मैत्री

Submitted by आर अविनाश. on 22 August, 2011 - 10:34

मैत्री

एवढीशी वेल असते
पण सार्‍या झाडाला वेढते,
झाडालाही मग त्या
वेलीची सवय जडते,
दोघांचीही मैञी मग
वसंतात फ़ुलुन येते,
पण ग्रीष्माच्या तडाख्याने
वेल पार जळुन जाते,
झाड माञ संकटातुनही
ठामपणे तरुन जाते,
आपली मैञीही अशीच
नुकतीच फ़ुलु लागलेली,
वसंताच्या चाहुलीनं
आणखीनचं बहरु लागलेली,
पण, भिती वाटतेय रे जळण्याची,
मैञी फ़ुलण्याआधीच
चल ना दोघेही झाड होवु,
ग्रीष्म येण्याआधीच...

अविनाश

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

त्या प्रेमाची आठवण...!
मी बरसलो आज शब्दांतुन ,
तीला एकही शब्द ना कळला कधीमी ओघळलो आजडोळ्यांतुन ,
तीचा थेबंही ना गळलाकधी.
सोडुन मान सन्मान माझा मीच दगडापुढे हात जोडीले मी कोसळलो दरड होऊन ,
तीचा एकही बुरुज ना ढळला कधी.
तीची एकही बोली नाहीआज लिलावात या माझ्यामी बसलो बाजार मांडून ,
तीने भाव माझा ना विचारला कधी.
आयुष्यभर तीच्या कुपंणाबाहेर जागा माझी नित्याचीमी राहीलो कुंपण बनुन ,
तीने हा निवडूंग अंगणात ना लावला कधी.
सा-याच राती तीच्या चादंण्याच्यां मिठीत गेल्या मी जगलो काजवा होऊन ,
तीला उजेड माझा ना दिसला कधी.
आठवतय रोज जाळं तीच पसरवण तळ्यात चद्रंबिबांसाठीमी राहीलो शिपलं बनुन ,
माझ्यातला मोती तीने ना शोधला कधी
मी होतो पाखरु जळणारा ती ज्योत होती मला जाळणारी मीजळालो पाखरु बनुन ,
तिला एकही चटका ना लागला कधी.
मी लाचार इतका की आज माझीच कीव मज यावीमीमला दिले आगीत झोकून,
तीचा धुराकडेही जिव ना वळला कधी.
आता मज नकोच तिच्या प्रेमाच्या उसण्या त्या थापामी चाललो स्वप्न मोडुन ,
तीने स्वप्नांतही मला ना सोडला कधी