**********************************************************
"हे जीवन एक रंगमंच. कधी आपण असतो या रंगमंचावरचे कलाकार. एखाद्या नटसम्राटाप्रमाणे आपण आपल्या भावना कधी हावभावातून तर कधी नुसत्या नजरेतून व्यक्त करतो आणि कधी आपण बनतो या रंगमंचावरचे सूत्रधार. मग आपला कॅमेराच बनतो आपली नजर आणि घेऊन जातो एका अनोख्या दुनियेत. पण कधी असतो आपण फक्त एक प्रेक्षक. या जीवनाच्या रंगमंचावर उमटणार्या सुख-दु:ख, आशा-निराशा यांची दृश्य बघणारे... नजरेने अनुभवणारे....
अश्या अद्भुत नजरेची ही वैविध्यपूर्ण अदाकारी यंदा आपण टिपणार आहोत प्रकाशचित्रांच्या माध्यमातून"
**********************************************************
विषय १: शब्दांवाचुन कळले सारे...
क्षणात रुसणे, क्षणात हसणे
कधी आसु, कधी सचिंत बसणे...
अर्थात इथे तुम्हाला टिपायचे आहेत डोळ्यातले भाव, चेहर्यावरचे आविर्भाव....
**********************************************************
विषय २: जादू तेरी नजर....
खरंच कुणाच्या नजरेत जादु असते का?? त्या जादुई नजरेतुन दिसणारं जगही तसंच अनोखं असेल नाही का?... मग यंदा आपण बघूया का त्या जादुई नजरेने दिसणारे नाट्य ?....
अर्थात इथे तुम्हाला दाखवायची आहे कॅमेरा आणि लेन्सची करामत. स्लो/फास्ट शटर स्पीड, हाय एक्सपोजर, आरश्याच्या वेगळ्याच कोनातली प्रतिमा, बुडबुड्यातून दिसणारी प्रतिमा, बहिर्वक्र, अंतर्वक्र भिंग इत्यादी वापरुन काढलेली प्रकाशचित्रे जी प्रेक्षकांना घेऊन जातील एका नव्याच जादुई दुनियेत....
**********************************************************
विषय ३: "आकाश तू आभास तू"
आकाश म्हणजे प्रकाश तर आभास म्हणजे सावली. प्रकाश-सावलीचे नाट्य आपल्या आजूबाजूला सतत घडत असताना दिसते. सावलीचे अस्तित्वच मुळी प्रकाशामुळे असते.
अर्थात, तुम्हाला इथे टिपायचे आहेत ते हेच प्रकाश आणि सावलीचे खेळ, त्यांच्यातील नाट्य... तुमच्या नजरेतून....
***********************************************************
नियम (बदलून) :
१. एका आयडीतर्फे एका विषयासाठी एकच प्रवेशिका स्वीकारली जाईल.
२. प्रकाशचित्र स्वत:च काढलेले असावे.
३. स्पर्धेसाठी पाठवलेले प्रकाशचित्र या आधी मायबोलीवर किंवा इतरत्र प्रकाशित झालेले नसावे.
४. कॅमेरा कुठला वापरला आहे (manual /digital SLR, aim & shoot, mobile, IPad etc) हे लिहिणे बंधनकारक आहे. त्यानुसार प्रकाशचित्रांची वर्गवारी केली जाईल.
५. कॅमेर्याच्या सेटिंगचे (शक्य तितके) तपशील देणे अपेक्षित आहे.
६. पिकासा, फोटोशॉप किंवा तत्सम फोटो एडिटींग सॉफ्टवेअर वापरण्यास परवानगी आहे. प्रकाशचित्रात असे काही बदल केले असल्यास काय बदल केले आहेत हे नमूद करणे अपेक्षित आहे.
७. फाईलचे आकारमान २०० kb पेक्षा जास्त नसावे व प्रकाशचित्राची मोठी बाजू (लांबी/रुंदी) ७५० पिक्सेल इतकी असावी.
८. प्रकाशचित्रांवर स्वतःच्या नावाचा किंवा वेबसाइटचा लोगो न टाकता "मायबोली गणेशोत्सव २०११" असा वॉटरमार्क टाकावा.
९. स्पर्धेसाठी प्रत्येक विषयाच्या दोन प्रवेशिका विजेत्या म्हणून घोषित केल्या जातील.
१०. प्रत्येक विषयाच्या विजेत्या प्रवेशिका निवडताना त्यात (manual /digital SLR) या प्रकारच्या प्रोफेशनल कॅमेर्याने काढलेले प्रकाशचित्र व (aim & shoot, mobile, IPad etc) या प्रकारच्या कॅमेर्याने काढलेले प्रकाशचित्र अशी वर्गवारी शक्यतो केली जाईल.
११. स्पर्धेचा अंतिम निकाल परीक्षकांच्या मताने ठरवण्यात येईल. तो स्वीकारणे सर्व स्पर्धकांवर बंधनकारक राहील.
**********************************************************
प्रवेशिका कशा पाठवाल?
१. स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठवताना ती गणेशोत्सवाच्या संयोजकांना sanyojak@maayboli.com ह्या पत्त्यावर इ-मेल करून पाठवणे अपेक्षित आहे.
२. तसेच इ-मेल पाठवताना photography spardha 1: bhaav (किंवा) photography spardha 2: jaadu (किंवा) photography spardha 3: aakaash असा विषय लिहावा. (एक नम्र विनंती : स्पेलिंगमधल्या चुका टाळण्यासाठी इथूनच कॉपी-पेस्ट करावे.)
३. संयोजकांना इ-मेल पाठवताना, प्रकाशचित्राच्या फाईलचे आकारमान हे २०० kb पेक्षा जास्त नसावे. प्रकाशचित्राची मोठी बाजू (लांबी/रूंदी) जास्तीत जास्त ७५० पिक्सेल अशी हवी.
४. स्पर्धेसाठी प्रकाशचित्र पाठवताना इ-मेल मधे प्रकाशचित्राची प्रत जोडावी. त्याच बरोबर मायबोली आयडी लिहावा आणि या विषयाला अनुसरून प्रकाशचित्रात विषय कसा हाताळला आहे ते एका ओळीत लिहावे.
५. प्रवेशिका संयोजकांना इ-मेल केल्यानंतर ती प्रवेशिका स्पर्धेच्या धाग्यावर प्रकाशित होण्यास २४ तासाची मुदत द्यावी. २४ तासानंतरही तुमची प्रवेशिका दिसत नसेल तर संयोजकांना इ-मेल करावी.
प्रवेशिका स्वीकारण्यास गणेश चतुर्थीला सुरूवात होईल व अनंत चतुर्दशीपर्यंत स्वीकारल्या जातील.
**********************************************************
'कोलाजमधिल सर्व प्रकाशचित्रे आंतरजालावरुन साभार'
दोन्ही विषय जबरदस्त आहे यात
दोन्ही विषय जबरदस्त आहे यात वाद नाही पण फक्त दुसर्या विषयाबाबत थोडंस
विषय २: जादू तेरी नजर....
बरेच जण SLR कॅमेरा नसल्याने डिजीकॅम किंवा मोबाईलने फोटो काढतात (गेल्यावर्षीच्या मायबोली गणेशोत्सवात काही सुंदर सुंदर फोटो मोबाईलनेही काढलेले होते) आणि त्यात स्लो/फास्ट शटर स्पीड, हाय एक्सपोजर, बहिर्वक्र, अंतर्वक्र भिंग हे फंक्शन्स नाहीत. त्यामुळे हा विषय SLR कॅमेरा असलेल्यांसाठी काहिसा सोपा आहे compare to डिजीकॅम/मोबाईल कॅमेरापेक्षा (हेमावैम).
तर हा विषय तसाच ठेवून अजुन एखादा विषय "अदाकारी" स्पर्धेसाठी वाढवता येईल का? ज्यात डिजीकॅम, मोबाईल, सेमी SLR, SLR कॅमेरा असलेल्या सगळ्यांनाच भाग घेता येईल. (गेल्यावर्षीच्या मायबोली गणेशोत्सव प्रचि स्पर्धेत तीन विषय होते
).
जिप्सीला अनुमोदन..
जिप्सीला अनुमोदन..
अरे पण मोबाइल कॅमेरा किंवा
अरे पण मोबाइल कॅमेरा किंवा इतर कमी सॉफिस्टिकेटेड क्यामेर्यात सुद्धा भरपूर धमाल करता येते की. सेटींग सोड पण अदरवाइज पण..
जिप्सी, आपल्या सूचनेबद्दल
जिप्सी, आपल्या सूचनेबद्दल धन्यवाद. विचार केला जाईल.
सही! विचार करावा लागेल... >>
सही! विचार करावा लागेल...
>> परीक्षकांकडून प्रत्येकच प्रवेशिकेसंदर्भात थोडक्यात का होईना टिप्पणी मिळू शकेल काय?
नीधपला अनुमोदन.
जिप्सी, साध्या डिजीकॅम मध्ये
जिप्सी,
साध्या डिजीकॅम मध्ये पण ही फंक्शन असतात की ... काही वेळेस ती कंट्रोलेबल नसतील ही (कारण ऑटो/प्री-फिक्स्ड मोड) पण ही सगळी माहिती त्या फोटोच्या EXIF टॅग मध्ये असते. ती शेअर करता येईलच
मोबाईल फोटों करता तुझी सूचना योग्य आहे.
जिप्सी अनुमोदन
जिप्सी अनुमोदन
नमस्कार, सभासदांच्या सूचनांचा
नमस्कार,
सभासदांच्या सूचनांचा आदर करून आणि परीक्षकांच्या संमतीने प्रकाशचित्र स्पर्धेमधे अजून एक विषय वाढवला आहे.
स्पर्धेचे काही नियम देखील आता बदलले आहेत याची कृपया नोंद घ्यावी.
संयोजक
संयोजकांनो.. मस्तच काम..
संयोजकांनो.. मस्तच काम..
धन्यवाद संयोजक तिसरा विषयही
धन्यवाद संयोजक

तिसरा विषयही भन्नाट आहे.
तिसरा विषयही भन्नाट आहे. >>
तिसरा विषयही भन्नाट आहे. >> ये हुई ना बात... आता मजा येईल. धन्यवाद संयोजक
>>एका आयडीतर्फे एका विषयासाठी
>>एका आयडीतर्फे एका विषयासाठी एकच प्रवेशिका स्वीकारली जाईल.
म्हणजे एक आय डी जास्तीत जास्त ३ प्रवेशिका पाठवू शकतो, बरोबर?
प्रविणपा, हो बरोबर. एक आयडी
प्रविणपा,
हो बरोबर. एक आयडी प्रत्येक विषयासाठी एक अश्या एकंदर तीन प्रवेशिका पाठवु शकतो/ते.
खूपच सुंदर विषय आहेत..
खूपच सुंदर विषय आहेत..
SLR कॅमेरा, स्लो/फास्ट शटर
SLR कॅमेरा, स्लो/फास्ट शटर स्पीड, हाय एक्सपोजर, बहिर्वक्र, अंतर्वक्र भिंग हे फंक्शन्स नाहीत. त्यामुळे हा विषय SLR कॅमेरा असलेल्यांसाठी काहिसा सोपा आहे compare to डिजीकॅम/मोबाईल कॅमेरापेक्षा >>>>>
मोबाईल कॅमेराव्यतिरिक्त (तोसुद्धा मुलांनी फंक्शन्स ऑन करुन दिल्यावर सर्व दिशा, उपदिशांना ओवाळणी करुन एकदाचे बटण क्लीकायचे एवढेच माहित आहे. मग परिणाम जो होईल तो होईल! ) माझे ज्ञान अगाध आहे.
जिप्सीने वर उल्लेखिलेले शब्द कशाशी खातात हे माहित नसले तरी आपल्या एकेका माबोकर जादूगारांची माबोवरील डोळ्यांचे पारणे फेडणारी, वास्तवदर्शी सुंदर प्रकाश चित्रे बघायला मला खुप आवडतात. म्हणून नेहमी माबोवर आल्या आल्या सगळ्यात आधी मी नविन प्रकाश चित्रे टाकली आहेत का ते बघते.
संयोजक असे मस्त विषय देऊन माझ्यासारख्या फक्त नेत्रसुख घेणार्या लोकांसाठी मेजवानी देत आहेत.संयोजक, धन्यवाद!
छान आहेत विषय
छान आहेत विषय
छान उपक्रम. फोटो गणेश चतुर्थी
छान उपक्रम. फोटो गणेश चतुर्थी आणि अनंत चतुर्दशी मधेच घेतला असला पाहिजे असा काही नियम आहे का? कि कधीहि घेतलेला असेल तर चालेल?
@ तेजस, फोटो गणेश चतुर्थी आणि
@ तेजस,
फोटो गणेश चतुर्थी आणि अनंत चतुर्दशी मधेच घेतला असला पाहिजे असा काहीही नियम नाही. परंतु फोटो विषयाशी सुसंगत असणे आणि त्याचबरोबर, कुठला कॅमेरा वापरला व त्याच्या सेटिंग्ज चे डिटेल्स देणे म्हत्वाचे आहे.
गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी (१ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर) या कालावधीत प्रवेशिका स्वीकारल्या जातिल.
संयोजक वॉमा कसा टाकावा
संयोजक
वॉमा कसा टाकावा फोटोंवर ते सांगा प्लीज.
स्पर्धा क्र. १ व ३ मधे मी
स्पर्धा क्र. १ व ३ मधे मी सहभाग नोन्दविला आहे.
इमेल पाठविल्यात, धन्यवाद
)|
[बाकि त्या जादु तेरि नजर मधे कसा काय सहभागी होणार? हो ना, आधीच चष्मा लागलाय... कस्ली जादू नजर अन कस्ल काय
"आता प्रवेशिका स्विकारणे बंद
"आता प्रवेशिका स्विकारणे बंद झाले आहे. यापुढे पाठवलेल्या प्रवेशिका ग्राह्य धरल्या जाणार नाहीत."
Pages