कशास त्याची वाट पहावी (गंमतरही)

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

कशास त्याची वाट पहावी,
स्वतः खाउनी मोकळे व्हावे.

खाईल चोंग्या आल्या वरती,
त्याचे झाकून ठेवून द्यावे.

चविष्ट लागे गरम पदार्थ,
गार कशाला होऊ द्यावे?

भरल्या पोटी तंगड्या ताणून
गप्पा हाणत स्वस्थ पडावे.

आधीच दमता कामे करूनी
फुकाट 'अनशन' का घडवावे?

म्हणून म्हणतो आया-बायांनो,
स्वतः खाउनी मोकळे व्हावे.

खाईल चोंग्या आल्या वरती,
त्याचे झाकून ठेवून द्यावे.

Biggrin

Biggrin मस्त रे!

चोंग्या का बरे?
>> जपानमधील बायका नवर्‍याला लाडाने चोंग्या म्हणत असाव्यात, काय ऋयाम ? Proud