नमस्कार मंडळी...
इंग्लंड दौरा ची एक दुखःद घटना म्हणुन नोंद करावी.. दोन दोन धागे उघडुन सुध्दा भारत हारतच होता...(अंधश्रध्दाच आपली:) ) सगळ्या गोष्टी करुन पाहील्यात पण विजय काही मिळतच नव्हता..शेवट पर्यंत मिळाला नाही.. १० आंतरराष्ट्रीय सामन्यांपैकी ८ मधे पराभव आणि २ अर्णिनित हेच गणित शेवटी मिळाले...
असो... आत ते येतील भारतात तेव्हा बदला घेउच....
चॅम्पिअन लीग साठी आता सज्ज व्हायला हवे... भारतातले ४ क्लब संघ जागतीक क्लब संघांविरुध्द दोन दोन हात करणार आहेत....
१) चेन्नई सुपर किंग्सः धोणी च्या नेतृत्वाखाली सलग दोन वेळा आयपीएल स्पर्धा जिंकणारा संघ प्रथम दावे दार आहे या स्पर्धेत..
२) मुंबई इंडिअन्स : सचिन चा संघ.. उपविजेता आयपीएल २०११ चा..
३) रॉयल चॅलेंजर्स बँगलोर : आता हा संघ विराट कोहली च्या नेतृत्वाखाली या स्पर्धेत खेळणार आहे ... ३ रे स्थान आयपीएल मधे
४) कोलकता नाईट रायडर्स : उसळी मारुन वर आलेला संघ असेच याचे वर्णन करावे लागेल मागील सर्व आयपीएल मधे जवळपास शेवटीच राहणार्या या संघाला गंभीर चा गंभीर स्पर्श झाला आणि संघाचे रुपडे बदलले.. ४ थ्या स्थानावर आयपीएल स्पर्धेत
५) सदर्न रेडबॅक्स : ऑस्ट्रेलियन केएफसी बिग बॅश २०११ स्पर्धेचा विजेता संघ
६) न्यू साऊथ वेल्स ब्ल्यूज् : ऑस्ट्रेलियन केएफसी बिग बॅश २०११ स्पर्धेचा उपविजेता संघ
७) लीस्टरशायर : इंग्लंड मधील फ्रेंड्स लाइफ टी २० २०११ मधिल विजेता संघ
८) समरसेट : इंग्लंड मधील फ्रेंड्स लाइफ टी २० २०११ मधिल उपविजेता संघ
९) केप कोब्राज् : साउथ अफ्रिका मधिल टी२० स्पर्धेतील विजेता संघ यात जे पी डुमनी सारखे खेळाडु आहेत
१०) वॉरिअर्स : साउथ अफ्रिका मधिल टी२० स्पर्धेतील उपविजेता संघ
११) त्रिनिदाद आणि टॉबगो : कॅरेबियन बेटांवरील टी२० स्पर्धेचा विजेता संघ.. पोलार्ड नावाचा राक्षस यातुनच बाहेर आलेला
१२) रुहुना : श्रीलंका मधिल टी२० स्पर्धेतील विजेता संघ
१३) ऑकलंड एस्स : न्युझिलंड मधिल टी२०चे विजेता संघ
हे झाले सगळे संघ ,,,,,,,आता पात्रता फेरीतील संघ आहेत
QUALIFYING POOL A QUALIFYING POOL B
A1= कोलकता नाईट रायडर्स (India)............B1= त्रिनिदाद आणि टॉबगो (West Indies)
A2= समरसेट (England)..........................B2= लीस्टरशायर (England)
A3= ऑकलंड एस्स...................................B3= रुहुना (Sri Lanka)
यांच्यात
Mon Se 19, 2011
Pool A -रुहुना vs त्रिनिदाद आणि टोबॅगो = त्रि. आणि टो. जिंकले
Mon Sep 19, 2011
Pool B - कोलकता नाईट रायडर्स vs ऑकलंड एस्स = को. ना. रा. जिंकले
Tue Sep 20, 2011
Pool A - त्रिनिदाद आणि टोबॅगो vs लीस्टरशायर = त्रि. आणि टॉ. जिंकले
Tue Sep 20, 2011
Pool B - समरसेट vs ऑकलंड एस्स = समरसेट जिंकले
Wed Sep 21, 2011
Pool A -लीस्टरशायर vs रुहुना = रुहुना जिंकले
Wed Sep 21, 2011
Pool B -कोलकता नाईट रायडर्स vs समरसेट = को. ना. रा. जिंकले
सर्व मॅचेस राजीव गांधी स्टेडियम हैद्राबाद येथे होणार आहेत पहिल्या ३ नंबर वरचे संघ मुख्य स्पर्धे करीता पात्र होणार आहेत....
मुख्य स्पर्धा चे वेळापत्रक
शुक्र २३ सप्टें. रात्री ८ : १) रॉयल चॅलेंजर्स बँगलोर vs वॉरिअर्स
शनी २४ सप्टें दु. ४ : २) केप कोब्राज् vs न्यू साऊथ वेल्स ब्ल्यूज्
शनी २४ सप्टें रात्री ८ : ३) चेन्नई सुपर किंग्स vs मुंबई इंडिअन्स
रवि २५ सप्टें दु. ४ : ४) वॉरिअर्स vs सदर्न रेडबॅक्स
रवि २५ सप्टें रात्री ८ : ५) कोलकता नाइट रायडर्स vs समरसेट
सोम २६ सप्टें दु. ४ : ६) मुंबई इंडिअन्स vs त्रिनिदाद टोबॅगो
मंगळ २७ सप्टें रात्री ८ : ७) कोलकता नाइट रायडर्स vs सदर्न रेडबॅक्स
बुध २८ सप्टें दु ४ : ८) न्यू साऊथ वेल्स ब्ल्यूज् vs त्रिनिदाद टोबॅगो
बुध २८ सप्टें रात्री ८ : ९) चेन्नई सुपर किंग्स vs केप कोब्राज्
गुरु २९ सप्टें रात्री ८ : १०) कोलकता नाईट रायडर्स vs रॉयल चॅलेंजर्स बँगलोर्स
शुक्र ३० सप्टें रात्री ८ : ११) मुंबई इंडिअन्स vs केप कोब्राज्
शनी १ ऑक्टो दु ४ : १२) सदर्न रेडबॅक्स vs समरसेट
शनी १ ऑक्टो रात्री ८ : १३) कोलकता नाइट रायडर्स vs वॉरिअर्स
रवि २ ऑक्टो दु ४ : १४) मुंबई इंडिअन्स vs न्यू साऊथ वेल्स ब्ल्यूज्
रवि २ ऑक्टो रात्री ८ : १५) चेन्नई सुपर किंग्स vs त्रिनिदाद टोबॅगो
सोम ३ ऑक्टो रात्री ८ : १६) रॉयल चॅलेंजर्स बँगलोर vs समरसेट
मंगळ ४ ऑक्टो दु ४ : १७) केप कोब्राज् vs त्रिनिदाद टोबॅगो
मंगळ ४ ऑक्टो रात्री ८ : १८) चेन्नई सुपर किंग्स vs न्यू साऊथ वेल्स ब्ल्यूज्
बुध ५ ऑक्टो दु ४ : १९) वॉरिअर्स vs समरसेट
बुध ५ ऑक्टो रात्री ८ : २०) रॉयल चॅलेंजर्स बँगलोर vs सदर्न रेडबॅक्स
शुक्र ७ ऑक्टो रात्री ८ : १ ली सेमी फायनल ( १ क्र. ग्रुप ब vs २ क्र. ग्रुप अ )
शनी ८ ऑक्टो रात्री ८ : २ री सेमी फायनल ( १ क्र. ग्रुप अ vs २ क्र. ग्रुप ब )
रविवार ९ ऑक्टोंबर रात्री ८ वाजता फायनल मॅच =
काय उत्साह आहे! सचिन(मुंबै)
काय उत्साह आहे!
सचिन(मुंबै) आणि झहीर (बंगलोर)नाही खेळणार ना?
उदयोने, धन्यवाद. सामने भारतात
उदयोने, धन्यवाद.
सामने भारतात आहेत, प्रेक्षक उदंड आहेत व दिवस-रात्र अशी सोईची वेळ आहे, उत्साह कां नाही असणार !!!
भाउ तुम्ही तर माझे बारसेच
भाउ तुम्ही तर माझे बारसेच घातले आहे............
उदय वन असे आहे हो माझा आयडी...
२ महीने सतत हारतच आलोय ....त्यामुळे आता या स्पर्धेत मजा येणार.. कारण हारले तरी आपले नाही ...जिंकले तरी आपले नाहीच
kkr vs Aa newzealand chalu
kkr vs Aa newzealand chalu zali...
aaj kkr jinkanaar...
hurrrrreeee KKR 3 runs ne
hurrrrreeee KKR 3 runs ne jinkalee.....
सचिन(मुंबै) आणि झहीर
सचिन(मुंबै) आणि झहीर (बंगलोर)नाही खेळणार ना?>>
मुलांसाठी वेळच मिळत नाही - सचिन
http://www.esakal.com/esakal/20110919/5060735813798921418.htm
सचिनची टाच कशी आहे? परवा
सचिनची टाच कशी आहे? परवा एन्डीटीव्हीवर बारा तास होता, सपोर्ट माय स्कूल टेलेथॉनसाठी.
मुंबै इंडियन्सचा कप्तान हरभजन असेल की कॉय?
उदय वन.. धाग्यासाठी धन्यवाद..
उदय वन.. धाग्यासाठी धन्यवाद.. ते जरा संघांची नावं दुरुस्त करणार काय?
सोउथर्न रेड्बक्स >> सदर्न रेडबॅक्स
न्यु सोउथ वाल्स ब्लुस >> न्यू साऊथ वेल्स ब्ल्यूज्
समरसेट >> सॉमरसेट
कोप कोब्रास >> केप कोब्राज्
त्रिनिदाद आणि टॉबगो >> त्रिनिदाद आणि टोबॅगो
अजुनही क्रिकेटला काही
अजुनही क्रिकेटला काही प्रेक्षक / चाहते आहेत तर.
साथ साथ डुबेंगे ... और क्या.
बदल केले आहेत.
बदल केले आहेत.
काल ची कोलकता ची मॅच जबरदस्त
काल ची कोलकता ची मॅच जबरदस्त झाली लो स्कोरिंग असुन सुध्दा छानच रंगली शेवटीच्या ५ ओवर्स तर जबरदस्त गोलंदाजी झाली.. अश्या गोलंदाजी ची सध्या भारताला फार गरज आहे...ब्रेट ली ने शेवट च्या ओवर्स मधे स्लोवन..यॉर्कर यांचे अप्रतिम मिश्रण केले....११ रन्स पैकी फक्त ८ रन्सच काढता आल्या..त्यातल्या ४ रन्स तर अंदाजेच आल्या..
<< भाउ तुम्ही तर माझे बारसेच
<< भाउ तुम्ही तर माझे बारसेच घातले आहे............ >> उदय वन, माझीही इथं " भाऊ नमस्कार " म्हणून बोळवण होणार होती म्हणून मी तात्काळ माझी आयडी देवनागरीत बदलली ! आतां सांगा, दोष कोणाचा ?
<< काल ची कोलकता ची मॅच जबरदस्त झाली >> सहमत.
kkr jinkanaar...pathan
kkr jinkanaar...pathan dhunaar aaj...
kkr haarale.... pan qalifin
kkr haarale....
pan qalifin kele.....
jo marat marat pohachatoch tich khari indian team.....
ROYAL BANGLORE ANI
ROYAL BANGLORE ANI WORRIARS....JABARDAST MATCH ZALI...
WORRIARS NE KHECHUN ANALAA VIJAY.....
YAALAA MHANATAAT CRICKET.....
.............
.............
अफलातुन .........निव्वळ
अफलातुन .........निव्वळ अफलातुन मॅच होती काल ची.... मुंबई ने हारलेली मॅच जिंकली...
पोलार्ड बाद झाल्यावर आता सगळेच संपले असे होते ५ ओवर्स मधे ५२ रन्स हव्या असताना...मलिंगा आला..आणि मॅच बदलेली वाटली.. सलग २ सिक्स मारुन लक्ष्याचा पाठलाग करण्यात अजुन जिवंत आहोत असा इशाराच जणु धोनी ला दिला.. धोनी ची बहुतेक नशीब रुसलेले आहे वाटते.. इंग्लंड दौर्यात जे गायब झाले ते अजुन मिळालेच नाही परत बिचार्याला.. या सगळ्या मधे मायकल हसी ची जबरदस्त खेळी मात्र झाकळुन गेली..
धोनी चे दिवस फिरले....नव्या नवरीचे नऊ दिवस संपले.......
TRINIDAAD ...GELICH
TRINIDAAD ...GELICH .....
MUMBAI JABARDAST KHELAT AAHE..
अरे कोणीच
अरे कोणीच नाही...................
रॉयल्स बँगलोर च्या २ मॅचेस जबरदस्त झाल्यात... दोन्ही मॅचेस मधे २०० पेक्षा जास्त धावांचा यशस्वी पाठलाग केला..या वरुनच त्यांची फलंदाजी मजबुत आहे हे दिसुन येते...
शेवटच्या बॉल वर जो काही षटकार मारला तो तर लाजवाब... किमान आता आपल्याला मियांदाद ची आठवण नाही यायला हवी..... आपल्या कडे पण आहे शेवटच्या बॉल वर षटकार मारणारा...........
दिलशानने सुरवातीला चार षटकात
दिलशानने सुरवातीला चार षटकात केवळ १० धावा देऊन एक बळी घेऊनही एनएसडब्ल्यूने २००ची मजल गाठणंही कौतुकास्पद होतं !
सगळा त्या माकडाचा (वार्नर )
सगळा त्या माकडाचा (वार्नर ) चा कमाल......