क्षण एक पुरे जगण्यास खरा : पुण्यनगरी दीपावली विशेषांक २०११

Submitted by अभय आर्वीकर on 30 August, 2011 - 07:36

क्षण एक पुरे जगण्यास खरा

जगणे कसले शतवर्ष नरा?
क्षण एक पुरे जगण्यास खरा

लपवून व्यथा रडतोय मनी
दिसतोच सदा मुखडा हसरा

जगणेच नको असले तसले
परसात पडून जणू कचरा

मरणास इथे नच घाबरतो
असते जगणेच कठीण जरा

श्रमतो, दमतो, शिणतो पुरता
परिहार जणू जुळता नजरा

दिसतात इथे जन सज्जन हे
अपुलाच स्वभाव नसेल बरा

रुळताच मनी भलतेसलते
पुसतात कशास हवा नवरा

वरदान मिळो "अभया"त जगा
दररोज घरात जणू दसरा

                           - गंगाधर मुटे
----------------------------------
पुण्यनगरी दीपावली विशेषांक २०११

ही गझल प्रकाशित झाली आहे.
----------------------------------
वृत्त : तोटक       रदीफ : गैरमुरद्दफ
----------------------------------

गुलमोहर: 

लपवून व्यथा रडतोय मनी
हसतोच सदा दिसतो हसरा>>> मस्त

जगणेच नको असले तसले
परसात पडून जणू कचरा>>> सुंदर

-'बेफिकीर'!

कणखर, इतक्या लगेच प्रतिसाद दिलात म्हंटल्यावर आता कंपूबाजीच्या आरोपाला सामोरे जायची तयारी ठेवा.

Lol

चांगल्याला चांगलेच म्हणणारे काही लोक आहेत ज्यांच्या इंटेन्शन्स वर शंका घेतली जातीये हे समस्त मायबोलीकरांना कळेलच भूषणजी Happy

मुटेजी हा प्रतिसाद आपल्याला उद्देशून नाही ह्याबद्दल खात्री बाळगावीत.

जगणेच नको असले तसले
परसात पडून जणू कचरा

मरणास इथे नच घाबरतो
असते जगणेच कठीण जरा
.........................................मस्तच! Happy

आर्याजी, अनिलजी,
प्रतिसादाबद्दल आभार. Happy

<मरणास इथे नच घाबरतो
असते जगणेच कठीण जरा<

मुटे सर,अगदी मनातलं लिहिलं. प्रत्तेक शेर वजनदार .खूप आवडली गझल .

मस्त.

मस्त!:)

----------------------------------
पुण्यनगरी दीपावली विशेषांक २०११

ही गझल प्रकाशित झाली आहे.
----------------------------------

तोटक की त्रोटक??

फोटो फार आवडला. तोही 'त्रोटकच' वृत्तात दिसतोय. आपले अभिनंदन, इतक्या सुंदर स्त्रीने आपली गझल स्वीकारल्याबद्दल!

Happy

-'बेफिकीर'!

तोटक की त्रोटक??

फोटो फार आवडला. तोही 'त्रोटकच' वृत्तात दिसतोय. आपले अभिनंदन, इतक्या सुंदर स्त्रीने आपली गझल स्वीकारल्याबद्दल!

Happy

-'बेफिकीर'!

वृत्ताचे नाव तोटक किंवा त्रोटक नसून बहूतेक "विस्फोटक" असावे.

कारण माबोवर या वृत्ताने एंट्री "विस्फोटक" स्वरुपातच केली आहे. Happy

-----------------
ती स्त्री सुंदर की गझल सुंदर
सर्वाधिक कोण सुंदर?
हा निर्णय व्यक्तिसापेक्ष असू शकेल. Wink

गझल आणि त्या स्त्रीची तुलना अवघड आहे. वरच्या फोटोतील स्त्री शृंगाररसाची लावणी आहे तर गझल ही विरक्तीच्या वाटेवर नेऊन सोडायला उत्सुक असलेली ओवी! Happy

भूषणजी,

मुटेजी एकंदर गझलेबद्दल म्हणत असावेत, त्यांच्या ह्या गझलेबद्दल नाही.

बघा, झाला की नाही तुमचा पॅराडाईम शिफ्ट Wink

मुटेजी,

सगळे काही मानन्यावर आहे असे म्हणावेसे वाटते. मन चंगा तो सब चंगा असे म्हणतात पंजाबीत

कणखरजी,

विषय सौंदर्याचा आहे, शृंगार किंवा विरक्तीचा नाही,

सौंदर्य जसे शृंगारात असते, तसेच विरक्तीतही असू शकते.
ते सर्वस्वी शोधणार्‍याच्या आकलनशक्तीवर अवलंबून आहे. Happy

Pages