तुझा निरोप घेऊन
तीनदा 'येतो गं' म्हणून
जड पावलांनी मी निघालो
हळूच माझ्या मागे येऊन
खांद्यावर हात ठेऊन म्हणालीस...
"मी आहे!"
पाठ वळताच भयाण पोकळी जाणवू लागली
तुझ्याविना जगाची तसवीर मला भिववू लागली
जलतरंगाचा नाद व्हावा असा तुझा आवाज
पुन्हा कधी ऐकायला मिळेल
असं वाटू लागलं, तेव्हा
फोन आलाच तुझा, म्हणालीस...
"मी आहे!"
घरी आलो, अगतिकपणे बसलो खिडकीत
गाडी सुटली असेल का तुझी, असा खिन्न विचार करत
श्रावणातला ऊन-पावसाचा खेळ चालला होता बाहेर
धावत येऊन तुला भेटण्याची ओढ दाटून आली
तुझा मेसेज आलाच, "मी निघालीये रे..."
वाटलं कळवावं का तुला,
गर्दीत आहे, सार्यात आहे... पण एकटाच मी!
आणि नकळत, माझ्याच आतून आला गं आवाज....
आश्वासक...
"मी आहे रे, मी आहे!!"
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
ब्लॉगवर पूर्वप्रकाशित
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
ठीक आहे
ठीक आहे
छान
छान
सर्वांना धन्यवाद
सर्वांना धन्यवाद
सुंदर.
सुंदर.
छानच आहे! मनातलं सहजपणे
छानच आहे! मनातलं सहजपणे संगितलय!
छान कविता!! अन् बदल पण आवडला
छान कविता!! अन् बदल पण आवडला हो
जलतरंग ???? कुठे वाचलय बरं
जलतरंग ???? कुठे वाचलय बरं हल्ली ???
मंद्या, पुन्हा एकदा सांगतो... जरा सावकाश.... 
मस्त कविता !
मस्त कविता !
नही आवड्या, स्वारी!
नही आवड्या, स्वारी!
मंदार, तुझ्या कवितारुपी
मंदार, तुझ्या कवितारुपी जलतरंगाचा मंजुळ नाद भावला रे !
सुपर्ब..!
सुपर्ब..!
मंदार, काही वर्षापुर्वी मी एक
मंदार, काही वर्षापुर्वी मी एक इमेल वाचले होते त्याची आठवण झाली..
त्यात, 'तुला जेव्हा माझी गरज भासेल मी तुझ्या सोबत असेन...' वैगरे वैगरे..
तसेच काहीसे वाटले..
बाकी छान रचना आहे..
फारच छान.
फारच छान.
तुझा मेसेज आलाच, "मी निघालीये
तुझा मेसेज आलाच, "मी निघालीये रे..."
वाटलं कळवावं का तुला,
गर्दीत आहे, सार्यात आहे... पण एकटाच मी!
"मी आहे रे, मी आहे!!" >> "जान लेवा" लिहलं आहेस रे मंद्या......आणखी काहीच बोलत नाही!!!
वाटलं कळवावं का तुला, गर्दीत
वाटलं कळवावं का तुला,
गर्दीत आहे, सार्यात आहे... पण एकटाच मी!
आणि नकळत, माझ्याच आतून आला गं आवाज....
आश्वासक...
"मी आहे रे, मी आहे!!">>>> मस्तंच.. आवड्ली..:)
मस्त रे.....
मस्त रे.....
व्वा!!!!
व्वा!!!!
छान आहे................सोपे
छान आहे................सोपे शब्द वापरलात
मी पण आहे रे
मी पण आहे रे
छान आहे.
छान आहे.
सुंदर
सुंदर
वा वा! अरे हा मंदार सध्या
वा वा!
अरे हा मंदार सध्या कुठे आहे?
मंदार ये परतोनी
Mandar, Great Be yourself;
Mandar, Great
Be yourself; everyone else is already taken, Its better than floccinaucinihilipilification
मस्त!
मस्त!
मंदारची कविता आज अचानक वर
मंदारची कविता आज अचानक वर ?
मंदार तू आहेस रे

तू आहेसच.
मला एकाने कळवलंय पण तसं
हृदयस्पर्शी कविता
हृदयस्पर्शी कविता
माझ्यासारख्या बयोवृद्ध
माझ्यासारख्या बयोवृद्ध मनुष्यालाही प्रेमाचे अंकुर फुटावेत इतकी ताकद आहे तुमच्या या प्रेमकवितेत. नक्कीच मोही प्रेरणा, साधना असेल यामागे.
अजूनही लिहीता का तुम्ही अशा प्रेमकविता ?
आवडली
आवडली
अप्रतिम...
अप्रतिम... मस्तच!!!
श्रावणातला ऊन-पावसाचा खेळ चालला होता बाहेर
धावत येऊन तुला भेटण्याची ओढ दाटून आली>>> भारी
Pages