निबंध

Submitted by ए_सावरी on 14 September, 2011 - 22:56

निबंध हवा होता म्हणुन इथे लिहिले होते. धन्यवाद \ आभार.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"निबंध लिहिणे व भाषण देणे हे माझे सर्वात नावडते विषय आहेत." असं म्हणून एकाच वाक्यात सुरुवात आणि शेवट करता येईल Wink

तिला हस्तकला का आवडत नाही हे प्रथम प्रश्नोत्तरे करून जाणून घ्या. मग त्याला निबंधाचे रूप द्या.
यात विनोदाला वाव आहे. म्हणजे एक वस्तू करायला जावे आणि भलतेच काही व्हावे.
गोंद(गम) वापरताना झालेली एखादी फजिती, इ.इ.(आजकालची मुले गम वापरतात की फेव्हिस्टिक?)
फेव्हिकॉलने दोन बोटे एकत्र चिकटलेला माणूस डॉक्टरकडे ती सोडवण्यासाठी गेला यावरचा एक विनोद वाचल्याचे आठवते.

आसावरी, एवढं हातघाईवर आलंय तर खालील मुद्द्यांवर विचार करा....

१) विषय पहिल्यापासूनच आवडत नाही की एखादी घटना तो न आवडायला कारणीभूत ठरली?
२) का आवडत नाही?
३) तो आवडत नसल्याने कुठे काँप्रमाइझ करावं लागलं का?
४) तो पुढे भविष्यात आवडावा किंवा निदान नावड न रहावी म्हणून काही करावंसं वाटतं का?
५) करावंसं वाटत असेल तर त्याने काय फायदा होईल? या विषयाचे फायदे?
६) प्रयत्न केल्यावर आपल्याला हस्तकला जमतेय असं आढळून आलं तर इतके दिवस न केल्याबद्दल काही वाटेल का?

याची व अजून काही सुचत असतील तर त्या प्रश्नांची उत्तरं तिलाच विचारा आणि तिच्याच भाषेत तिला लिहूद्या.

सावरी, तिच्या कडून काढून घे कि तिला का आवडत नाही आणि ते विस्तारा ने लिहायला सांग, मग त्यात फेरफार करता येतो. आश्विनी म्हणते ते मुद्दे अगदी बरोबर आहेत,
किंवा आधी एखादा विषय आवडत नव्हताअ ,पण नंतर कशी आवड निर्माण झाली असा ही मुद्दा मांडू शकतेस.
नॉट नेसेसरी, संस्कृत वचन, कवितांच्या ओळी असल्याच पाहिजेत त्यात, प्रत्यक्ष तिच्या अनुभवातून, विचारातून लिहिल तर जास्त चांगल

आभारी आहे

तीला ते सगळ कचराकाम [तिच्याच भाषेत] आणि चिकटा-चिकटी आवडत नाहीत. तिला ते छान जमत नाही. आम्ही घरी तिच्या केलेल्याच कवतुक केल तरी शाळेत बाई अगदी कमीच मार्क देतात, तिच्या मते तिने ते खुप छान केलेले असते पण तरीही मार्क अगदीच कमी मिळ्तात.
या विषयामुळे एकुणच तिची टक्केवारी घसरते,
आणि हो ते कवितेच्या ओळी वगैरे कम्पल्सरी आहे त्याना
हा विषय तिला पहिल्यापासुनच नाही आवडत.

आपण दिलेला निबंधाचा विषय पाहता या प्रकारच्या निबंधात कवितेच्या ओळी सहज सामावून जातील असे वाटत नाही.
पण तरीही आग्रहच असल्यास - "ही आवडते मज मनापासूनी शाळा" हे जरी खरं असलं तरी शाळेमधलं सगळंच आवडतं असं नाही -
या टाईपची वाक्ये करावी लागतील... अशा अवतरणचिन्हांतच पंक्ती बसवता येतील..
त्यापेक्षा, भरत आणि अश्विनी यांच्या सूचनांवर विचार करून पहा...
(एखादा निबंध कमी जमला तरी हरकत नाही... Happy )

"करायला गेलो गणपती आणि आणि झाला मारुती" ही एक ओळ आठवली.
लेऊ कशी वल्कला
ते जुळे न बाई मला
नीट निरीची गाठ न जुळते
निरीवरती निरी न मिळते
कटीवरुनी सरते ओघळते असो वरी मेखला
या गाण्याचे विडंबन करता येईल

बनवू कशी मी पंखा
ते जमेल कधी का मला
घडीवरती घडी न बसते
एकसारखी दुजी न दिसते
मूठ उघडते दुडते जरी रबर बँड लावला

असं काही तरी....