अशी कशी ही म्हागाई
अशी कशी ही म्हागाई वाढ वाढ वाढली
माझ्या खर्चाची झोळी हिनं फाडली ||धृ||
नका डाळ तुम्ही म्हणू; नका तांदूळ तुम्ही म्हणू
गहू जोंधळं झालं आहे सोनं जणू;
पाहून बाजरीचे भाव मी पिशवी खुंटीला टांगली ||१||
दह्या दुधाचे भाव कसे वाढता वाढं; शेरभर ताकालाबी धा रूपये लागं
पोरं झालीत वाळून बारीक रोड;
पामतेल डालातुपाविना देवू कशी भाजीला फोडणी? ||२||
राकेल गॅस प्रेटोल डिझल; याबीगर चाक कसं चालंल?
ऐश्टी गाडीबी पैशाविना हालंना;
पेशल रिक्षा कशी करावी? साध्या प्रवासाची सोय नाय आता राह्यली ||३||
संसाराचा कसा ओढावा गाडा; घरखर्च रोज घाली राडा
पगारात मालक घाली खोडा;
अवशीधपान्याविना तब्बेत चांगली नाही राह्यली ||४||
कुनी यावर उपाय सांगा राव; या तेजीचा कमी करा कुनी भाव
आमी गरीब आहो नाही कुनी साव;
रोज सस्ताईची किंमत कमी होत चालली ||५||
तर्हा येगळीच बघा शिक्शनाची; शाळा झेडपीची बरी हाय पोरांची
आस तिथं खिचडी मिळण्याची;
चांगली विंग्रजी शाळा पोरांनी नाय कधी पाह्यली ||६||
{{सांगा कसं जगावं आमी ऐटीत; आडवं केलं म्हागाईनं एका फायटीत
यंदा पोराचं लगीन करावं म्हनतो; दोन इंजीनानं गाडी वढावी म्हनतो
सांगा एखांद्या स्थळी
आय.टी.वाली पोरगी आसल तर चांगली ||७|| }}
- पाषाणभेद (दगडफोड्या)
२४/०९/२०११
काय राव, म्हागाई हाय
काय राव, म्हागाई हाय कुठं.
सरकार म्हणत सगळ सस्त हाई.५रू. डाळ भात्,०.४५रू.(४५पैसे)फळे.
म्हागाई म्हणाल तर सरकार हात धुवुन मागे लागेल तुमच्या.(रामदेव बाबांच्या मागे लागलय तस).
बाकी तुमच लिवनं रोजच्या परमान चालू राव्हदेत.