तळतेस भजी तू जेव्हां -

Submitted by विदेश on 11 August, 2011 - 09:03

(चाल: नसतेस घरी तू जेव्हां -)

तळतेस भजी तू जेव्हां -
जीव 'सुटका सुटका' म्हणतो..
मिरच्यांचे वरती तुकडे
तोंडात घास का फिरतो ?

बघ फेटून पीठ- कसाही
का गोळा कच्चा जळतो !
ही जिव्हा रुचीहीन होते -
अन् तोंड पोळता कण्हतो !

येताच कुणी दाराशी..
क्षणभरात सरती मागे
खिडकीशी धुरकट वारा-
तो वांधा करून जातो !

तव तेलीं विरघळणाऱ्या
मज दिसती कायम गुठळ्या -
त्रासाधिन खारट गोळे
मी तसाच गुपचचुप खातो !

तू लांब सखे मज धाड
नच सांगू ही भजी खाण्या -
कढईचा जीव उगाच..
माझ्यासह कुरकुर करतो !

का अजून गॅसही मोठा !
ना तंत्रच जमले अजुनी ?
भजी का तू तळतच पिडते -
भजी खाऊन जीवच रडतो !!

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

Biggrin

येताच कुणी दाराशी..
क्षणभरात सरती मागे
खिडकीशी धुरकट वारा-
तो वांधा करून जातो !

तव तेलीं विरघळणाऱ्या
मज दिसती कायम गुठळ्या -
त्रासाधिन खारट गोळे
मी तसाच गुपचचुप खातो !

ही दोन कडवी खास. Happy

विदेश बिनधास्त भजी खा!पोट बिघडलं तर डॉ.साहेब आहेत औषध द्यायला........खुसखुशीत कविता.
मजेशीर कविता..म्हणुन मजेशीर प्रतिक्रिया.विपर्यास नसावा.

मस्त Lol

वहिनींनी वाचलं तर भर श्रावणात तुझा खिमा करेल Proud
पण मस्त जमलेय

का अजून गॅसही मोठा !
ना तंत्रच जमले अजुनी ?
भजी का तू तळतच पिडते -
भजी खाऊन जीवच रडतो !!>>>>>>>>>>> हे कडवं मिटर मध्ये नाही बसलंय

मस्तच.:खोखो:

<<तव तेलीं विरघळणाऱ्या
मज दिसती कायम गुठळ्या -
त्रासाधिन खारट गोळे
मी तसाच गुपचचुप खातो !<<<

अयाईग!!! Rofl Rofl