Submitted by बागेश्री on 19 August, 2011 - 05:55
डॉक्टर सर, तरहीत माझा पण सहभाग! आनंदयात्रींचे चे पुन्हा आभार
____________________________________
ललाटी तुझ्या या, मला रेखतो मी!
जगावेगळे मागणे मागतो मी
नशीबा उसासू नको व्यर्थ आता,
असे काय उरले, कुणा राखतो मी?
ठरवले जगाने मला ठार वेडा,
न असण्यात- असणे, तुझे मानतो मी..!
जगाला नको मी, असू दे तसेही!
कसे सत्य पचवू, तुला बाधतो मी?
सरी पावसाच्या, तुफानी बरसती
तरी कोरडा का, असा राहतो मी?
जिथे मी तिथे तू, कसे हे कळेना?
भ्रमी बघ अताशा, सुखे नांदतो मी
उमटशी कशी तू, चिटोर्यात माझ्या?
गझल तू खरी, फक्त रेखाटतो मी....!
गुलमोहर:
शेअर करा
गझल तू खरी, फक्त रेखाटतो
गझल तू खरी, फक्त रेखाटतो मी..>>>
गझल स्वच्छ व छान झाली आहे.
छान.
छान.:)
>>जिथे मी तिथे तू, कसे हे
>>जिथे मी तिथे तू, कसे हे कळेना?
भ्रमी बघ अताशा, सुखे नांदतो मी
सुंदर......खूप आवडली
ठरवले जगाने मला ठार वेडा, न
ठरवले जगाने मला ठार वेडा,
न असण्यात- असणे, तुझे मानतो मी..!...व्वा
सरी पावसाच्या, तुफानी बरसती
तरी कोरडा का, असा राहतो मी?....सुरेख.
गझल तू खरी, फक्त रेखाटतो मी.... वा वा ..
व्वा छान झालीये गझल.
मस्तः)
मस्तः)
बेफी,डॉक ,विदिपांचा प्रतिसाद
बेफी,डॉक ,विदिपांचा प्रतिसाद मग आजुन काय पाहिजे...
मस्तच
काय सांगु मला खरच कळत नाही
काय सांगु मला खरच कळत नाही गझलेतलं
सुरेख.
सुरेख.
व्वा...!
व्वा...!
ठरवले जगाने मला ठार वेडा, न
ठरवले जगाने मला ठार वेडा,
न असण्यात- असणे, तुझे मानतो मी..!
जगाला नको मी, असू दे तसेही!
कसे सत्य पचवू, तुला बाधतो मी?
हे आवडले..
सुटे मिसरे छान आले आहेत...

छान
छान
गझल आवडली.
गझल आवडली.
बेफिजी, कणखरजी, नचिकेत,
बेफिजी, कणखरजी, नचिकेत, डॉकाका, अरविंदजी,मुक्ता,क्रांतिजी, मुटेजी- मनापासून आभार....
स्मितु, मंदार, किश्या, हर्षदा- गझलेचा आस्वाद घेतल्याबद्दल फार आभार तुमचे
बागेश्री, प्रेमात पडले आहे मी
बागेश्री, प्रेमात पडले आहे मी तुझ्या लिखाणाच्या. तुफान सुंदर लिहिलं आहेस. काय आवडलं सांगायचं तर वरची पुर्ण गझल पेस्ट करायला लागेल मला. अप्रतिम !
मंदार, ही पण प्रिंट टाकते कुरियर मधे. बघ उशीर झाल्याचा फायदा.
शेवटचा शेर खास आवडला
शेवटचा शेर खास आवडला
छान..
छान..
चातक, वीरु धन्स! माऊ
चातक, वीरु धन्स!
माऊ
छान गझल ..
छान गझल ..
गझल तू खरी, फक्त रेखाटतो
गझल तू खरी, फक्त रेखाटतो मी....!
>>>>>>>>>>>>>>>>>
एकदम परफेक्ट...!!!!!
शुभेच्छा.