कलाकुसर स्पर्धा (नियम) : "कायापालट" - मायबोली गणेशोत्सव २०११

Submitted by संयोजक on 15 August, 2011 - 06:17

Kayapalat_0.jpg

**********************************************************

makeoverposter.jpg

**********************************************************


"कायापालट" स्पर्धेचे नियम:

१. ही स्पर्धा फक्त मायबोलीच्या सभासदांसाठी आहे.
२. या स्पर्धेसाठी तयार केलेल्या वस्तू स्वतः तयार केलेल्या असाव्यात.
३. कलाकृतीसाठी वस्तू निवडून त्याचा कायापालट करायचा आहे.
४. या स्पर्धेला वस्तू किंवा माध्यमाचे बंधन नाही. वेताची टोपली वापरून केलेली लँपशेड असो नाहीतर काचेच्या प्लेटचे केलेले घड्याळ असो. यासाठी मूळ वस्तूत थोडेफार बदल करता येतील, परंतु मूळ वस्तूची तोड/फोड/मोड करायची नाही तर मूळ वस्तूला नवे स्वरूप द्यायचे आहे. मूळ वस्तूचेच स्वरूप पूर्ण बदलायचे आहे किंवा त्यात असा बदल करायचा आहे की त्या वस्तूचा मूळ वापर न होता नवा वापर केला जाईल.
५.जोडण्यासाठी सामान, सजावटीसाठी सामान इत्यादी वापरू शकतो.
६. तयार झालेली कलाकृती ही कलात्मक व उपयुक्त असावी. घरात/ ऑफिसमधे/ बागेत/ गाडीत वगैरे वापरली जाईल, सजावटीसाठी उपयुक्त असेल किंवा कोणाला भेट देता येईल अशी असावी.
७. स्पर्धकाने मूळ वस्तू आणि त्याचा कायापालट कसा केला हे थोडक्यात लिहिणे आवश्यक आहे.
८. मूळ वस्तू आणि तयार झालेल्या नव्या कलाकृतीचा फोटो येथे देणे बंधनकारक आहे.
९. शक्य असेल तर टप्प्या-टप्प्याने वस्तू कशी तयार केली (फोटो दिलेत तर उत्तम), हे लिहिले तर ज्यांना तुमची कलाकृती तयार करावी असे वाटेल त्यांना समजण्यासाठी सोपे पडेल.
१०. प्रवेशिकेमध्ये ४ पेक्षा जास्त प्रकाशचित्रे नसावीत. प्रत्येक पायरीचे प्रकाशचित्र अपेक्षित नाही. महत्त्वाच्या व आवश्यक अशाच पायरीचे छायाचित्र जोडावे.
११. एक आयडी जास्तीत जास्त ३ प्रवेशिका पाठवू शकतो.
१२. या स्पर्धेचा निकाल परीक्षकांमार्फत दिला जाईल आणि तो स्विकारणे सर्व स्पर्धकांना बंधनकारक असेल.

टीप: ही टाकाऊतून टिकाऊ स्पर्धा नाही. यात मूळ वस्तूचे केलेले रुपांतर अपेक्षित आहे.

**********************************************************

प्रवेशिका कशा पाठवाल?

प्रवेशिका पाठवण्याची पद्धत सोपी करण्याच्या उद्देशाने, प्रवेशिका पाठवण्याबद्दलचे नियम बदलण्यात आले आहेत याची कृपया नोंद घ्यावी.

प्रवेशिका पाठण्याकरता 'मायबोली गणेशोत्सव २०११' या गृपचे सदस्य असणे आवश्यक आहे. हा गृप सदस्य-नोंदणीकरता १ सप्टेंबरला खुला करण्यात येईल.

१. 'मायबोली गणेशोत्सव २०११' ह्या ग्रूपचे सदस्यत्व घ्या. त्याकरता या पानाच्या उजवीकडे दिसणार्‍या 'मायबोली गणेशोत्सव २०११' या निळ्या शब्दांवर टिचकी मारा. नंतर "सामील व्हा" या शब्दांवर टिचकी मारा. आता आपण 'मायबोली गणेशोत्सव २०११' या गृपचे सभासद झाला आहात.

२. याच गृपमध्ये उजवीकडे "नवीन लेखनाचा धागा" या शब्दांवर टिचकी मारा. (मायबोलीवरील नवीन लेखन करा, गणेशोत्सव २०११ ग्रूप मधले गप्पांचे पान, नवीन कार्यक्रम हे पर्याय वापरायचे नाहीत)

३. नवीन लेखनाचा धागा उघडला जाईल. त्यात शिर्षक या बॉक्समध्ये खालीलप्रमाणे विषय लिहावा :
कलाकुसर स्पर्धा - "कायापालट" - स्वतःचा मायबोली आयडी

४. विषय या बॉक्समध्ये ड्रॉपडाऊन मेन्युमधून 'मायबोली - उपक्रम' हा पर्याय निवडा.

५. शब्दखुणा या बॉक्समध्ये "कायापालट, कलाकुसर स्पर्धा, मायबोली गणेशोत्सव २०११" हे शब्द लिहा.

६. मजकूरात आपली प्रवेशिका लिहावी / कॉपी-पेस्ट करावी.

७. मजकूरात प्रचि टाकायचे असल्यास मजकूराच्या बॉक्सखाली 'मजकूरात image किंवा link द्या.' यातील image शब्दावर टिचकी मारा. एक नविन विंडो उघडेल. त्यात वरती दिलेल्या ऑप्शन्सपैकी upload हा ऑप्शन निवडा. मग 'browse' हा पर्याय क्लिक करून तुमच्या कॉप्युटरवरून योग्य ती फाईल 'upload' करा. फाईल अपलोड झाली की खालच्या करड्या बॉक्स मध्ये तसा मेसेज दिसेल. मग ही फाईल सर्वात वरती दिलेल्या ऑप्शन्सपैकी 'Send to textarea' हा ऑप्शन वापरून तुमच्या मजकूरात समाविष्ट करा.
प्रचि टाकण्याबद्दल अधिक माहितीसाठी येथे टिचकी मारा.

८. नविन लेखनाच्या धाग्यावर सर्वांत खाली 'Save' या बटणाच्या वर गृप असा शब्द दिसेल, त्यावर टिचकी मारा. सार्वजनिक या शब्दाच्या आधी असलेला बॉक्स क्लीक करा. म्हणजे तुमची प्रवेशिका सर्वांना दिसू शकेल.

९. Save चे बटण दाबा. कधी कधी सेव्ह व्हायला वेळ लागतो, त्यामुळे थांबा. तुमची प्रवेशिका प्रकाशित होऊन सगळ्यांना दिसू लागेल.

१०. जर काही मजकूर लिहायचा राहिला असेल / बदलायचा असेल तर सर्वांत वर दिसणारा 'संपादन' हा ऑप्शन वापरून प्रवेशिकेत बदल करू शकता.


प्रवेशिका गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत (१ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर २०११) स्वीकारण्यात येतील.

शुभेच्छा!

**********************************************************
'कोलाजमधिल सर्व प्रकाशचित्रे आंतरजालावरुन साभार'

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नमस्कार मंडळी,
स्पर्धांबद्दल काही शंका, प्रश्न असल्यास संयोजकांना या पानावर विचारा. आपल्या प्रश्नांचे शक्य तितक्या लवकर उत्तर द्यायचा संयोजक प्रयत्न करतील.

आईशप्पथ, कसली खन्ग्राट स्पर्धा आहे! भन्नाटच.............. मज्जा येणारे
इकडे बरेच हरहुन्नरी कलावन्त आहेत त्यामुळे जणुकाही मेजवानीच मिळेल असे दिस्तय
[मला जमल्यास, लहानपणचे क्राफ्ट आठवुन कैतरी(च) करीन अन भाग घेईन, विश मि ब्येश्ट्लक]

आता बहूदा घरातल्या प्रत्येक वस्तूकडे हिचं कायबरं करता येईल असा विचार करत बघितलं जाणार. भाग घ्यायचा प्रयत्न करेन.

अरे व्वा काय मज्जा येईल! कधी एकदा ही स्पर्धा सुरु होतेय आणि छान छान वस्तू, कलाकृती पहायला मिळतायत असे झाले आहे.