डेज्…..
पहाट झाली, गजर वाजला
सूर्य अजून नव्हता उगवला
थोडा वेळ कंटाळा केला
सूर्य आजूनही नव्हता आला
परत वेळ गेला थोडा
सूर्याचा का अडला गाडा?
शेवटी त्याला SMS केला
"कारे? जास्त शहाणा झाला?"
लगेच मोबाईल माझा वाजला
त्याचा होता रिप्लाय आला
"शहाण्या, जरा कॅलेन्डर बघ
कुठे तू? कुठे चाललय जग?
मदर्स, फादर्स, ब्रदर्स, सिस्टर्स
स्टुडंट्स, टिचर्स, ..अर्स, ..अर्स
फ्रेंडस्, डॉगज्, वुमन्स्, जेन्टस्
ट्रॅडिशन, ऍडीशन, एन्व्हॉयर्नमेन्ट्
पेट्रोलियम आणि टेक्नॉलॉजी
व्हॅलेन्टाईन इत्यादी आजी माजी
आहेकारे आज "डे" असा?
"डेच नाही तर उगवणार कसा?"
"डे" शिवायही पूर्वी कसा
साऱ्यांना मान होता
सूर्यही, सूर्य मालेत
स्थानाने महान होता
आता म्हणे लागतील त्याला
त्यांचे नियम पाळायला
डेज प्रमाणेच वागायला
पूर्वे कडूनच उगवायला
पूर्वेकडूनच यायला लावण्यात
एक कुटील डाव आहे
उगवताच दिशा दिसावी
पश्चिम जिचं नाव आहे
सुधीर
भारी
भारी !
गोदेय
पूर्वेकडू
पूर्वेकडूनच यायला लावण्यात
एक कुटील डाव आहे
उगवताच दिशा दिसावी
पश्चिम जिचं नाव आहे
--------- अप्रतिम रे.............
Godeya, नितीन
Godeya, नितीन
अभिप्रयाबद्दल
धंन्यवाद.
सुधीर
---------------------------------------
हर देशमे तू हर वेषमे तू , तेरे नाम अनेक तू एक ही है
तेरी रंगभुमी यह विश्वंभरा , सब खेलमे मेलमे तूही तो है
मस्त , खुप छान ......
मस्त , खुप छान ......
me.mitr धंन्यवाद
me.mitr
धंन्यवाद