बालपणी तुम्हीही धावला असाल ह्यांच्या पाठी. त्यांच सौंदर्य न्याहाळायला कधी गंमत म्हणून कधी हातात धरलेही असाल.
चतुर पकडायचा त्याला दोरा लावुन ठेवायचा किंवा त्याचे पंख धरुन त्याच्या पायाने त्याला एखादा छोटा खडा उचलायला लावायचा. तो लगेच उचलायचा. टाचणीलाही दोरा लावायचा मग ती मंद गतीने उडताना पहायचे. चतुर मला तेंव्हा हेलिकॅप्टर सारखाच वाटायचा. त्याच ते डोक हेलमेट घातल्या सारख वाटायच. फुलपाखराला पकडले की त्याचा रंग बोटांना लागायचा. बर्याच वेळा पिवळ्या पंखावर ऑरेंज ठिपके असलेले फुलपाखरू सापडायचे. परवा दिसला होता पण फोटो काढायला थांबला नाही तो. अजुन एक दिसला होता. काळा पुर्ण आणि हिरव्या कलरचे ठिपके. तोही कॅमेरा पर्स मधुन काढेपर्यंत पळाला. ती दफनक्रियाही माझी भावंडे करायची माती वरुन टाकुन. पण आता हे सगळ नाही करवणार. आता पकडून त्याला इजा होउ नये असच वाटत.
आता मी ह्यांच्या मागे फोटो काढण्यासाठी लागले होते. कुठे कुठे धावडवल ह्यांनी मला. एका जागेवर पोझ द्यायला तयारच नसतात. विश्रांतीसाठी बसले की पटकन पोझ देऊन परत उडायचे. अजुन बरेच राहीलेत फोटो काढायचे वेगवेगळे रंगित कारण ते पोझच देत नाहीत. राहावल नाही म्हणुन आता फोटो देतेच. पुन्हा वेगळे मिळाले हे सवंगडी की परत दाखवेन.
३) विधात्याने काही भाग ह्यांच्यासाठीच राखुन ठेवला आहे. त्यांचा हक्कच आहे त्याच्यावर.
८) छोटूकलीचा फ्रॉकच वाटतो ना ह्याची डिझाईन.
९)आमची डिझाईन, शेप सगळच न्यार.
१२) चतुर आम्ही तरी तुमच्या हातात येतोच.
खुपचछान,३,४,५,व९ फारच सुंदर
खुपचछान,३,४,५,व९ फारच सुंदर आहेत.
किशोरवयीन अवस्थेत पकडलेली
किशोरवयीन अवस्थेत पकडलेली फुलपाखंरे आठवली. मस्त.
जागू, मस्तच! लहानपण आठवलं! ते
जागू, मस्तच! लहानपण आठवलं! ते सिताफळ तर कसलं कातिल दिसतयं!
अगदी अगदी जागू. मस्त आठवणी
अगदी अगदी जागू. मस्त आठवणी जाग्या केल्यास. फुलपाखरं, चतुर, टाचण्या, गोगलगायी ......
फार सुंदर फोटो.......
फार सुंदर फोटो.......
खुपच छान
खुपच छान
९ नंबरचा फोटो आवडला.
९ नंबरचा फोटो आवडला.
जागू, मस्त आठवणी जाग्या
जागू, मस्त आठवणी जाग्या केल्यास
तो चतुर आणि ती टाचणी मला परत पकडायची आहे पण आता त्यांच्या मागे दोरा नाही बांधायचाय.
मस्त! मस्तच!! ५, ९, १६ आणि १७
मस्त! मस्तच!!
५, ९, १६ आणि १७ फोटो विशेष आवडले
मस्तच
मस्तच
टाचणी, सुई, पिन काहीही म्हणा
टाचणी, सुई, पिन काहीही म्हणा >> हो "टाचणी"च
प्रची ९ मधल्या महारांजांना खुप वेळा हाताळले आहे....
पण....... पंखांना चीमटीत घेतल्यावर त्यांचा मोहक रंग बोटांवर सुटायचा...आणि रंगीत मखमली पंख रंगहीन होउन जायचे....
टाचणी, भिंगरी पकडणे आणि मन भरुन त्यांच्याशी खेळुन पुन्हा सोडुन देणे हा लहान पणीचा आवडता उद्योग्....यांचे पंख रंगहीन आणि खरबडीत असतात...
एखादा पाखरु खेळाताना दगावलाच...तर्.......खड्डा खणुन विधीपुर्वक्....म्हणजे एखाद्या पानात फुलं ठेवुन त्यात त्याला गुंडाळुन दफन करत......कधी कधी डोळ्यांत पाणी सुध्दा येत असे....
तो चतुर आणि ती टाचणी मला परत पकडायची आहे पण आता त्यांच्या मागे दोरा नाही बांधायचाय. >> सेम.
आता तर यांना फक्त स्वच्छंदी उडताना पाहीलं तरी कसं फ्रेश वाटतं...
जागु, छान फोटो. ५ वा फार
जागु, छान फोटो. ५ वा फार आवडला.
आम्ही पण हा उद्योग फार केलाय. आता दुष्टपणा वाटतो तो.
<<तो चतुर आणि ती टाचणी मला परत पकडायची आहे पण आता त्यांच्या मागे दोरा नाही बांधायचाय. >>
मलासुद्धा.
हाय्...एकदम नॉस्टॅल्जीक केलस
हाय्...एकदम नॉस्टॅल्जीक केलस जागवे!!
<<प्रची ९ मधल्या महारांजांना खुप वेळा हाताळले आहे....<<
अगदी अगदी ... ते आणि पहिल्या फोटोतलं!!! परीच्या घोड्याचे पंखावरची डिजाईन पाहुन त्याला सोडुन देण्यात असे.
पण आता कुठे गेली ही फुलपाखरे?
मस्त
मस्त
साऊ, पाषाणभेद, वत्सला, मामी,
साऊ, पाषाणभेद, वत्सला, मामी, शशांक, नुतन, कांदेपोहे, लाजो, मम्हईकर, रुणुझुणू, आर्या धन्यवाद.
जिप्सी अगदी अगदी मला हे लिहायचे होते वरच्या लेखनात पण रात्री घाईत टाकल्याने राहून गेले.
चातक आम्हीही पुर्वी असे खेळ खेळायचो.
चतुर पकडायचा त्याला दोरा लावुन ठेवायचा किंवा त्याचे पंख धरुन त्याच्या पायाने त्याला एखादा छोटा खडा उचलायला लावायचा. तो लगेच उचलायचा. टाचणीलाही दोरा लावायचा मग ती मंद गतीने उडताना पहायचे. चतुर मला तेंव्हा हेलिकॅप्टर सारखाच वाटायचा. त्याच ते डोक हेलमेट घातल्या सारख वाटायच. फुलपाखराला पकडले की त्याचा रंग बोटांना लागायचा. बर्याच वेळा पिवळ्या पंखावर ऑरेंज ठिपके असलेले फुलपाखरू सापडायचे. परवा दिसला होता पण फोटो काढायला थांबला नाही तो. अजुन एक दिसला होता. काळा पुर्ण आणि हिरव्या कलरचे ठिपके. तोही कॅमेरा पर्स मधुन काढेपर्यंत पळाला. ती दफनक्रियाही माझी भावंडे करायची माती वरुन टाकुन. पण आता हे सगळ नाही करवणार. आता पकडून त्याला इजा होउ नये असच वाटत.
जागू, जागू, जागू... काय म्हणू
जागू, जागू, जागू... काय म्हणू गं तुला..! किती सुरेख प्रचि. आहेत मस्तच..
मला तो व्हाईट फ्रॉक भारी
मला तो व्हाईट फ्रॉक भारी आवडला. अन हो काळा आहे ना निळ्या गोंदणाचे ठिपके असलेला तो फारच सुन्दर आहे
चतुर पकडायचा त्याला दोरा
चतुर पकडायचा त्याला दोरा लावुन ठेवायचा किंवा त्याचे पंख धरुन त्याच्या पायाने त्याला एखादा छोटा खडा उचलायला लावायचा. तो लगेच उचलायचा. टाचणीलाही दोरा लावायचा मग ती मंद गतीने उडताना पहायचे. चतुर मला तेंव्हा हेलिकॅप्टर सारखाच वाटायचा. त्याच ते डोक हेलमेट घातल्या सारख वाटायच.<<< अगदी अगदी
जागू, सर्वच फोटो फार फार फार
जागू, सर्वच फोटो फार फार फार आवडले. खरचं बालपणात घेऊन गेलीस. आम्ही पण फुलपाखरे पकडायचो. चतुराच्या शेपटीला दोरा बांधून ठेवायचो. किती दुष्ट होतो ना आम्ही?

अग जेव्हा जेव्हा चतुराचा फोटो पहाते ना, तेव्हा तेव्हा हे आठवून मला फार अपराधी वाटतं.
जागू.. भूतकाळात घेऊन गेलीस
जागू.. भूतकाळात घेऊन गेलीस गं.हे असले उद्योग बहुतेक आपण सर्वांनीच केले असतील..
पण आपल्या पोरांना मात्र असलं कधी करू दिलं नाही ना.. तेव्हढं निदान समाधानाचं नै??
फोटो मस्त आहेत
जागु, वरील सुरेख प्र.चि. मुळे
जागु, वरील सुरेख प्र.चि. मुळे पुन्हा एकदा अल्लड बालपणाचा काळ आठवला गं !..........................
लहानपणी माझ्या बरोबरीच्या मुली लंगडी, दोरीच्या ऊड्या, चार चल्लस, बांगड्यांच्या तुकड्यांचा खेळ (फरशीच्या चौरस आकाराच्या सीमारेषेच्या भागात काचेच्या बांगड्यांचे तुकडे टाकुन, प्रत्येक तुकडा दुसर्या तुकड्याला जराही धक्का न लावता बोटाने अलगद त्या चौरसाच्या सीमारेषेबाहेर काढायचा), सिझननुसार त्यात चिंचोके, सिताफळाच्या बिया अशी भर पडत असे, सागरगोटे (आमच्यापैकी एकाकडेही खरेखुरे सागरगोटे नव्हते, म्हणुन छोटे छोटे खडे शोधुन आणायचे....... ते आमचे सागरगोटे), ईत्यादि सारखे खेळ खेळायच्या.
मी मात्र लहानपणापासुन टॉमबॉइश असल्यामुळे असले पोरींचे खेळ खेळायला मला अजिबात आवडायचे नाहीत ! विटीदांडु, कबड्डी, हुतुतु, गोट्या, पतंग उडविणे, लोखंडी शीगेची रींग सरळसोट शीगेच्या आकड्यात अडकवुन तिच्या साहाय्याने चालविणे, पावसाळ्यात ओल्या, भुसभुशित जमिनीवर नेम धरुन जास्तीत जास्त लांब शीग फेकुन ती जमिनीत रुतविणे आणि तेवढ्या लांब भिडुला लंगडी घालायला लावुन त्याचा घामटा काढणे.
..........
ह्या सगळ्यांत माझा आवडता खेळ होता........ चमचमणार्या रुपेरी पंखांचे चतुर आणि रंगीबेरंगी टाचण्या पकडणे आणि त्यांच्या शेपटाला दोरा बांधुन त्यांना उडविणे ! चतुर पकडणे तसे सोपे होते. पण टाचण्या इतक्या चपळ होत्या की त्यांना पकडता पकडता नाकी नऊ येत. आम्ही फुलपाखरे सुद्धा पकडत असु. पण वर म्हटल्याप्रमाणे त्यांच्या त्या रेशमी पंखांचे रंग हाताला चिकटत असत, त्यामुळे आम्हांला फार वाईट वाटायचे आणि मग आम्ही आवाक्यात असलेले फुलपाखरु सुद्धा सोडुन देत असु. मात्र आमच्या काक दृष्टीस जर काजवे आढळले , तर त्यांची बिचार्यांची धडगत नसे ! आम्ही त्यांना पकडुन काचेच्या बाटलीत ठेवत असु आणि संध्याकाळची आतुरतेने वाट पहात असु. अंधार पडल्यावर ते लुकलुकायला लागले की आमच्या आनंदाला पारावर उरत नसे................. किती अनभिज्ञ होतो तेव्हा आम्ही ! आमच्या त्या क्षणभंगुर आनंदासाठी आम्ही त्या इवल्याशा जीवांशी निष्ठुरतेने वागत
होतो ! ...................... छे ! छे !! आता ते आठवले तर फार वाईट वाटते !!!..........................
ती ऑरेंज टाचणी कसली गोडु आहे.
ती ऑरेंज टाचणी कसली गोडु आहे. क्युट.
ठाण्याला ओवळा गावात १ बटरफ्लाय गार्डन आहे. खुप नाही पण असतात बरिच फुलपाखरे. हल्लीच्या लहान मुलांना ज्यांना तशिही ती पाहायला नाही मिळत त्यांना अप्रुप वाटते.
पण आपल्या पोरांना मात्र असलं
पण आपल्या पोरांना मात्र असलं कधी करू दिलं नाही ना.. तेव्हढं निदान समाधानाचं नै??
अग पण आपल्या मुलांनी निदान हे सृष्टीसौंदर्य न्याहाळायला तरी हव ना. आता ते दिवसभार टिव्ही आणि कॉम्प्युटर न्याहाळत असतात. तुझ्या वाक्याने मी जागी झालेय. आता श्रावणीला मी रोज ही फुलपाखरे, चतुर दाखवेन. पण त्यांना पकडून नाही देणार. तशी तिलाही निसर्गाची आवड आहे. फुल गोळा करण, काढण, ती न्याहाळण तिला आवडत. कधी कधी माझ्याबरोबर झाड, बी लावायलाही येते हौशीने.
वनराई. मस्त. अग मी पण वरचे सगळे गेम खेळायचे माझ्या चुलत भावाबरोबर. विठी दांडू, गोट्या, टायर चालवणे, पतंग उडवायला अजुन येत नाही पण मी भावाबरोबर मांजा पकडायचे.
मागच्या वर्षी नवर्याने उडवुण दिलेली पण मी खाली आणली.
.मला मासे पकडायलाही आवडत. मी आधी गळ लावुन पण पहायचे. एकच मासा आला इतक्या वर्षात गळाला तो पण लगेच सुटला
पण आता मला जाळ पकडताना पहायच आहे.
मोनालिपा धन्स.
चतुर पकडणे तसे सोपे होते. पण
चतुर पकडणे तसे सोपे होते. पण टाचण्या इतक्या चपळ होत्या की त्यांना पकडता पकडता नाकी नऊ येत. आम्ही फुलपाखरे सुद्धा पकडत असु. पण वर म्हटल्याप्रमाणे त्यांच्या त्या रेशमी पंखांचे रंग हाताला चिकटत असत, त्यामुळे आम्हांला फार वाईट वाटायचे आणि मग आम्ही आवाक्यात असलेले फुलपाखरु सुद्धा सोडुन देत असु. मात्र आमच्या काक दृष्टीस जर काजवे आढळले , तर त्यांची बिचार्यांची धडगत नसे ! आम्ही त्यांना पकडुन काचेच्या बाटलीत ठेवत असु आणि संध्याकाळची आतुरतेने वाट पहात असु. अंधार पडल्यावर ते लुकलुकायला लागले की आमच्या आनंदाला पारावर उरत नसे................. किती अनभिज्ञ होतो तेव्हा आम्ही ! आमच्या त्या क्षणभंगुर आनंदासाठी आम्ही त्या इवल्याशा जीवांशी निष्ठुरतेने वागत होतो ...................... छे ! छे !! आता ते आठवले तर फार वाईट वाटते .......................... >>>>>वनाताईला अनुमोदन. आम्ही काजवे पकडुन शर्टाच्या खिशात ठेवायचो.
जागू, परत एकदा सर्व बालपण
जागू, परत एकदा सर्व बालपण समोर उभ केलंस.
वनराई, काजवे.............................. आहा! छान आठवण क्रून दिलीत.
अरे ते काजवे हल्ली कोठे
अरे ते काजवे हल्ली कोठे दिसतात कोणी सांगेल का? मला १दा काम्शेत जवळ पिकनीकला गेले तेव्हा दिसले होते. लेकाला अजुन आठवतात पण परत त्याला दाखवायचे आहेत.
तो फक्त ते 'या मोठ्यांना काही काही काही कळत नाही' या गाण्यातच ते पाहतो. परत त्याला दाखवायचे आहेत.
जिप्स्या म्हणजे लाईटवाला
जिप्स्या म्हणजे लाईटवाला शर्ट.
प्रज्ञा, मोना आम्ही प्लास्टिकच्या ट्रान्स्फरंट डबित ठेवायचो. नाहीतर ते पकडायचे आणि लाईट बंद करुन त्यांची लाईट पहायची. एक दिवस तर मला इतका अदभुत नजारा दिसला होता पण त्यावेळी मी लहान होते आणि कॅमेराचा गंधही नव्हता. पुर्ण भाताचे हिरवे शेत होते. त्यात एक मोठे आंब्याचे झाड होते. त्या आंब्यावर पुर्ण काजवे चमकत होते. अगदी लाईटिंग केल्यासारखे. अजुन मला जसेच्या तसे आठवते.
व्वा मस्तच ही लिंक मी पाहिलीच
व्वा मस्तच ही लिंक मी पाहिलीच नव्हती.
चतुर पकडायचा त्याला दोरा
चतुर पकडायचा त्याला दोरा लावुन ठेवायचा किंवा त्याचे पंख धरुन त्याच्या पायाने त्याला एखादा छोटा खडा उचलायला लावायचा. तो लगेच उचलायचा. टाचणीलाही दोरा लावायचा मग ती मंद गतीने उडताना पहायचे. चतुर मला तेंव्हा हेलिकॅप्टर सारखाच वाटायचा. त्याच ते डोक हेलमेट घातल्या सारख वाटायच. फुलपाखराला पकडले की त्याचा रंग बोटांना लागायचा.>>> अगदी असच करायचो...
सगळे मस्तच... ९ नं. खुप आवडला...
जागु, सुरेख प्र.चि. कोकणात
जागु, सुरेख प्र.चि.
कोकणात चतुरला 'दांड्वली' म्हणतात...