कास पठारावर जाण्याची ही दुसरी वेळ. मागच्या वर्षी जरासे लवकर की उशिरा गेलो होतो. यावर्षी इथली अनेकांची कासची प्रकाशचित्रे बघुन जीव कासाविस झाला होता. शेवटी जमवलेच. कास पठाराकडे जाताना नेहेमी मी रस्ता चुकतो व ठोसेघर धबधब्याकडे जातो. या वर्षीही तेच केले. धबधबा बघुन पुढे चाळकेवाडीला गेलो व कासप्रमाणेच तिथलेही पठार फुलांनी फुललेले दिसले. कासला गर्दीत काढण्याऐवजी इथेच प्रकाशचित्रे काढावीत हा विचार केला व जास्तीत जास्त प्रकाशचित्रे काढुन घेतली.
तिथल्या पवनचक्क्या व फुललेले पठार बघुन मी व कुटुंब अगदी जगदीश खेबुडकरांच्या
मऊ मऊ माझ्या पंखांची, नक्षी सुंदर रंगांची
धुक्यात फिरता इकडे तिकडे दवबिंदुंनी न्हालो
फूलपाखरु झालो मी फूलपाखरु झालो
या कवितेप्रमाणे फुलपाखरु झालो होतो. या सगळ्या गडबडीत कासला पोचायला उशिर झालाच. त्यामुळे सकाळी जे कडक ऊन होते ते गायब झाले होते व वातावरण ढगाळ झाले होते. अमाप गर्दीमुळे यावेळी कास तलावापर्यंत जाता आले नाही त्यामुळे कंदीलपुष्प व इतर अनेक फुलांची प्रकाशचित्रे राहुनच गेली.
अधिक माहीतीसाठी http://www.kas.ind.in/ या साईटला भेट द्या. इथे सर्व माहीती मिळेल. आत्ता १५ सप्टेंबरपासुन चांगला सिझन आहे. कास चे एक अँड्रॉइड अॅप पण आहे. ते माहितीकरता उत्कृष्ठ आहे. या वर्षी कारवी पण फुलली आहे त्यामुले या १०-१५ दिवसात नक्की भेट द्या.
या वर्षी जायचे ठरले आहे. कधी
या वर्षी जायचे ठरले आहे.
कधी पर्यन्त फुले असतात.
वॉव...amazing फोटोज़. मस्तं.
वॉव...amazing फोटोज़. मस्तं. पुन्हा पुन्हा पाहतेय.
http://www.kas.ind.in/ या
http://www.kas.ind.in/ या साईटला भेट द्या साकुरा. इथे सर्व माहीती मिळेल. आत्ता १५ सप्टेंबरपासुन चांगला सिझन आहे. कास चे एक अँड्रॉइड अॅप पण आहे. ते माहितीकरता उत्कृष्ठ आहे.
कांदापोहे,माहीती बद्द्ल
कांदापोहे,माहीती बद्द्ल धन्यवाद.
लोकहो या वर्षी कारवी पण फुलली
लोकहो या वर्षी कारवी पण फुलली आहे. जमले तर या ८-१० दिवसातच कासला जा.
Pages