तुमच्या प्रवासातल्या सुरस आणि चमत्कारिक, धाडसी आणि रोमांचक अशा घटना आम्हालाही कळवा की! प्रवासाचं सुरवातीचं आणि शेवटचं स्टेशन दिलं आहे. तुम्ही फक्त मधला प्रवास खुसखुशीत शब्दांत लिहायचा आहे. प्रवासवर्णनांबरोबर अपरिहार्य असणारी प्रचि असतील तर उत्तमच! तर निघू द्या गाडी स्टेशनातून........
प्रवासवर्णनांचे विषय (लेखन याच विषयांवर असावे) :
(१) घर ते कोपर्यावरचा भाजीवाला
(२) ऑफीसमधला आपला डेस्क ते पँट्री
(३) लग्नाच्या दिवशी : खोलीपासून बोहल्यापर्यंत
(४) बेडरूम ते फ्रीज : गुलाबजामांकरता मध्यरात्रीचा प्रवास
(५) ट्रेनमधल्या डब्यात : एका टोकापासून दुसर्या टोकापर्यंत
नियम :
१. ह्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०११' ह्या ग्रूपचे सदस्यत्व घ्यावे लागेल.
२. एका आयडीतर्फे एका विषयासाठी एकच प्रवेशिका स्विकारली जाईल.
३. शब्दमर्यादा जास्तीत जास्त २००० शब्द.
४. प्रवेशिकेत जास्तीत जास्त पाच प्रकाशचित्रे टाकू शकता.
५. स्पर्धेचा अंतिम निकाल मतदान पध्दतीने ठरवण्यात येईल. तो स्विकारणे सर्व स्पर्धकांवर बंधनकारक राहील.
प्रवेशिका कशा पाठवाल?
प्रवेशिका पाठवण्याची पद्धत सोपी करण्याच्या उद्देशाने, प्रवेशिका पाठवण्याबद्दलचे नियम बदलण्यात आले आहेत याची कृपया नोंद घ्यावी.
प्रवेशिका गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत (१ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर २०११) स्विकारण्यात येतील. प्रवेशिका पाठण्याकरता 'मायबोली गणेशोत्सव २०११' या गृपचे सदस्य असणे आवश्यक आहे. हा गृप सदस्य-नोंदणीकरता १ सप्टेंबरला खुला करण्यात येईल.
१. 'मायबोली गणेशोत्सव २०११' ह्या ग्रूपचे सदस्यत्व घ्या. त्याकरता या पानाच्या उजवीकडे दिसणार्या 'मायबोली गणेशोत्सव २०११' या निळ्या शब्दांवर टिचकी मारा. नंतर "सामील व्हा" या शब्दांवर टिचकी मारा. आता आपण 'मायबोली गणेशोत्सव २०११' या गृपचे सभासद झाला आहात.
२. याच गृपमध्ये उजवीकडे "नवीन लेखनाचा धागा" या शब्दांवर टिचकी मारा. (मायबोलीवरील नवीन लेखन करा, गणेशोत्सव २०११ ग्रूप मधले गप्पांचे पान, नवीन कार्यक्रम हे पर्याय वापरायचे नाहीत)
३. नवीन लेखनाचा धागा उघडला जाईल. त्यात शिर्षक या बॉक्समध्ये खालीलप्रमाणे विषय लिहावा :
प्रवासवर्णन स्पर्धा - "सारे प्रवासी घडीचे" - स्वतःचा मायबोली आयडी
४. विषय या बॉक्समध्ये ड्रॉपडाऊन मेन्युमधून 'मायबोली - उपक्रम' हा पर्याय निवडा.
५. शब्दखुणा या बॉक्समध्ये "सारे प्रवासी घडीचे, प्रवासवर्णन स्पर्धा, मायबोली गणेशोत्सव २०११" हे शब्द लिहा.
६. मजकूरात आपली प्रवेशिका लिहावी / कॉपी-पेस्ट करावी.
७. मजकूरात प्रचि टाकायचे असल्यास मजकूराच्या बॉक्सखाली 'मजकूरात image किंवा link द्या.' यातील image शब्दावर टिचकी मारा. एक नविन विंडो उघडेल. त्यात वरती दिलेल्या ऑप्शन्सपैकी upload हा ऑप्शन निवडा. मग 'browse' हा पर्याय क्लिक करून तुमच्या कॉप्युटरवरून योग्य ती फाईल 'upload' करा. फाईल अपलोड झाली की कालच्या करड्या बॉक्स मध्ये तसा मेसेज दिसेल. मग ही फाईल सर्वात वरती दिलेल्या ऑप्शन्सपैकी 'Send to textarea' हा ऑप्शन वापरून तुमच्या मजकूरात समाविष्ट करा.
प्रचि टाकण्याबद्दल अधिक माहितीसाठी येथे टिचकी मारा.
८. नविन लेखनाच्या धाग्यावर सर्वांत खाली 'Save' या बटणाच्या वर गृप असा शब्द दिसेल, त्यावर टिचकी मारा. सार्वजनिक या शब्दाच्या आधी असलेला बॉक्स क्लीक करा. म्हणजे तुमची प्रवेशिका सर्वांना दिसू शकेल.
९. Save चे बटण दाबा. कधी कधी सेव्ह व्हायला वेळ लागतो, त्यामुळे थांबा. तुमची प्रवेशिका प्रकाशित होऊन सगळ्यांना दिसू लागेल.
१०. जर काही मजकूर लिहायचा राहिला असेल / बदलायचा असेल तर सर्वांत वर दिसणारा 'संपादन' हा ऑप्शन वापरून प्रवेशिकेत बदल करू शकता.
शुभेच्छा!
भन्नाट विषय. मजा येणार या
भन्नाट विषय. मजा येणार या स्पर्धेत.
मस्त विषय आहेत धम्मालीला
मस्त विषय आहेत
धम्मालीला सुरूवात झालेली आहेच... मज्जा येणार गणपतीत.
छान कल्पना ! आम्ही वाचकांमधे
छान कल्पना ! आम्ही वाचकांमधे नेहमीप्रमाणे !
मला वाटले ओरेगामी स्पर्धा आहे
मला वाटले ओरेगामी स्पर्धा आहे की काय.>>>> नंद्या..और ये लगा सिक्सर
मस्त कल्पना
नंद्या संयोजकांनी सुद्धा
नंद्या
संयोजकांनी सुद्धा "घडी" वर एवढा विचार केला नसेल.
खुप च सुंदर कल्पना
खुप च सुंदर कल्पना
मस्त उपक्रम नंद्या
मस्त उपक्रम
नंद्या
नंद्या
नंद्या
मज्जा येणार! सगळे प्रवास
मज्जा येणार! सगळे प्रवास वाचायला
>>बेडरूम ते फ्रीज :
>>बेडरूम ते फ्रीज : गुलाबजामांकरता मध्यरात्रीचा प्रवास<<
हा प्रवास आहे?
नाही म्हणजे स्वतःच्या घरातील बेडरुम ते फ्रीज पर्यंत, का स्वतःच्या घरातील बेडरुम ते दुसर्याच्या घरातील फ्रीज पर्यंत..:स्मित:
जॉनी तुम्हाला जसा हवाय तसा
जॉनी तुम्हाला जसा हवाय तसा प्रवास करा, हा का ना का. प्रवासवर्णन मात्र नक्की लिहा.
लय मज्जा येणार ह्या स्पर्धेत.
लय मज्जा येणार ह्या स्पर्धेत. ज्यांना खुमखुमी आली आहे त्यांनी ती तशीच न जिरवता खुमखुमत ठेवावी व लवकर आपले लिखाण संयोजकांना पाठवावे ही विनंती.
या स्पर्धेकरता शब्दमर्यादा
या स्पर्धेकरता शब्दमर्यादा कमाल शब्दांची आहे. तुम्ही त्यापेक्षा कमी शब्दांत लेख लिहू शकता.
कुठे आहेत मायबोलीवरील लेखक? उचला आपली लेखणी आणि येऊ द्या एकसे एक प्रवासवर्णनं.......
सही !!!!!!!!!
सही !!!!!!!!!
आज, किती वाजेपर्यंत प्रवेशिका
आज, किती वाजेपर्यंत प्रवेशिका स्विकारल्या जातील?
आज भारतीय वेळेनुसार रात्री
आज भारतीय वेळेनुसार रात्री बारा वाजेपर्यंत प्रवेशिका स्वीकारल्या जातील.
किती प्रॉम्ट उत्तर!! आभार
किती प्रॉम्ट उत्तर!!
आभार संयोजकजी
नमस्कार... माझा सहभाग:
नमस्कार...
माझा सहभाग: 'खोलीपासून बोहल्यापर्यंत' विषयावर
http://www.maayboli.com/node/28969
"आता प्रवेशिका स्विकारणे बंद
"आता प्रवेशिका स्विकारणे बंद झाले आहे. यापुढे पाठवलेल्या प्रवेशिका ग्राह्य धरल्या जाणार नाहीत."
Pages