Submitted by क्रांति on 30 September, 2011 - 13:43
जुने सवंगडी तरी नवीन डाव रंगला
नवी विटी, जुनेच राज्य, बेबनाव रंगला
न मंदिरात राहिला, न भव्य मंडपामध्ये
प्रभू तिथे, जिथे खरा मनात भाव रंगला
कधी न उत्सवात अन्य रंग सांडले इथे,
रुधीररंग खेळण्यात नित्य गाव रंगला
सुकेल आज ना उद्या, म्हणून पाहिले न मी
टपोरते कळी तसा फिरून घाव रंगला
असेल चूक एवढी, तिथेच तो विसावला
विघातकी कृतींमध्ये जिथे जमाव रंगला
कधीच तू न जाणले तुझ्याच काळजामध्ये
तुझ्याविरुद्ध केवढा छुपा बनाव रंगला!
गुलमोहर:
शेअर करा
जुने सवंगडी तरी नवीन डाव
जुने सवंगडी तरी नवीन डाव रंगला
नवी विटी, जुनेच राज्य, बेबनाव रंगला>> मस्त
न मंदिरात राहिला, न भव्य मंडपामध्ये>>> येथे 'मधे' करावेत अशी विनंती, साधा टायपो आहे.
कधी न उत्सवात अन्य रंग सांडले इथे,
रुधीररंग खेळण्यात नित्य गाव रंगला>>> छानच!
सुकेल आज ना उद्या, म्हणून पाहिले न मी
टपोरते कळी तसा फिरून घाव रंगला>>> छान!
विघातकी कृतींमध्ये जिथे जमाव रंगला>>> येथेही मध्ये चे 'मधे' करावे लागेल बहुधा.
(चुभुद्याघ्या)
कधीच तू न जाणले तुझ्याच काळजामध्ये>>> (येथेही)
तुझ्याविरुद्ध केवढा छुपा बनाव रंगला!>>> व्व्व्वा! सुपर शेर क्रान्ती!
-'बेफिकीर'!
(अवांतर - इतरत्र - 'जेथे शुद्धलेखन सुविधा आपोआप आहे तेथे' - टाईप केल्यामुळे काही वेळा 'मधे' च्या ऐवजी 'मध्ये' येते असे वाटते. )
अवांतर - मधे व मध्ये यात
अवांतर -
मधे व मध्ये यात काही वेळा उच्चाराप्रमाणे समान मात्राही गृहीत धरल्या जातात, कारण मध्ये चा उच्चार 'ध' चा 'म' वर आघात न करता केला जातो, प्रश्न असा असावा की शुद्ध मराठीत (आता शुद्ध मराठी कोणते?? हेही आहेच) तो आघात पडतो की नाही? (व्यक्तीशः मला वाटते की पडतो)
अवांतर प्रतिसादाबद्दल क्षमस्व!
-'बेफिकीर'!
कधीच तू न जाणले तुझ्याच
कधीच तू न जाणले तुझ्याच काळजामध्ये
तुझ्याविरुद्ध केवढा छुपा बनाव रंगला!................हटके....क्रांन्तिटच....!
हा शेर फार फार आवडला.
मस्त लय आहे या वृत्ताला..छान
मस्त लय आहे या वृत्ताला..छान लाटांवर लयीत वर-खाली व्हावं असं आहे हे..
शेवटचे दोन फार आवडले..
मस्त मस्त शेवटचा शेर तर
मस्त मस्त
शेवटचा शेर तर अप्रतिम
व्वा ..व्वा छान
व्वा ..व्वा छान गझल.
आवडली.
मात्रात गडबड आहेच.
सुर्रेखच.. आनंदयात्रींना
सुर्रेखच..
आनंदयात्रींना अनुमोदन.
कधीच तू न जाणले तुझ्याच
कधीच तू न जाणले तुझ्याच काळजामध्ये
तुझ्याविरुद्ध केवढा छुपा बनाव रंगला!................हटके....क्रांन्तिटच....!
हा शेर फार फार आवडला
छान गझल. मोहक्,वेड लावणार
छान गझल.
मोहक्,वेड लावणार वॄत्त.
आवडली.
वाह!! फार छान गझल.
वाह!! फार छान गझल.
धन्यवाद ! बेफिकीरजी, अवांतरात
धन्यवाद !
बेफिकीरजी, अवांतरात म्हटल्याप्रमाणे मध्ये ही टंकनातली चूक आहे.
कधी नको असलेला काना दिला जातो, तर कधी हवे असेल ते अक्षर न येता भलतेच दिसते. तिकडे टंकून नक्कल करून चिकटवली त्यामुळे चुका तशाच राहिल्या.
(अवांतर - इतरत्र - 'जेथे शुद्धलेखन सुविधा आपोआप आहे तेथे' - टाईप केल्यामुळे काही वेळा 'मधे' च्या ऐवजी 'मध्ये' येते असे वाटते. )
हे अगदी बरोबर आहे. आणि ते लक्ष देऊन दुरुस्त केलं नाही, की अशी गडबड बरेचदा होते.
नचिकेत, हे कलिंदनंदिनी आहे.
छान गझल.
छान गझल.
अपेक्षेप्रमाणे सुंदर
अपेक्षेप्रमाणे सुंदर गझल.
शेवटचा शेर खूप छान !
खूप सुंदर गझल.
खूप सुंदर गझल.
कधीच तू न जाणले तुझ्याच
कधीच तू न जाणले तुझ्याच काळजामध्ये
तुझ्याविरुद्ध केवढा छुपा बनाव रंगला!................हटके....क्रांन्तिटच....!>>>>
टच नाही माहीत पण........................ .......हटके....फटके........!
क्या बात है!!! <<न मंदिरात
क्या बात है!!!
<<न मंदिरात राहिला, न भव्य मंडपामध्ये
प्रभू तिथे, जिथे खरा मनात भाव रंगला
कधीच तू न जाणले तुझ्याच काळजामध्ये
तुझ्याविरुद्ध केवढा छुपा बनाव रंगला! >> हे दोन शेर खूप आवडले!!!
मस्त गझल आहे. गझलेचं शिर्षक
मस्त गझल आहे. गझलेचं शिर्षक खूप आवडलं... !
सही गझल... शिर्षकाबाबत सहमत..
सही गझल...
शिर्षकाबाबत सहमत..
मतला मस्त... छान गझल आवडली
मतला मस्त...
छान गझल आवडली
____/\____ काय बोलू?
____/\____
काय बोलू?
न मंदिरात राहिला, न भव्य
न मंदिरात राहिला, न भव्य मंडपामध्ये
प्रभू तिथे, जिथे खरा मनात भाव रंगला
सुंदर
कधी न उत्सवात अन्य रंग सांडले इथे,
रुधीररंग खेळण्यात नित्य गाव रंगला
सुंदर
<<<न मंदिरात राहिला, न भव्य
<<<न मंदिरात राहिला, न भव्य मंडपामध्ये
प्रभू तिथे, जिथे खरा मनात भाव रंगला>>>>मस्तच.
मस्त! फारच मस्त.
मस्त! फारच मस्त.