पाषाणभेद यांच्या लेखावरून मला आमच्याही अमेरिकेच्या प्रवासाची आठवण झाली. सध्या मी मलेशियामधे आमच्या दुसर्या सुनबाईंकडे आलो आहे. आमच्या एकुलत्या एक मुलाने मुसलमान धर्म स्वीकारला असून आमची एक सूनबाई अमेरिकेत आणि दुसरी मलेशियात असते. त्यामुळे आम्ही दोन्हीकडे आलटून पालटून असतो. आम्ही अमेरिकेचे ग्रीन कार्ड ,मलेशियाचे रेड कार्ड आणि भारताचे रेशन कार्ड घेतले आहे. मुलाचा आदर्श माझ्याही डोळ्यासमोर आहे. एक घर भारतात आणि एक परदेशात असावे असे माझे स्वप्न आहे. पण "हे विश्वची माझे घर" हे आमच्या सौ. ना अजिबात कळत नाही त्यामुळे मला त्याच्या पाऊलावर पाऊल ठेवता येत नाही. ते खरे झाले तर सौ. वरचा अर्धा भार कमी होईल. एक मराठी व्यक्ती दुसर्या मराठी व्यक्तीला मागे ओढते ती अशी. माझे स्वप्न माझ्या मुलाने तरी पूर्ण करून दाखवले याचा मला अभिमान आहे.
डब्यात दशम्या घेऊन जाऊ नये. कारण फक्त लुफ्तांसाने जर्मनीतून गेलात तरच त्या दशम्या टिकतात. बाकी सगळ्या एअरलाईनमधे त्या खराब होतात हे मी स्वानुभवाने सांगतो.
आम्ही अमेरिकेच्या प्रवासाला जाताना नेहमी कॅंपातल्या मॅकडोनाल्डमधून बर्गर बांधून घेतो. तिथल्या मॅनेजरला "Want to carry to US" असे वेगळे इंग्रजीत सांगितले की तो बरोबर सगळी तयारी करून देतो. तिथे उपासाचे वेगळे बर्गरपण मिळतात. जंगली महाराजवरच्या मॅकडोनाल्डमधल्या गावंढळ माणसांना "अमेरिकेला विमानातून बर्गर न्यायचे आहे" वगैरे काही कळत नाही. तिथे फक्त पुण्यातल्या पुण्यात खायचे बर्गर घ्यावेत.
अर्बाना शँपेन, इलिनॉयच्या लायब्ररीत भरपूर मराठी पुस्तके आहेत. ती कुठल्याही गावातून मागवता येतात. मी पुण्यात कधी मराठी पुस्तकं वाचत नाही. पण मी आल्यावर सूनबाईंच्या मागे लागून आमच्या गावातल्या लायब्ररीतर्फे मुद्दाम मागावून घेतली. ३ महिने लागले. पण फु़कट आहेत म्हटल्यावर का नको? आणि म्हटले माझ्यापेक्षा तिला आपल्या संस्कृतीची ओळख होईल.
अमेरिकेत गेलाच आहात ते लॅंडर , वायोमिंग इथे जाऊन या. तिथे डाऊनटाऊनमधे एक भारतीय सोनार राहतो. त्याला "आम्ही भारतातून अंदमानातून आलो आहोत" असे सांगितले तर तो स्वस्तात हिरे देतो. पण आम्ही पुण्याचे असे अजिबात सांगू नका, त्याची सासुरवाडी पुण्याची आहे.
सियाटलवरून बोइंगने मुख्यालय शिकागोला नेले आहे. पण सियाटलवाले अजूनही जी कस्टमर सर्वीस देतात ती शिकागोला मिळत नाही. तुम्ही जर एयरबसवाले मला २०% डिस्काऊंट देतायत असे सांगितले तर सियाटल मधले बोईंगवाले (फक्त सियाटल, शिकागो नाही !) तो नुसता मॅच करत नाही तर आणखी २% जास्त (एकूण २२%) डिस्काऊंट देतात. पण २०% पेक्षा जास्त सांगू नका कारण त्यांना बरोबर कळतं तुम्ही बंडल मारत आहात म्हणून. तितके ते हुषार असतात. आणि तुमचे केमन आयलंडमधे बॅंकेत खाते असेल तर विमानाची डिलिव्हरी तिकडे घ्यायची, म्हणजे टॅक्सपण वाचतो. मला ही आयडीया फार फार आवडली. कारण तुमचे काही मिलियन डॉलर्स या युक्तिमुळे वाचू शकतात. (२२% डीस्काऊंट्+टॅक्स फ्री+ केमन आयलंडपर्यंत फ्री तिकिट)
मायामीला जाणार असाल तर तिथल्या ब्रोकरची अपॉईंटमेंट घेऊन ठेवाच. घरं सध्या पुण्यापेक्षा मायामीला स्वस्त मिळतायत. आणि आता तिथल्या काँट्रॅक्टवर सही करायला इथून पेन घेऊन जाता येतं. तितकेच तुमचे पेनातले डॉलर वाचतात. मी अजून घर घेतलं नाही पण जाताना विमानातच हवाईसुंदरीकडून उसनं घेतलेलं पेन अजून तसंच मुद्दाम ठेवलं आहे. त्यामुळे घर घ्यायच्या अगोदरच डॉलर आणि रुपये दोन्ही वाचले. हा नवीन नियम झाला आहे. अगदी १००% टक्के माहिती बरोबर आहे. मागे बुश आला होता तेंव्हा अणुकरारावर सही करण्यासाठी त्यानं भारतात असून अमेरिकन पेन वापरलं. त्यामुळे त्यांना आता आपल्यालाही आपलं पेन वापरायची परवानगी द्यावीच लागली.
तुम्हाला अजून काही टीप्स हव्या असतील तर मला केंव्हाही विचारा. तुमच्या कडे इतर काही टीप्स असतील तर इथे जरूर लिहा.
(हे लेखन अगोदर पाषाणभेद यांच्या लेखनाला प्रतिक्रिया म्हणून केले होते. पण खास लोकाग्रहास्तव एक वेगळा लेख म्हणून लिहले आहे. पुनरावृत्तीबद्दल क्षमस्व)
परदेशी कंपन्यांचा निषेध!
परदेशी कंपन्यांचा निषेध! स्वदेशी माल वापरा. अंतरिक्षने नुकताच नवीन अग्निबाण विकायला काढलाय. एकदा आकाशात उडवला की उतरवायचं झंझट नाही. गंतव्यस्थानी फक्त छत्रीतून उडी मारायची.
-गा.पै.
आजची बातमी खूप छान
आजची बातमी खूप छान आहे.
http://www.bloomberg.com/news/2012-06-13/boeing-747-prices-tumble-as-hig...
बोईंगने किमती कमी केल्या आहेत.
>>> च्चच्च्च्च्च... इतकंच वाचून लगेच माझ्या केमन आयलंडवरील एका खात्यातून पैसे ट्रान्स्फर करायला सुरूवात ही केली की!.... पण मग.....
पण लगेच आज घ्यायची घाई करू नका. पुढच्या आठवड्यात एअरबसपण किंमती मॅच करेल तेंव्हा घ्या म्हणजे किंमत तीच पडली तरी आफ्टरसेल सर्वीससाठी घासाघीस करता येईल. >>> हे वाचलं. मग लग्गेच ट्रान्स्फर कॅन्सल केली.
पण तेवढ्या वेळात थोडे पैसे झालेच ना ट्रान्स्फर! मग फोनाफोनी, इमेलाइमेली करून लक्षात आलं की बोईंगवाले पैसे परत देत नाहीत. त्याबदल्यात त्यांनी मला चॉईस दिलाय - एक चाक, नाहीतर एक पंख, नाहीतर एक शेपटी मिळेल. शेपटी घेऊन काय करू? पंख घेतला तर घरातल्या घरात घसरगुंडी बनवता येईल. नाहीतर चाक बेश्ट! माझ्या गराजमधल्या एखाद्या हयाबुसाला लावून टाकेन. अगदीच विशोभित दिसत असेल तर स्वयंपाकघरातल्या पाण्याच्या पिंपाखाली ठेवायला उपयोगी होईल.
'हात दाखवा, (एअर)बस थांबवा..'
'हात दाखवा, (एअर)बस थांबवा..' >>>>
वेगळा विदर्भ झालाच
वेगळा विदर्भ झालाच पाहिजे...
(फ्रोझन पोळ्यांवर अजय यांनी लिंक दिल्याने पुन्हा प्रतिक्रिया देणे भाग पडले.)
अजूनपर्यंत हा लेख कसा नव्हता
अजूनपर्यंत हा लेख कसा नव्हता वाचला!!!
वेगळा बबन झालाच पाहीजे -
वेगळा बबन झालाच पाहीजे
- वैतागलेला विदर्भ
>>वेगळा बबन झालाच पाहीजे -
>>वेगळा बबन झालाच पाहीजे
- वैतागलेला विदर्भ >> फस्सकन हसले.
लेख, वरिजनल लेख आणि दोन्हीवरच्या कॉमेंट्स अशक्य!! माबोचा ईसकाळ झालाय.
छान लेख. वाचून डोळ्यांत पाणी
छान लेख. वाचून डोळ्यांत पाणी आलं.
- वाचक
लोखंडाची साखळी तुटेल पण आई
लोखंडाची साखळी तुटेल पण आई बाबांची माया कधीच तुटणार नाही
- माया
किल्लेदारांनी बर्गर पार्सल
किल्लेदारांनी बर्गर पार्सल न्यायला माझ्याकडून ४००० रुपये उसने घेतले. शिवाय त्यांना मी लुनावरून कॅम्पापर्यंत लिफ्ट दिली. नंतर ते ४००० परत करायला नको म्हणून ते अमेरिकेतच स्थायिक झाले. (अधूनमधून मलेशियात जातात!) मी आठवड्यातून एकदा लुनाने सहारला जाऊन त्यांच्याबद्दल चौकशी करायचो. म्हणून तातडीने एक्स्प्रेसवे बांधून त्यावर टूव्हीलर न्यायला बंदी घातली गेली.
- श्री. ब्रह्मे (ओरिजिनल. लुनावरचा होलोग्राम पाहून खात्री करा.)
प्रिय ओबामा, पूर्वी इथल्या
प्रिय ओबामा, पूर्वी इथल्या खासदारांनी तुम्हाला पत्र लिहिले होते की मोदींना व्हिसा देऊ नका. आज मी देखील पत्र लिहीत आहे की पुण्यातल्या एकाही ज्येष्ठ नागरिकाला कोणताही व्हिसा देऊ नका. व्हिसा द्यायचाच झाला तर आधी अट घाला की मुक्तपीठ मध्ये लेख लिहिणार नाही आपला .................
काय तरी माणसे !! आमच्या सासरे
काय तरी माणसे !! आमच्या सासरे बुवांचे तेच तेच शिळे विनोद सतत सहा महिने ऐकायचे म्हणजे नुसता पीळ होता. कधी एकदा भारतात परत जातात असे व्हायचे .
पाभे सं. किल्लेदारांची अमेरिकन सून:
जंगली महाराज मॅकडोनाल्ड्वाला-
जंगली महाराज मॅकडोनाल्ड्वाला- शुक्रवार ६ जून २०१४ -११:०० AM IST
खोटं बोल्तोय किल्लेदार, वडापावकडे बोट दाखवुन तो बर्गर केवढ्याला आहे असं इचारत हुता..आणि अम्हाला गावंढळ काय म्हणतोस मी पण नुयोर्क बुद्रुक ला बर्गर विकलेले हायेत.
आणी हो तो कॅंपवाला तुझा नंबर इचारत होता उधारी मागण्यासाठी, देउ का देउ?
पुण्यातला लायब्ररीयन-शुक्रवार ६ जून २०१४ -११:१५ AM IST
ओ किल्लेदार, आता पुस्तकं ढापायचा धंदा अर्बाना शँपेन, इलिनॉयच्या लायब्ररीतपण सुरु केला का. तेवढी पुलंची चार पुस्तके परत करा.
@वाचक -शुक्रवार ६ जून २०१४ -११:१६ AM IST
डोळे फुटले काय रे तुझे सारखं पाणी आणतोय ते.
फणसकाकु-शुक्रवार ६ जून २०१४ -११:१८ AM IST
ये हुइ ना बात! बरं झालं बाई हा लेख आला, माझा थोडा पिच्छा तरी कमी होइल, किल्लेदार तयार रहा, पुणेकर सत्कार करतील तुमचा आता शनिवारवाड्यासमोर, माझी खणा नारळाने ओटी भरली होती ह्या लोकांनी.
हाय कम्बख्त मैने तो कुछ देखाही नही, दुध ओतु गेलं किचनमध्ये.
तप्तर्षी मांजर-शुक्रवार ६ जून २०१४ -११:२० AM IST
माझी मांजर पण लुफ्तान्सानेच प्रवास करते. तिलाही दशम्या आवडतात.
सरस्वती सुर्य-घाटात फुटला घाम-शुक्रवार ६ जून २०१४ -११:२० AM IST
माझ्या सुनेचा पहिला हिवाळा आहे, आम्ही महिन्याच्या तिसर्या शनिवारी निघतोय अमेरिकेला, तिसर्या शनीवारी मुलाला सुटी असतेना म्हणून. काय हो लुफ्तान्सा वाले बॅटबॉल विमानात ठेवायला प्रवानगी देतात का?
सिम-शुक्रवार ६ जून २०१४ -११:२२ AM IST
मांजराला फाइट देनार हा लेख आता..
डिस्लाइक-शुक्रवार ६ जून २०१४ -११:२३ AM IST
काही नाही सहजच आलो होतो, डिस्लाइक करुन जातो जाता जाता.
उंदिर-शुक्रवार ६ जून २०१४ -११:२३ AM IST
अरे ती डिकीतली मांजर कुठे गेली, मुका घ्यायचा होता मला..
झंडुबाम-शुक्रवार ६ जून २०१४ -१२:२३ PM IST
बबन्या कुठाय वेगळ्या विदर्भावाला, आला नाही अजुन तो.
पोपा मादाम-शुक्रवार ६ जून २०१४ -१२:२३ PM IST
खुप मोठा झालास हो किल्लेदारा, मी गणिताच्या तासाला हिंदीतुन इतिहास शिकवायचे ना त्याचंच यश बरका हे!
पुणेकर अस्सल-शुक्रवार ६ जून २०१४ -१२:२४ PM IST
तद्द्न फालतु लेख! सुकाळवाले काहीही छापतात, अमेरिकावारी असली की झालं! कृपया प्रतिक्रिया छापा, माझ्या प्रतिक्रिया छापत नाही तुम्ही आजकाल.
लेख अन प्रतिक्रिया अफाट आहेत
लेख अन प्रतिक्रिया अफाट आहेत
अग्निपंख..
अग्निपंख..
मी दोन्ही लेख आजच वाचले.
मी दोन्ही लेख आजच वाचले. अशक्य हसतेय.
(तिकडे) अजय यू टू? असं म्हणावंसं वाटलं होतं, पण हसण्याबरोबर गिळ्ळं
मी पण दोन्ही आत्ताच वाचले.
मी पण दोन्ही आत्ताच वाचले. हसून हसून मेले. प्रतिसाद ही झकास.
लोखंडाची साखळी तुटेल पण आई
लोखंडाची साखळी तुटेल पण आई बाबांची माया कधीच तुटणार नाही
- माया
<<<<<
बेस्ट आहे व्हॉट्सअॅप स्टेटस म्हणून.
हे अशक्य आहे.
हे अशक्य आहे.
बेळगाव महाराष्ट्रात आलच
बेळगाव महाराष्ट्रात आलच पाहिजे...
Pappu
काही नाही सहजच आलो होतो,
काही नाही सहजच आलो होतो, डिस्लाइक करुन जातो जाता जाता >>>>> भारी
<<जंगली महाराजवरच्या
<<जंगली महाराजवरच्या मॅकडोनाल्डमधल्या गावंढळ माणसांना "अमेरिकेला विमानातून बर्गर न्यायचे आहे" वगैरे काही कळत नाही. तिथे फक्त पुण्यातल्या पुण्यात खायचे बर्गर घ्यावेत.>>
अग्निपंख, बरी आठवण झाली. इथे
अग्निपंख,
बरी आठवण झाली. इथे जाऊन रोजचा डिसलाईक मारला. सगळ्यांनी मारा पाहू. १५००० चुटकीसरशी पुरे होतील.
आ.न.,
-गा.पै.
गा.पै. मी पण एक डिसलाइक करुन
गा.पै.
मी पण एक डिसलाइक करुन आलो.
१५००० होतिल आता लवकरच, २५१ बाकी आहेत
गाम्या म्या बी हाणून आलु येक
गाम्या म्या बी हाणून आलु येक डिसलाईक
महा माया - रविवार , 17
महा माया - रविवार , 17 जानेवारी 2015 - 09:22 AM IST
लोखंडाची साखळी तुटेल पण आई बाबांची माया कधीच तुटणार नाही
अचाट
अचाट
हा हा हा अचाट आहे हे!
हा हा हा अचाट आहे हे!
आता मुक्तपीठ फारच एडिट करतात.
आता मुक्तपीठ फारच एडिट करतात. लेखाचा ओघ च जातो. पूर्वीचे दिवस गेले.
पूर्वीचे दिवस गेले >> 'दिवस
पूर्वीचे दिवस गेले >> 'दिवस गेले'? अभिनन्दन!
Pages