खळ्ळं खट्याक .. एक तरी रिक्षा पेटवायची आहे.

Submitted by Kiran.. on 8 October, 2011 - 00:58

नुकतंच रिक्षावाल्यांविरूद्ध खळ्ळ खट्याक आंदोलन झालं. त्या आंदोलनाच्या श्रेयावरून महाभारतही झालं. ईसकाळच्या बातमीमधे श्रीराम वैद्य नामक एका वाचकाची प्रतिक्रिया वाचली... फार छान झालं. मला पण एक तरी रिक्षा पेटवायची आहे. ही प्रतिक्रिया प्रातिनिधीक आहे का ? प्रतिक्रिया पटते का ? असल्यास का ? अशा प्रकारे लोकांनी कायदा हातात घेणं योग्य आहे का ?

रिक्षावाल्यांनी काय करावं अशी अपेक्षा आहे ?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे बापरे !
आज अचानक हा विषय वर आला. इतक्या दिवसांनी वाचताना जरा वेगळं वाटतंय. बरेचसे मुद्देही आता आठवत नाहीत. फक्त फारएण्ड यांनी उपस्थित केलेले प्रश्न पाहू...

आता वरती बर्‍याच ठिकाणी आलेला एक मुख्य मुद्दा: "रिक्षावाल्यांच्या बाबतीत सरकारचा आक्षेप का असावा आणि मार्केट रेट प्रमाणे त्यांना रेट ठरवू दे/भाडे नाकारायचा ही अधिकार असायला हवा" - यावर या एक दोन प्रश्नांमधे त्याचे उत्तर बहुधा सापडेलः
१. जेथे भरपूर रिक्षा आहेत (जास्त सप्लाय) तेथे मिनिमम भाडेसुद्धा लोक द्यायला तयार झाले नाहीत, तर त्यांना चालेल का?
२. त्याहीपेक्षा, हे सगळेच "खाजगी व्यवसाया"प्रमाणे समजून मग सरसकट उद्या पुण्यात सहा आसनी, डुक्कर वगैरे चालू झाले तर रिक्षावाल्यांना चालेल का?

मुळात रिक्षा हा आज कायदेशीर व्यवसाय आहे. सरकारला आज हस्तक्षेपाचा अधिकार आहेच. तो का नसावा हे पटवून देण्यासाठी इतर व्यवसायांची उदाहरणं दिली. पुण्यात झालेल्या सहा आसनी वादाच्या वेळी मी वर्तमानपत्रातून येणारी रिक्षावालाविरोधी मोहीम वाचली होती. त्यानंतर रिक्षा संघटनेशी चर्चा केल्यानंतर दुसरी बाजू सम्जली जी नंतर भावे नावाच्या एका सुह्शिक्षित रिक्षावाल्याने काही वर्षांनीं प्रसार माध्यमांद्वारे मांडली.

पुण्यात ज्या वेळी वीस हजार कायदेशीर रिक्षावाले होते तेव्हा तेहतीस हजार रिक्षा बेकायदेशीर होत्या. त्यावेळी अर्थातच आजच्या इतका वाहतुकीचा ताण नव्हता. साहजिकच रिक्षावाल्यांना धंदा मिळेनासा झाला. जर हा व्यवसाय कायदेशीर आहे म्हणून सरकारचं दर नियंत्रण आहे तर मग तेहतीस हजार बेकायदेशीर रिक्षा सरकार कसे चालवू देत होतं ? हे बेकायदेशीर रिक्षावाले बिल्ला, गणवेश तर सोडाच मीटरही मान्य करत नाहीत. त्यांना कसलीच बंधनं नाहीत कि परवाना रद्द व्यायची भीती नाही. पण मागणीपेक्षा पुरवठा मात्र जास्त झाला.

यावर उपाय म्हणून रिक्षावाल्यांनी शाळेच्या विद्यार्थ्यांची वाहतूक सुरू केली. या रिक्षांचे चालक भाडं अर्थातच नाकारतात. तसच ब-याच जणांनी बसप्रमाणे सीटाप्रमाणे दर आकारायला सुरूवात केली. म्हणजेच सरकारचं दरपत्रक आपोआपच कोलमडून पडलेलं आहे. त्यातच सहा आसनी रिक्षावाल्यांची भर पडल्याने धंदा करणं जिकीरीचं झालं. स्वतःच्या खर्चाने वाहतुकीचा व्यवसाय सरकारच्या नियमाने करायचा आणि सरकारने मात्र कायदेशीर संरक्षणाचं आश्वासन पाळायचं नाही यामुळे रिक्षावाले चिडले होते त्यातप्रसारमाध्यमांनी असहिष्णू भूमिका घेतल्याने आणि वाचकांच्या पत्रव्यवहासारख्या व्यासपीठामधून त्यावेळीही फक्त एकच एक भूमिका मांडली गेल्याने रिक्षावाले विरूद्ध सर्व असा सामना निर्माण झाला होता जे आजही होत आहे.

अशा वेळी दुसरी बाजू मांडणं हे कर्तव्य समजल्याने ती मांडली. यात लोकांना त्रास होईल अशा वर्तनाचं समर्थन करायचा उद्देश अजिबात नाही. फक्त आपणही समजून घेतल्याने समोरून चांगला प्रतिसाद मिळेल असं नक्कीच वाटतं इतकंच..

एक माहिती नाही म्हणून विचारतो - बिल्ला/गणवेश नसलेले चालक असलेल्या रिक्षा सरसकट बेकायदेशीर समजून त्यात बसू नये काय? सरकारचे, रिक्षा संघटनांचे याबाबतीत धोरण काय आहे? कायदेशीर रिक्षाचालकांवर तो अन्याय होतोय तर संघटना त्याबाबतीत काहीच का करू शकत नाहीत - का त्या रस्त्यावर असणे "लोकप्रतिनिधी-झोपडपट्टी" नियमाप्रमाणे त्यांच्या फायद्याचे आहे?

रिक्षावाल्यांशी मी शक्यतो गप्पा मारायचा प्रयत्न करतो. काही बोलतात, काही बोलत नाहीत. भाडे नाकारून त्यांचे कमी नुकसान कसे होते मला अजूनही कळलेले नाही. एक तास स्टॅण्डवर लाईनीत उभा असलेला रिक्षावाला जर पाच मिनीटाच्या अंतरावर गेला तर पुन्हा स्टॅण्डवर आल्यावर त्याला एकदम मागे उभे राहायला लागू नये अशी व्यवस्थापण करायला पाहिजे. मी हे ही पाहिलेले आहे सोयीचे नसलेले ठिकाण असेल तर पुढचे दोन तीन रिक्षावाले सोडून मागच्यांना तेथे पाठवतात. ते ही ठीक आहे. कारण ग्राहकाला रिक्षा लगेच मिळते, पुढच्या रिक्षावाल्याला जवळच्या अंतरावर जावे लागत नाही आणि लाईनीतील मागच्या रिक्षाला लगेच जवळचे का होईना पण गिर्‍हाईक मिळते.

असे काही तोडगे काढणे शक्य आहे. पण लोकांची सहानुभूती त्यांनीच "अर्न" करायला पाहिजे त्यासाठी. आणि ती एक पैशाचे नुकसान न करता केवळ नीट वागण्याने मिळू शकते. .

असे काही तोडगे काढणे शक्य आहे. पण लोकांची सहानुभूती त्यांनीच "अर्न" करायला पाहिजे त्यासाठी. आणि ती एक पैशाचे नुकसान न करता केवळ नीट वागण्याने मिळू शकते. . >>>>>फारएण्ड ला अनुमोदन.

सर्वच रिक्षावाले "उद्धट"नाहित,सर्वाना एका तराजुत तोलणे चुकिचे आहे.

फारेंडा, तुझ्या दोन्ही पोस्टांना अनुमोदन.

पण लोकांची सहानुभूती त्यांनीच "अर्न" करायला पाहिजे त्यासाठी. आणि ती एक पैशाचे नुकसान न करता केवळ नीट वागण्याने मिळू शकते>>>> अगदी अगदी...

रिक्शांची मोडतोड करणे वा पेटवणे वगैरे गोष्टी समर्थनीय नाहीत, भाववाढ होतेय तसे त्यांनाही योग्य ते पैसे मिळायला हवेत वगैरे सगळं मान्य, पण त्यांच्या आलेल्या बहुतांश अनुभवांवरून त्यांच्याबद्दल सहानुभूती वगैरे वाटत नाही. एरवी रिक्शेवाल्यांची बरीचशी अरेरावी सहन करत जनता नाईलाज म्हणून रिक्शांचा वापर करत असते. मग त्यांचा बंद वगैरे झाला तर लोकांच्या सहनशक्तीचा कडेलोट होऊन 'रिक्शा पेटवायचीये' वगैरे छापाच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत असाव्यात.

रिक्शास्टँड असेल अशा जागी बरेचदा रिक्शावाले घोळक्याने जमून निव्वळ टीपी करताना बरेचदा दिसतात. 'अमुक ठिकाणी जाणार का?' म्हणून विचारल्यावर 'हा जाणार, नाही तो जाणार' करून उभ्याउभ्या चर्चा करत बसणे, हिंजवडीसारख्या ठिकाणाहून औंधापर्यंत पाचशे रुपये मागून माजोरड्या आवाजात उर्मट उत्तरे देणे, बसलेल्या माणसाला गंतव्य ठिकाणापर्यंतचा रस्ता फारसा परिचित नाही म्हटल्यावर मुद्दाम लांबच्या रस्त्याने नेणे, मीटर बरेचदा वेगाने पळणारे असणे, त्यांची चूक निदर्शनास आणून दिली तर उलट आवाज चढवून तमाशे करणे, रिक्शेत गिर्‍हाईक बसलेले असताना पेट्रोल, डिझेल, इ. भरायचे काम उरकून घेणे मग त्या गिर्‍हाइकाला कितीही घाई का असेना, इत्यादी असंख्य बाबी आहेत. पुण्यात शिकायला आले तेव्हा पहाटेच्या वेळी ट्रॅव्हल्स बशीतून उतरल्यावर रिक्शा मिळवून होस्टेलावर पोचणे, हे एक दिव्य असायचे. पहाटेच्या वेळी लोक नडलेले आहेत हे पाहून मीटरबिटरच्या भानगडीत न पडता पन्नास-ऐंशी असा तोंडाला येईल तो आकडा सांगत असत. हे अनुभव पुण्यातही आले आहेत आणि बंगळुरातही. 'भांगेत तुळस' तसे अगदी कधीमधीच चांगले, सज्जन, योग्य मीटर असणारे, मोड नेमकी परत करणारे रिक्शावाले वाट्याला येतात. बाकीच्या रिक्शावाल्यांपेक्षा ठरावीक रक्कम घेणारे सिक्ससीटरवाले परवडले एकवेळ. आधी सिक्ससीटर होत्या तेव्हा मी निगडी, हडपसर, नगररोड अशा लांबच्या ठिकाणी जायला त्यांचा वापर करायचे. जी गोष्ट सहज उपलब्ध आहे, भाडं परवडेलसं आहे, तिचा वापर जास्त होणारच.

सिंगापुरातही प्रचंड महागाई आहे. टॅक्सीचे दर चढे आहेत. तरी टॅक्सीचालकांना ठरावीक उत्पन्न मिळायला भरपूर मेहनत करावी लागते. टॅक्सी स्वतःची नसली तर द्यावे लागणारे भाडे बरेच असते. शिवाय शिफ्ट असेल तर कमी वेळच टॅक्सी चालवायला मिळते, साहजिकच उत्पन्न कमी होते. (बर्‍याच टॅक्सीवाल्यांशी गप्पा मारताना मिळालेली माहिती!) बस आणि लोकलचे नेटवर्क जबरदस्त आहे. असे असूनही आलेले अनुभव कायमच चांगले आहेत. जे काही दर आहेत ते टॅक्सीच्या काचेवर स्पष्ट लिहिलेले असतात. चालवणार्‍या ड्रायव्हराचे फोटो ओळखपत्र काचेच्या आत गिर्‍हाइकाला दिसेल असे चिकटवलेले असते. अगदी पाच सेंटांपर्यंतची मोडही बिनचूक परत मिळते हे पहिल्यांदा पाहिले तेव्हा गहिवरूनच आले होते. मध्यरात्रीचा अधिभार हा बारा वाजल्यानंतर मोजायला सुरूवात होते आणि ते मीटरमध्येच स्वयंचलितरीत्या अ‍ॅड व्हायला लागते. एकदा एका ड्रायव्हराला खरोखरच पेट्रोल भरायची निकड होती, त्यामुळे पेट्रोलपंपावर जावे लागले, तेव्हा त्याने झालेल्या रकमेतला एक डॉलर आपणहून कमी केला. कितीही जवळचे अंतर असले तरी भाडे नाकारत नाहीत, एअरपोर्टापर्यंत जायला वा तिकडून येताना वेगळे दर नसतात, इत्यादी गोष्टी अनुभवल्यानंतर आपल्याकडच्या बहुसंख्य रिक्शावाल्यांचं वागणं बोचतंच.

एक गीत स्वः रफी साहब और रिक्षा की याद मे,
मैं रिक्षावाला, मैं रिक्षावाला,
कहाँ चलोगे बाबू, कहाँ चलोगे लाला !

रिक्शास्टँड असेल अशा जागी बरेचदा रिक्शावाले घोळक्याने जमून निव्वळ टीपी करताना बरेचदा दिसतात. 'अमुक ठिकाणी जाणार का?' म्हणून विचारल्यावर 'हा जाणार, नाही तो जाणार' करून उभ्याउभ्या चर्चा करत बसणे, >>> बरोबर - बिग बझार/सिटीप्राईड कोथरूड समोरचा स्टॅण्ड, पौड रोडवर किनारा हॉटेल समोरचा स्टॅण्ड येथे हे चित्र कधीही बघायला मिळते.

रिक्षा चालवताना वार्‍यावर आपली पिचकारी सोडून देणारे तर एक नं कोडगे असतात. प्रत्येकाला आत्तापर्यंत शेकडो प्रवाशांनी तसे न करण्याबद्दल सांगितलेले असणार, तरी प्रत्येक नवीन प्रवाशाच्या वेळेस ही टेप पुन्हा वाजते.

काही गोष्टींची थोडी माहिती जमा केली तर यावर चांगले तोडगे निघू शकतील. सीआयआरटी/आरटीओ किंवा एनजीओंपैकी कोणी याचा रिसर्च केला आहे काय कोणास ठाऊक:
१. जेथे रिक्षावाल्यांना बराच काळ स्टॅण्डवर वाट पाहात थांबावे लागते असे स्पॉट्स व अशा वेळा. जेथे किती रिक्षांनी एका वेळेस उभे राहावे याची काहीतरी गाईडलाईन ठरवता येइल. (आणखी रिक्षा उभ्या राहिल्या तर बराच वेळ लागेल अशी तेथे माहिती असावी). यात वेळही महत्त्वाची आहे. उदा: शिवाजीनगर स्टेशनवर दुपारी जेव्हा मुंबईहून येणार्‍या गाड्या नसतात तेव्हा ही वेळ जास्त असेल पण संध्याकाळी सिंहगड्/डेक्कन च्या वेळेस कमी असेल.
२. जवळचे अंतर न घेता किती वेळ स्टॅण्डवर नुसते बसले तर जास्त नुकसान होते याचे गणित. उदा: अर्धा तास काही न मिळण्यापेक्षा जवळचे अंतर घेउन तेथून दुसरे गिर्‍हाईक शोधणे जास्त बरे असे काहीतरी
३. स्टॅण्डवरून जवळचे अंतर असेल तर पहिले २-३ जण सोडून मागच्यांनाच जाऊ देणे. किंवा जरा सिम्प्लिफाईड पद्धत म्हणजे लोकांनीच उलटीकडून विचारायचे.
४. मध्यवर्ती ठिकाणांहून संध्याकाळी "दुर्गम प्रदेशात" जाण्यासाठी थोडे जास्त भाडे.
५. जेथे लोकांना बराच काळ रिक्षा मिळत नाही अशा ठिकाणी फोन करून रिक्षा बोलवण्याची व्यवस्था
६. कोठे जाण्यासाठी कोठे रिक्षा जास्त सहज मिळेल याची माहिती - उदा: पूर्वी सेनापती बापट रस्त्याकडे जाणार्‍या रिक्षा गुडलक चौकात सहज मिळत, सध्या कोथरूड कडे जाणार्‍या नळस्टॉप चौकात त्या बाजूला शक्यतो मिळतात.

असे इतरही प्रश्न विचारून काहीतरी मार्ग निघू शकेल.

रिक्षा बंद करून नॅनो चालू करणे Proud
(स्वगत : मग काही काळाने माबोवर धागा दिसेल "एक तरी नॅनो पेटवायची आहे")

.<< मध्यवर्ती ठिकाणांहून संध्याकाळी "दुर्गम प्रदेशात" जाण्यासाठी थोडे जास्त भाडे.>>???
फारेंड, दुर्गम प्रदेशातून मध्यवर्ती भागात (पक्षी: संगमवाडी, पाटील इस्टेट पुलाच्या मागचा भाग, बॉम्बे सॅपर्स इथून पेठ भाग, लक्ष्मी रोड, इ.) यायला सुद्धा संध्याकाळी ५ नंतर रिक्षावाल्यांच्या मिनतवार्‍या कराव्या लागतात हा माझा रोजचा अनुभव होता गेले काही महिने. बस कधीतरी सठीसामाशी एखादी, मनात असेल तर थांबणार. गरगरणार्‍या मीटरकडे बघायचंच नाही. नास्तिकाला सुद्धा आस्तिक करून टाकणारी परिस्थिती आहे...

परवा पावसात अडकले रात्री म्हणून डायल अ‍ॅन ऑटो ला फोन केला तर त्यांनी सांगितलं की कमीतकमी २ तास आधी बुक करावी लागते. शिवाय आत्ता रात्री पावसात कोण येणार? Uhoh

याउलट सकाळी ९ वाजता पेठेत रिक्षा शोधताना मला परवा 'मूड नाही' आणि 'अजून वर्तमानपत्र वाचून व्हायचंय' अशी उत्तरं पाठोपाठ मिळाली... मी इतके दिवस रिक्षावाल्यांची बाजू समजून घ्यावी वगैरे अशा मताचीच होते पण आता जरा जास्तच होतंय असं वाटत नाही का? ज्यांना गरज असते ते अशी उत्तरं देऊ शकतात?

अर्थात म्हणून जाळपोळ मोडतोड हे त्यावर उपाय नाहीत हे सुद्धा तितकेच खरे!!

थ्रेडचा उद्देश आताशी आठवला.

हा थ्रेड टाकला तेव्हा रिक्षा मोडतोड, पेटवणे सुरू झालेलं होतं. म्हणूनच इतकी टोकाची प्रतिक्रिया ज्या कारणांसाठी दिली जातेय ती फसवणूक तर सगळेच व्यावसायिक करीत असतात.. मग त्यांच्याबाबतीत पण हाच न्याय लावणार का असा मुद्दा होता.

फसवणूक कुणाचीच मान्य करता येऊ शकत नाही. समर्थन होऊशकत नाही. फक्त सगळ्या व्यावसायिकांच्या फसवणुकीचं रिक्षावाला हे प्रतीक होतंय असं वाटतं.. तसं होऊ नये. रिक्षावाल्याचे दुर्गुण कमी अधिक प्रमाणात इतरातही आढळून येतात तर रिक्षावाल्यांचे प्रामाणिकपणचेही अनुभव कमी नाहीत.

हा थ्रेड टाकल्यानंतर मी नुकताच रिक्षावाल्यांशी बोललो. आरटीओचं नियंत्रण पूर्ण काढणे हा उपाय चालेल का असा प्रश्न विचारला. त्याचे होणारे तोटे आणि फायदेही समजावून सांगितले. ब-याचशा रिक्षावाल्यांना मत देणंच जमलं नाही. काही एकदम विरोधात गेले. विरोधाचं कारण मात्र देता आलं नाही ( जे चाललय त्याला यूज्ड टू मानसिकता नव्याचा सहसा सहजासहजी स्विकार करत नाही फक्क्त गणेश यादव कि सातव नावाच्या एकाला मी काय म्हणतोय हे कळलं. तोटा झाला तरी आपला, फायदा झाला तरी आपला. दरनियंत्रण नसणार. जिथे रिक्षा जास्त असतील तिथे कमी दरात व्यवसाय करावा लागणार. तर जिथे कमी असतील तिथे ग्राहकाला महाग दराचा सामना करावा लागणार. पण नाईलाज आहे. ग्राहक देखील खूपच एकांगी विचार करतात. सर्वसामान्य वाहतुकीसाठी बसवाहतूक हे साधन आहे. वैयक्तिक वाहतूक ही लक्झरी झाली. तिच्यासाठी जरा जास्त पैसे मोजावेच लागतात. रिक्षा ही काही सगळ्यांना परवडणारी वाहतूक नाही. रोज ऑफीसला जाण्यासाठी कुणी रिक्षा वापरत असेल असं वाटत नाही.

हिंजवडीचे रिक्षावाले माजलेत याला कारण ग्राहकच आहेत. बंगलोर मधे आयटी येण्याआधी रिक्षावाले भरभरून शहराची माहिती सांगायचे. दर व्यवस्थित असायचे. पण आयटी आल्यापासून पैशाबाबतीत बेफिकीर असलेले तरूण एका चौकातून दुस-या चौकाता जायचेही शंभर रूपये देऊ लागले म्हटल्यावर त्यांनाही तीच सवय लागली. तिथे भाजीवाले, फळंवाले यांचेही दर चढेच आहेत. कसलाही विचार न करता मागितले तितके पैसे फेकणारे ग्राहक असल्त्ल्यावर भाव उगीच वाढले तर दोष कुणाला द्यायचा ? असो.

रिक्षा कंपनीतून विकत घेतानाच परवाना कंपल्सरी करावा.. म्हणजे बेकायदेशीर रिक्षावाले यणार नाहीत. एका माणसाला एकच रिक्षा द्यावी.

हे खळ्ळ आंदोलन म्हणज्र रिक्षावाल्यानी आप्ल्या पक्षाला सपोर्ट करावा म्हणून केले होते असे म्हणतात.. यात जनहिताचा काही संबंध नव्हता.

बरोबर - बिग बझार/सिटीप्राईड कोथरूड समोरचा स्टॅण्ड, पौड रोडवर किनारा हॉटेल समोरचा स्टॅण्ड येथे हे चित्र कधीही बघायला मिळते. >> जोरदार अनुमोदन. तेथील रिक्शावाल्यांना बहुतेक कुठेच जायचे नसते. एकदा मला तिथुन रेल्वे स्टेशनला जायचे होते तेव्हा १० रिक्शांपैकी एकही तयार झाला नाही वेळ संध्याकाळी ६:४५. त्याचवेळी तिथे अजुन एक मुलगी होती जिला मारुती मंदिरला जायचे होते. तर तिला पण नाही सांगितले. शेवटी अजुन पुढे येउन आम्ही दुसरी रिक्षा केली .

वाचतिये... आणि सहमत ही आहे...
पुण्यातले रिक्शावाले तर खरंच जास्त प्रमाणात "उर्मट" आहेत...

कधी कधी तर खरंच "अडला हरी..." म्हणायची वेळ येते..
अगदी पोलिसांनाही जुमानत नाहीत मग.

"मला आत्ता या भागात घरी जायचा आहे त्यामुळे मी तिकडंच च भाडं घेणार" म्हणणारे तर हमखास भेटतातंच...

हिंजवडीचे रिक्षावाले माजलेत याला कारण ग्राहकच आहेत.<<< आणि बाकीच्या ठिकाणी जे माजोरडेपणाने वागतात, त्यालाही ग्राहकच जबाबदार का? कदाचित ग्राहक दिसला रे दिसला कीच रिक्शेवाल्यांच्या डोक्यात तिडीक जात असावी. Happy इतर व्यवसायांतही वस्तूंचे / सेवेचे चढे दर अनुभवाला येतात. पण चढे दर खेरीज उर्मटपणा हे काँबो नकोसं होतं. एखाद्या दुकानात वाईट अनुभव आला तर मी पर्यायी दुकान निवडते. पण अनेक रिक्शावाल्यांकडून बहुतेकवेळा वाईट अनुभव आल्यावर संतापच येणार.

वैयक्तिक वाहतूक ही लक्झरी झाली. तिच्यासाठी जरा जास्त पैसे मोजावेच लागतात. रिक्षा ही काही सगळ्यांना परवडणारी वाहतूक नाही. रोज ऑफीसला जाण्यासाठी कुणी रिक्षा वापरत असेल असं वाटत नाह <<< जास्त पैसे मोजायला कुणाची ना नाहीये. पण मग त्याला साजेशी सेवा पण द्या की. साजेशी शक्य नसेल तर किमान सेवा तरी? आणि ज्याचं ऑफिस जवळपास असेल असा माणूस वापरतो रोज रिक्शा! माझ्या एका मैत्रिणीने रिक्शावाला ठरवून घेतला होता ऑफिससाठी! जे काही दर आकारायचेत ते एकमताने ठरवून छापा आणि नेहमी फॉलो करा, एवढी अपेक्षा अवास्तव नसावी. बाकी वर कुणीतरी 'रिक्शा हादेखील व्यवसायच आहे' अशा अर्थाचं काही लिहिलं होतं. वर बर्‍याच जणांनी लिहिलेले अनुभव वाचून खुद्द रिक्शावाल्यांना तसं वाटतं का याची शंका वाटते.

माझ्या सहज मनात आले कोणी रिक्षावाला जर हे वाचत असेल तर ? त्यांची काय बाजू आहे हे त्यांच्यापैकी कोणी येथे येऊन मांडू शकले तर ?

येथे रिक्षावाल्यांच्या विरोधात लिहिणार्‍या लोकांनी कधी हा विचार केला आहे का, की त्यांची दिवसाची मिळकत (सर्व खर्च वजा जाता) किती असु शकते ? त्यामधे त्यांचे घर कसे चालत असेल ? मला तरी आजकाल रिक्षा हा प्रकार बर्‍यापैकी अव्यवहार्य आणि असमतोल असलेला व्यवसाय दिसतो आहे.

रिक्षावाल्याला गिर्‍हाईक नाकारण्याचा अधिकार असला पाहिजे.. सगळ्याच व्यावसायिकाना अगदी डॉक्टरलाही हा अधिकार असतो.

रिक्षावाल्याला गिर्‍हाईक नाकारण्याचा अधिकार असला पाहिजे.. सगळ्याच व्यावसायिकाना अगदी डॉक्टरलाही हा अधिकार असतो. >> मान्य, पण अगदी जेन्यूईन अडचण असेल तर. पण इथे पुण्यातले रिक्षावाले ऊठसूठ भाडी नाकारतात. कोल्हापूरात मी आयुष्याची १८ वर्ष काढली पण तिथे आधी रिक्षेत बसून मग कुठे जायचे ते सांगायची पद्धत होती. इथे रिक्षेवाला आधी विचारतो... मग आपण बसतो किंवा नाही बसत. मग प्रश्न पडतो की आपल्या सोयीसाठी रिक्षा आहे की रिक्षेच्या सोयीसाठी आपण? Uhoh
माझ्या घरापासून एकदा भांडारकर रोडपर्यंत रू. ७२/- झालेले असताना (मिटर रिडींग ७.१०) मला सांगताना रू. ७५/- सांगण्यात आले. कार्ड पाहू म्हणल्यावर सॉरी सॉरी चुकून ७५ वाचले. तिथून परत येताना दुसर्‍या रिक्षेचं मिटर रिडींग ५.१० झालं, रू. ४८ का किती. याचं मिटर गंडलय असा विचार आला डोक्यात. दुसर्‍या दिवशी पुन्हा गेले तर थोड्या फार फरकाने मिटर रिडींग ५.५० च्या वर गेले नाही. म्हणजे पहिल्या दिवशीच्या पहिल्या रिक्षेच्या मिटर मध्ये गडबड होती. अशा बेईमान माणसांना शिक्षा व्हायला नको? आम्ही काय दरोडे टाकून पैसे कमवतो का?
कर्वे नगर मधुन सिंहगड रोडला येत नाहीत, आले तर भाडं मिळत नाही म्हणून दहा रू. जास्ती मागतात. Angry
अशी भाडी नाकारत राहिले तर पैसे कमवणार कुठुन? मग संसार कसे चालणार यांचे? Uhoh

खालील मुद्द्यांवर विचार व्हावा...
१. रिक्षाचा सुरूवातीचा खर्च (विकत घेणे, परमिट, इ.)
२. रनिन्ग कॉस्ट (पेट्रोल, डिझेल, गॅस, इ.)
३. मेन्टेनन्स खर्च
४. इन्शुरन्स
५. वेगवेगळे हप्ते (लोन, रिक्षा स्टॅण्ड वर्गणी, चोर, पोलिस, इ.)

आता या सर्व बाबी पहाता दिवसाचा नफा हा असा किती असणार आहे ?
वाढत्या महागाईमधे रोजचा घरखर्च, मुले असतील तर त्यांच्या शिक्षणाचा खर्च, वैद्यकिय खर्च, इ. गोष्टींना हे लोक कसे तोंड देत असतील ? त्याच वेळी आजुबाजुला लोकांचे वाढते उत्पन्न पाहून साहजिकच चिडचिड होत असणार. मग त्यामुळे शक्यतो जवळची भाडी नाकारून आणि लांबची भाडी स्विकारून जास्त पैसे मिळविण्याचा प्रयत्न करत असणार.
तसे तर अनेक प्रतिष्ठित लोक/व्यवसाय छोट्या मोठ्या भानगडी करत असतात, त्यांच्या दिसुन येत नाहीत यांच्या दिसुन येतात.

अशी भाडी नाकारत राहिले तर पैसे कमवणार कुठुन? मग संसार कसे चालणार यांचे?<<:अओ:
दक्षिणा....अनुमोदन

साहजिकच चिडचिड होत असणार>> म्हणून भाडी नाकारायची? म्हणून उर्मटपणे वागून इतरांचा राग ग्राहकांवर काढायचा? Happy ह्याने त्यांच्या राहणीमानात सुधारणा होणारे का?

अनेक उपाय वर चर्चिले गेले आहेत, ते व्यवहार्यही आहेत. ते मानायला किती रिक्षावाले तयार होतील हा कळीचा मुद्दा आहे.

साधा सप्लाय अँड डिमांडचा नियम आहे. भारतात सप्लाय कमी डिमांड भंयकर जास्त. मग कशाला गिर्‍हाइकांची पर्वा करायची?
गिर्‍हाइकांनी समजून घ्यायला पाहिजे की आपण पडते घ्यायला पाहिजे.

मला भेटलेला प्रामाणिक रिक्षेवाला. एकदा डांगे चौक, चिंचवड च्या आसपास मी औंधहून रिक्षाने पोचलो.
त्याला एक रुपया परत करायचा होता, पण माझ्याजवळ फक्त दोन रुपयाचे नाणे होते. मी म्हंटले हेच घे झाले. तो म्हणाला नाही साहेब असे फुकटचे पैसे कसे घेणार? तुम्ही बसा मी तुम्हाला थोडे पुढे नेऊन सोडतो!!

मी २००५ मधे हिंजवडीत होतो. हिंजवडीतून बाहेर पडण्याचा किंवा आत येण्याचा एकमेव उपाय म्हणजे सहा 'आसनी' रिक्षा! त्या रिक्षा बारा माणसे भरल्याशिवाय चालूच होत नसत, काहीतरी मेकॅनिकल प्रॉब्लेम आहे म्हणे. शिवाय प्रत्येक रिक्षात एकतरी संसर्गजन्य रोग असलेला माणूस असलाच पाहिजे असा कायदा होता. पण सहा रुपयात म्हणजे १०, १२ सेंटमधे आणखी काय अपेक्षा करणार? शिवाय ते पूर्णपणे आमच्या कॉलेजपर्यंत जात नसत. मी त्याला म्हंटले मी प्रत्येक वेळी तुला १०० रु. देईन, पण तू मला पूर्णपणे घेऊन जा. तो नाही म्हणे. कारण तत्वाचा प्रश्न आहे! पैशासाठी संस्कृती, तत्व विकणार नाही!!

माझ्याबरोबर एक ३२ वर्षाची इंग्लंडमधे शिकून आलेली प्रोफेसर मुलगी होती. तिला सहा आसनी रिक्षा आवडली नाही, मग आम्ही पाचशे रुपये घेऊन लक्ष्मी रोडला नेणारा रिक्षेवाला शोधला. पैसे थोडे जास्त आहेत असे लोक म्हणाले, पण तो रिक्षेवाला दिसायला धट्टा कट्टा होता, त्या मुलीला तो आवडला, ती म्हणाली आपण याच्याच रिक्षाने जाऊ. म्हणून आम्ही त्याच्याच रिक्षाने जात असू.
शिवाय तो रिक्षेवाला म्हणजे धमाल. बस आणि स्टॉप याच्या मधून रिक्षा घालायचा. म्हणजे बसमधून उतरताना हमखास रिक्षा खाली येणार. मग तो त्यांच्याच अंगावर ओरडणार, दिसत नाही का?
एकदा मी त्याला म्हंटले जरा मीटर लाव, बघू तरी किती पैसे होतात. तो म्हणाला मी मीटर कधीच लावत नाही. पोलीसने पकडले तर सांगतो, ही रिक्षा कुणाच्या मालकीची आहे माहित आहे का? मी नाही कायदे वगैरे पाळणार तुमचे. मग पोलीस सॉरी, सॉरी म्हणून निघून जातात.

मला अमेरिकेतली आठवण आली. पोलीसने रस्त्याच्या बाजूला उभे राहून नुसते बोटाने खुणावले तरी मुकाट्याने गाडी रहदारीतून बाहेर काढून शांतपणे उभे रहायचे, पुनः अदबीने बोलायचे. हिंमत नाही कुणाचीच असे न करण्याची!!!

काय बोलणार, ज्या देशात रहायचे तसे वागायचे. आपण नीट वागलो की लोकहि आपल्याशी नीट वागतात. मला कुणी उध्धटपणे बोलले नाहीत, नेहेमी या साहेब, बसा साहेब!

भारतात असे काहीतरी आहे की नोकर, रिक्षेवाले वगैरे लोकांशी उद्धटपणे, त्यांच्या अंगावर खेकसूनच बोलायचे, इथे मात्र भंग्याशी बोलताना सुद्धा थँक यू नि प्लीज म्हणायची पद्धत! भारतात ठरल्या वेळेच्या जेव्हढे उशीरा याल, तेव्हढे तुम्ही 'मोठे लोक'. इथे तसे काही नाही, उशीरा आलात तर मुकाट्याने सॉरी म्हणा.

चांगले काय नि वाईट हे म्हणण्यात अर्थ नाही. जसे आहे तसे आहे, यातून आपण कसे वागायचे ते ठरवा.

पूर्वी सर्व माणसे जंगलात रहात. आवडले नाही काही की हाणा, मारा, जाळा. उच्च भारतीय संस्कृतीत असे पूर्वी नव्हते. वाटाघाटी, अहिंसा इ. ला मान होता. आता मनसेच्या मते हाणा, मारा, जाळा! मला वाटते बुद्ध मंदिरात, म. गांधींच्या पुतळ्याखाली सुद्धा ते हाणा, मारा, जाळा करणार. विधानसभेत केलीच होती गुंडगिरी!

मग त्यामुळे शक्यतो जवळची भाडी नाकारून आणि लांबची भाडी स्विकारून जास्त पैसे मिळविण्याचा प्रयत्न करत असणार.
<<< रोज जवळची भाडी नाकारून अमुक एका रिक्शास्टँडावर थांबल्यास अमुक इतकी लांबची भाडी मिळतील, हे कसं जाणून घेणार? ज्योतिषाला रोज हात दाखवून?

खालील मुद्द्यांवर विचार व्हावा...
१. रिक्षाचा सुरूवातीचा खर्च (विकत घेणे, परमिट, इ.)
२. रनिन्ग कॉस्ट (पेट्रोल, डिझेल, गॅस, इ.)
३. मेन्टेनन्स खर्च
४. इन्शुरन्स
५. वेगवेगळे हप्ते (लोन, रिक्षा स्टॅण्ड वर्गणी, चोर, पोलिस, इ.)

<<<< अशा प्रकारचे सुरुवातीचे व नियमित खर्च प्रत्येकच व्यवसायात असतात. अडचणी येतात. पण म्हणून व्यावसायिक ग्राहकांवर उगीचच अरेरावी करत नाही. केलीच तर त्यालाही त्याचे परिणाम भोगावे लागतात.

खरंतर पुण्यातली सार्वजनिक बसव्यवस्था तितकीशी चांगली नाही. लोकल वगैरे आहेत, त्या सर्वदूर नाहीत. रिक्शावाल्यांनी जर नीट सेवा देऊ केली तर बरेच लोक रिक्शांचाच पर्याय निवडू शकतील. सध्याही बरेचदा लोक जातातच रिक्शेने. पण स्वतःच मनमानी करायची आणि वर 'समजून घ्या' म्हणायचं, हे मात्र अनाकलनीय आहे.

सिंगापुरातल्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे समांतर उदाहरण देणे इथे सयुक्तिक होईल. सुरुवातीला जेव्हा या विक्रेत्यांनी व्यवसाय सुरू केले तेव्हा त्यांच्या कामांत भरपूर त्रुटी होत्या. परवाने थोडक्या लोकांकडे होते. इथली नगरपालिका आणि या लोकांमधून विस्तव जात नसे. हे लोक अस्वच्छता करतात, परवाने बाळगत नाहीत, त्यामुळे यांना काढूनच टाका, यांचा व्यवसाय बंद करा, असं नगरपालिकेतले अधिकारी म्हणत. विक्रेत्यांनी मात्र अडचणी असूनही आपल्या ग्राहकांना देण्यात येणार्‍या सेवेत कधीच कसूर केली नाही. त्यामुळे जनता कायमच त्यांच्या बाजूने राहिली. आणि जनतेच्याच विरोधामुळे अधिकार्‍यांना या विक्रेत्यांना काढून टाकण्याऐवजी सोयीस्कररीत्या सामावून घेता येईल, असाच पर्याय शोधणं भाग पडलं.

पण तो रिक्षेवाला दिसायला धट्टा कट्टा होता, त्या मुलीला तो आवडला >>>
मुक्तपीठ मोड ..

मगं पुढे काय झालं? की तुम्ही लक्ष्मी रोड आल्यावर उतरलात? की त्या रिक्षावाल्याने फोन नं एक्झेंज केला. सांगा पुढची ष्टोरी. Happy

आम्ही काय दरोडे टाकून पैसे कमवतो का? >> वेल सेड. औंध, पिंपळे सौदागर, वाकड, इत्यादी कडे रिक्षात बसायचे म्हणजे २०० रू हवेत. पिंपळे सौदागर ते शिवाजीनगर, डेक्कन किमान २००, ( विंग्स कॅब करून गेले तरी स्वतच पडेल निदान कारने तरी जाता येते) . शिवाय ह्या भागातील लोक सर्व श्रीमंत, बिलकूल भाव ठरवणार नाहीत, मग काय? हे रिक्षावाले निदान ह्या भागात डोक्यावर बसले आहेत.

उपाय :
पिंप्री आणि पुणे अशा रिक्षा एकच व्हायला हव्यात. त्या बसं कंपनी बहुदा PMPL सारख्या. जेणे करून सर्वांना मिटर लागू होईल. पैसे गेले तरी हरकत नाही, पण काय ते कायदेशीर असतील. एकाला २००, दुसर्‍याला २५० असे नाही.

माझा दुसरा गमतीशीर अनुभव पार्ल्यातला. वास्तविक हनुमान रोडवरून पार्ले स्टेशनजवळच्या मार्केटमधे जायला रिक्षा कशाला? पण बरेचदा बरोबरच्या लोकांच्या आग्रहास्तव रिक्षा. त्या वेळी त्याचे कमीत कमी दराने आठ रु. होत. मग दहाची नोट दिल्यावर बिचार्‍या रिक्षेवाल्याजवळ चिल्लर नसायची! पहिले एकदोनदा मनात विचार आला की "स्साला, मी काय पौडाहून आलो काय रे? चिल्लर नाही सांगतोय्, X%& भीक मागून घे की पैसे, बनवतो कुणाला, वगैरे वगैरे". पण तो मनातच ठेवला. वरकरणी हसून म्हंटले बरे, राहू दे. त्यावर पार्ल्यात रहाणारे भडकले. तुम्ही अश्या वाईट सवयी त्यांना लावता म्हणूनच हे माजले आहेत! म्हंटले पार्ल्यातले हजार लोक शेकडो वेळा रिक्षाने इकडून तिकडे जातात. मी एकटा, तीन चार वर्षातून पाच सहा दिवसासाठी येतो, माझ्या मुळे का त्यांना 'सवय' लागणार आहे?
पण मी पडलो अमेरिकेतला, मला काय कळते?

अहो झक्की Proud पण तुम्ही त्या एका रूपयातल्या अंतरात उगाचच पुढे गेलातच का? निष्कारण मागे ही यावं लागलंच की हो. अमेरिकेत चालते का हे? ठेवून दे रे दोन डॉलर असं म्हणता का?

पण मुद्दा रिक्षेवाल्याच्या प्रामाणीकपणाचा आहे. माझे काही का होईना, तो तर प्रामाणिक ठरतो ना!
ठेवून दे रे दोन डॉलर असले श्रीमंतीचे प्रदर्शन अमेरिकेत परवडत नाही हो! सेंट, सेंट करून पैसे मिळवतो, असे उधळून श्रीमंती दाखवायला गेलो तर लोक यडा म्हणतील, श्रीमंत नाही!!

पैसे उधळणे, काम न करता आयते बसून लोकं आपली कामे करतील अशी अपेक्षा करणे, समोर अन्न ठेवले तरी आग्रह केल्याशिवाय खायचे नाही नि मागून शिव्या देणे, उशीरा येणे वगैरे भारतातल्या पद्धती, इथे लोकप्रिय नाहीत. आपण असे केले तर आपलेच नुकसान.

Pages