हुरहूर

Submitted by आनंदयात्री on 27 July, 2008 - 10:35

हुरहूर

वेगळे हे माणसांचे नूर आता
वाटतो सर्वांस मी निष्ठूर आता

मी स्वतःच्या ऐकतो गाणे मनाचे
समजुतींचा कोष झाला दूर आता

शेवटी तुजला हवे ते मिळवले तू
गमवल्याचा नाटकी का सूर आता?

शब्दही माझा जिथे कळलाच नाही
मौन का वाटे तुला मग्रूर आता?

राख झाली त्या अबोली भावनांची
आठवांचा येत आहे धूर आता

दु:ख वाटावे असे काहीच नाही
हीच आहे नेमकी हुरहूर आता
नचिकेत जोशी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

राख झाली त्या अबोली भावनांची
आठवांचा येत आहे धूर आता

दु:ख वाटावे असे काहीच नाही
हीच आहे नेमकी हुरहूर आता<<<

व्वा!

आठवांचा येत आहे धूर आता - सुरेख ओळ

दु:ख वाटावे असे काहीच नाही
हीच आहे नेमकी हुरहूर आता >>>
खुप म्हणजे खुपच छान! मी नुकतीच मायबोलीवर आले तेव्हाची आहे बहुतेक. आज वाचली Happy

दु:ख वाटावे असे काहीच नाही
हीच आहे नेमकी हुरहूर आता
----- एकूण गझल क्लास!
जयन्ता५२

Pages