व्हाईट सॉस

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 24 September, 2011 - 03:11
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

दूध १ कप
लोणी १ टेबलस्पून
मैदा १ टेबलस्पून

मीठ व मिरेपूड चवीप्रमाणे

क्रमवार पाककृती: 

लोणी गरम करून ते करपू न देता त्यावर मैदा परतायचा. फार नव्हे. रंग पालटता कामा नये पण मैदा भाजला गेला पाहिजे. त्यात हलक्या हाताने दूध घालायचे. गुठळ्या होऊ न देणे. झाल्यास त्या मोडून काढणे. तो लवकरच घट्ट होतो. उकळी आल्यावर गॅस बंद करणे. त्यात चवीप्रमाणे मीठ, मिरेपूड घालतात.
भाज्या, सलाद, पास्ता वगैरेंमध्ये हा व्हाईट सॉस वापरतात. त्यात चीज किसून घातले तर चीझी सॉस पण मस्त लागतो.

मी मैद्याऐवजी अनेकदा तांदळाचे पीठ वापरते. चवीत फरक पडत नाही.

वाढणी/प्रमाण: 
आवडीप्रमाणे
अधिक टिपा: 

* यात कधी दालचिनीचा छोटा तुकडा, तमालपत्र, एखादा वेलदोडाही स्वादासाठी घालतात.

*** हा सॉस करून फ्रीजमध्ये गार करून सलादमध्ये वापरता येतो.

**** उकडलेल्या भाज्या, जसे बटाटा, दुधी, घेवडा, स्वीट कॉर्न, गाजर यांसोबत व्हाईट सॉसची चव छान लागते.

माहितीचा स्रोत: 
आता नक्की आठवत नाही, पण बहुतेक कोणते तरी पुस्तक
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बागुलबुवा, माझ्याकडे हा सॉस केल्यावर जास्त टिकतच नाही! Wink
परंतु तरीही फ्रीजमध्ये एअर टाईट डब्यात बंद करून ठेवल्यास दोन-तीन दिवस टिकायला हरकत नाही.

हम्म्म्म्म्....

सलाद / पास्ता करताना प्रत्येक वेळी बनवायला लागणार. तो मैदा बर्‍याच आतल्या गाठीचा असतो Proud आता इलाजच नाही, गुठळी होना नय मंगताय तो ढवळ ढवळ ढवळनेका.

व्हाईट सॉसला एक उकळी आली की गॅस बंद करायचा. जरा कोमट झाल्यावर त्यात ब्लेंडर फिरवायचं, म्हणजे कांदे, मैद्याच्या गुठळ्या इत्यादी सर्व मोडून छान गुळगुळीत सॉस होतो. आणि मग पुन्हा उकळी काढायची.

व्हाईट सॉस पूर्ण थंड करून फ्रिजमधे टाकला की महिनाभर तरी टिकतो. लागेल तसा डब्यातून चमच्याने काढून घ्यायचा. डब्यात बुचका मारायचा नाही. सॉस साठवायचा डबा, चमचा, हात इत्यादी सर्व वस्तू कोरड्या असल्या पाहिजेत इत्यादी इत्यादी Wink

मंजूडे, मी असाच मैदा शिजवून फ्रीजमध्ये टाकला होता, साधारण १५ दिवसांनी किंचित पाणी सुटलं. वास येत नव्हता.

(मी माश्यांच्या खाण्याच्या पैदाशीसाठी शिजवला होता. )

यात एक शॉर्टकट म्हणजे दुधात कॉर्नस्टार्च किंवा मैदा आधीच मिसळून नंतर ते तापून विरघळलेल्या बटरवर ओतायचे. अर्थात दुधाला उकळी फुटून ते दाट होईपर्यंत यातही सारखे ढवळावे लागतेच.

मॅगी किंवा नेस्लेची कोकोनट पावडर आहे ती सुद्धा गरम पाण्यात मिसळून सॉसइतका दाटपणा आल्यावर पास्ता किंवा उकडलेल्या भाज्यांमधे व्हाईटसॉस ऐवजी वापरता येते. चीज किसून नंतर वरुन घालायचे. चवीला मिरपूड, दालचिनीचा तुकडा, जायफळ पावडर आपल्या आवडीप्रमाणे.

बाबू, या सॉसचे कोरडे मिश्रण (म्हणजे मैदा भाजून ठेवायचा) करुन ठेवायचे. मी मिल्क पावडर वापरत असल्याने ती पण मैद्याबरोबर भाजून ठेवतो (खरे तर मी कणीकच वापरतो) आयत्यावेळी यातले हवे तेवढे मिश्रण पाण्यात मिसळून गरम केले कि झाले. मिसळण्यासाठी मिक्सरमधून फिरवले तर चांगलेच.

कणकेचा सॉस पण छान होतो आणि मैदा खातोय ह्याचा गिल्टही नको. गुठळ्या होऊ नये म्हणून दूध घालता घालता एकीकडे एग बीटरने ढवळत राहायचे.

दुध गरम असेल तर हुठ्ळ्या कमी होतात. सगळे दुध एकदम न घालता एकवेळी १/२ कप घालावे. मी पहिला १/२ कप घालताना गॅस बन्द करते, नीट ढवळून गॅस परत चालू करते.