"सावज"

Submitted by चातक on 29 September, 2011 - 08:43

***
नाजुक तु साजुक तु,
सुंदर तु मादक तु ....,
प्रिये..,अल्लड आणि नादान तु,
या शरीराचा 'प्राण' तु ...पण..,

आज केलासच या मनाचा 'घात' तु ॥१॥

नखरेल तुझ्या मागण्या त्या
पुरवल्या मी जिवतोड....
मागणीत तुझ्या नव्हतोच कधी
सखे, आज कळली मला तुझी ती 'खोड'... ॥२॥

शोकऋतु आज मजवर
घेतेलास 'हासत' काढता पाय
प्रेम म्हणते माझे मला
जाउदे..रे..'ती' 'नादान' बाय... ॥३॥

ठरलो तुझा 'सावज' जरी,
मनी माझ्या समाधान,
पहिल्या नजरेतच हारलो होतो,
तुला या देहाचे 'प्राण'... ॥४॥

अधीक याहुन काही हवं तुला,
तरीही....., सखिप्रिये, तु मला सांग!!
तु मला सांग!!! ॥५॥

***
चातक -
२९०९२०११

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

आर्जवात आर्तता आहे.

शब्द-योजनेकडे अधिक लक्ष पुरविल्यास
प्रभावी होईल.

शब्द-योजनेकडे अधिक लक्ष पुरविल्यास>> नक्की...
धन्यवाद भिडे काका.. Happy

धन्यवाद जागुतै, ती स्टाईल आहे माझी 'डेट' लिहण्याची.... Wink

मंदु Happy

छान Happy

ठरलो तुझा 'सावज' जरी,
मनी माझ्या समाधान, >>>> व्वाह!!

तरी आणखी परीणाम कारक हवी... असं वाटलं!!!

सारु, विभा, देवासाहेब...धन्यवाद !!

आणखी परीणाम कारक हवी... असं वाटलं!!! >> मलाही....

इथल्याच एका कवितेची प्रेरणा घेउन सहज सुचलेली, अतिउत्साहात लगेच टाकली..... Proud Happy

मत कळवल्या बद्दल पुन्हा एकदा 'आभार'!!

नाजुक तु साजुक तु,
सुंदर तु मादक तु ....,
प्रिये..,अल्लड आणि नादान तु,
या शरीराचा 'प्राण' तु <<< हे फारच आवडलं Happy

Happy

चातका,
कवितेतल्या भावना पोहोचतातच..
फक्त विरामचिन्हे आणि मांडणीकडे लक्ष दे ना अजून, बहरेल बघ मग कविता अजून... Happy