्त्याला सोड जिथुन दुसरी रिक्षा तरी मिळेल तरी तयार नाही. शेवटी वैतागुन रिक्षात चढुन बसलो आणि त्याला सांगितले एक तर इच्छित ठिकाणी घेउन चल नाहीतर पोलिस ठाण्याला चल. मग आला गपगुमान.
अरे अजून कुणि उपोषणाला बसले
अरे अजून कुणि उपोषणाला बसले की नाही, रिक्षेवाल्यांच्या संघटनेविरुद्ध?
पहा बरे, अण्णा हजारेंनी उपोषण केले नि भारतातला भ्रष्टाचार संपला! तो बीबी बंद झाला की नाही? आता रिक्षेवाल्यांचा प्रश्न पेटला आहे की नाही, मग लग्गेच उपोषण करायला घ्या!
नाहीतर राज ठाकरेला सांगा, तो राडा करेल!
हे असे मार्ग आहेत भारतातले प्रश्न सोडवायला.
सुक्या मेव्याचे बॉक्स दुकानात
सुक्या मेव्याचे बॉक्स दुकानात बघत होतो. प्रत्येकावर दोन स्टीकर्स होते. एक सेलिंग प्राईस (सर्व करांसहीत) आणि दुसरे एमआरपीचे. सेलिंग प्राईस १७१ रू तर एमआरपी २०१ रु, यातले सेलिंग प्राईस काढून टाकण्याचे काम चालू होते. १७१ रू ही महाराष्ट्रातली किरकोळ विक्रीची किंमत आहे तर एमआरपी म्हणजे देशामधे या किंमतीच्या पलिकडे कुठल्याही भागात ही वस्तू विकली जाऊ नये याची किंमत आहे.
पण एमआरपी आल्यापासून व्यापा-यांनी तीच वसूल करायला सुरूवात केली आणि वस्तू हकनाक महाग झाल्या.
कधी कधी सेलिंग प्राईसचा आग्रह धरल्यास दुकानात देखील उर्मटपणाचा अनुभव येतो. रिक्षाचे मीटर फास्ट असणे आणि एमआरपीला ग्राहकाला लुबाडणे दोन्ही सारखंच.. दोन्हीपैकी कशाचे समर्थन करणार ?
त्यात काय, पुनः एकदा सांगतो,
त्यात काय, पुनः एकदा सांगतो, सप्लाय नि डिमांड.
अमेरिकेसारखी फ्री एकॉनॉमी हवी आहे ना? मग लोक जर एम आर पी देत असतील, तर तीच किंमत लावणार.
इथे सुद्धा सुरुवातीला काही गाड्यांना एम आर पी पेक्षा जास्त पैसे देऊन लोकांनी विकत घेतले. नाहीतर एरवी एम आर पी च्या २५ टक्के कमी करून सुद्धा गाडी मिळते.
सप्लाय अॅन्ड डिमांड!! इथे पूर्वी गिर्हाइकाशी उद्धटपणे बोलल्यास कंपनी नोकरीवरून काढून टाकत असे, धंदेवाल्यांचे धंदे बंद पडत. भारतात तसे कसे होणार? तेंव्हा भारतात गिर्हाइकाने पडतेच घ्यायला पाहिजे! मी सुद्धा क्वचित काही विकत घ्यायचे तर मिळते आहे यातच समाधान मानून किंमतीची घासाघिस करत नाही.
एकूणच भारतीय जनता म्हणजे कुणिहि यावे नि लाथा माराव्या, विशेषतः महाराष्ट्रात! बिचार्यांना त्यांच्या मातृभाषेत बोलायची चोरी!!!
http://www.mimarathi.net/node
http://www.mimarathi.net/node/11087
Pages