Submitted by उमेश वैद्य on 5 October, 2011 - 09:05
विहंग
जसे उगवती नभी विहरती खगांचे थवे
तसेच असती प्रतिक्षण नवे जगाया हवे
मजेत क्रिडती नसे अमुकची तयांना दिशा
पहात उडती उषा परतती बघता निशा
खुषाल क्षण जे समीप तव ते उभे राहती
तिथेच रमणे तया गमत ना कशाची भिती?
विहंग गलका तरंग उठता जळी पांगला
निमीत्त कण जो मिळेल टिपण्या तिथे रंगला
क्षणात उडता ढगात शिरता तयांच्या मनी
निळॆच जलधी निळॆच नभही तया लागुनी
इथे मजसवे असोत सगळे सुखाचे धनी
परी न तसली सुखे मिळत ना मला जीवनी
असेच जगणे मला न जमले खगांच्या परी
उदास उरणे उगाच हसणे नशीबा वरी
उमेश वैद्य २०११
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
सुंदर, खूप आवडली.
सुंदर, खूप आवडली.