Submitted by अभय आर्वीकर on 30 August, 2011 - 07:36
क्षण एक पुरे जगण्यास खरा
जगणे कसले शतवर्ष नरा?
क्षण एक पुरे जगण्यास खरा
लपवून व्यथा रडतोय मनी
दिसतोच सदा मुखडा हसरा
जगणेच नको असले तसले
परसात पडून जणू कचरा
मरणास इथे नच घाबरतो
असते जगणेच कठीण जरा
श्रमतो, दमतो, शिणतो पुरता
परिहार जणू जुळता नजरा
दिसतात इथे जन सज्जन हे
अपुलाच स्वभाव नसेल बरा
रुळताच मनी भलतेसलते
पुसतात कशास हवा नवरा
वरदान मिळो "अभया"त जगा
दररोज घरात जणू दसरा
- गंगाधर मुटे
----------------------------------
पुण्यनगरी दीपावली विशेषांक २०११

ही गझल प्रकाशित झाली आहे.
----------------------------------
वृत्त : तोटक रदीफ : गैरमुरद्दफ
----------------------------------
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
आपण ज्याला आकलनशक्ती म्हणत
आपण ज्याला आकलनशक्ती म्हणत आहात त्याला सौंदर्यदृष्टी असा शब्दही प्रचलित आहे आणि तो आधिक थेटही आहे.
शृंगाररसाची लावणी आणि विरक्तीची ओवी ह्या बेफिकीर यांनी वापरलेल्या प्रतिमा आहेत असे वाटते त्यामुळे त्या त्या रसाला थेट विचारात घेण्याची गरज नाही असे वाटते
शृंगाररसाची लावणी आणि
शृंगाररसाची लावणी आणि विरक्तीची ओवी ह्या बेफिकीर यांनी वापरलेल्या प्रतिमा आहेत असे वाटते त्यामुळे त्या त्या रसाला थेट विचारात घेण्याची गरज नाही असे वाटते
खरे आहे. सहमत.
Pages