चंदेरी, इंदौरी, कोलकाता आणि येवल्याची -- डिजिटल आर्ट

Submitted by दिनेश. on 3 September, 2011 - 09:33

चंदेरी (कि माहेश्वरी)

कोलकाता

इंदौरी

येवल्याची पैठणी

जाणकार मैत्रिणींनी (द्विरुक्ती झाली, माफी असावी. सर्वच मुली जाणकार असतात या बाबतीत) खुशाल नावे ठेवावीत.

गुलमोहर: 

आहा... इंदोरी साडी अगदी मनात भरली. मला काळे अंग आणि डार्क पोपटी रंगाची बॉर्डर ह्या काँबोची साडी घ्यायचे कधीपासुन मनात आहे.

दिनेशदा, पैठणी मस्त आहे. मी गेल्या महिन्यातच येवल्यात जाऊन पैठणी घेतली. पैठण्यांचे एवढे विविध प्रकार पाहून आवाक व्ह्यायला होतं.
बाकिच्या साड्या सुद्धा झकास!

खुप वर्षांपुर्वी दादरला पोर्तुगीज चर्चजवळ असणार्‍या इंदौरी साडी सेंटरमधून
अशी साडी, आईसाठी घेतली होती. अजून डोळ्यासमोरुन जात नाहि.

खूप्पच सुर्रेख!!!!!!!!!!! माझी मोस्ट फेव आहे कोलकता साडी .. वेरी ग्रेसफुल!!!
उगाचच साड्या त्याही डिजिटल दाखवून का त्रास देताय?? Lol

खरं खरं सांगू का? चंदेरी आणि कोलकाता जम्या नही. ट्रान्स्परन्ट कापडाचा फील नाही आलाय.
इंदुरीच्या टिपिकल चेक्स साडीच्या आकाराच्या प्रमाणात फार मोठ्या वाटतायत.
पैठणी सिल्क वाटत नाहीये.
माफ करणे.

सर्वांना आवडल्या, आता आणखी प्रकार (साड्या नाहीत) हाताळून बघतो.
नी मला खरा प्रतिसाद हवाच होता. नव्यानेच सुरवात केलीय.
इथे तर माझ्या डोळ्यासमोर कुठलीच साडी नाही. सगळे आठवूनच काढतोय.
थोड्या पेंटब्रशच्या पण मर्यादा आहेतच. पण पुढच्यावेळी नक्की लक्षात ठेवेन.