बटाटा, साबुदाणा पापड

Submitted by मिनी on 10 August, 2011 - 16:40
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

बटाटे - १ किलो.
साबुदाणा - १/२ किलो.
लाल तिखट/ किंवा हिरव्या मिरच्या.
जीरं
मीठ
तेल/ तुप

क्रमवार पाककृती: 

१. साबुदाणा मंद आचेवर थोडासा भाजुन घ्यावा.
२. गार झाल्यावर मिक्सरवर पीठ करुन घ्यावं. (हा कुटाणा वाचवायचा असेल तर सरळ साबुदाणा पीठ विकत आणावं.)
३. बटाटे उकडुन, सोलुन घ्यावे.
४. उकडलेले बटाटे किसणीने किसुन घ्यावे.
५. त्यात साबुदाणा पीठ, लाल तिखट, भरड वाटलेलं जीरं आणि चवीप्रमाणे मीठ घालुन व्यवस्थित मळुन घ्यावं.
६. झीपलॉकची पिशवी तीन बाजुंनी कापुन त्यात एक एक लाटी घेवुन पापड लाटुन घ्यावे. गरज वाटल्यास पिशवीला/ लाटीला तेलाचा/ तुपाचा हात लावावा.
७. कडकडीत उन्हात २ दिवस पापड वाळवावेत.
७. तेलात/ तुपात तळुन गट्टंम करावे.

हा फोटो,

वाढणी/प्रमाण: 
साठवणीचा पदार्थ आहे.
अधिक टिपा: 

१. लाल तिखट नको असेल तर हिरवी मिरचीचं वाटणं करुन ते घालता येतं.
२. बटाटा साबुदाण्याचं प्रमाण अंदाजेच दिलं आहे. किसलेल्या बटाट्यात मावेल इतकं साबुदाणा पीठ घालावं.
३. मी मीठ आणि तिखट थोडं जास्त घालते.
४. खरं तर ही खुप साधी- सोपी आणि जनरलाईज रेसिपी आहे. त्यामुळे अंतरजालावर/ पाककृती पुस्तकांमध्ये आणि जुन्या मायबोलीवर पण सापडण्याची शक्यता आहे. आता इथे प्रचंड उन पडलं आहे, सो ह्या वर्षी केलेत हे पापड. नविन मायबोलीवर ही कृती दिसली/ सापडली नाही म्हणुन इथे डकवण्याचा खटाटोप.

माहितीचा स्रोत: 
आई, आज्जी
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या प्रचंड आवड्ते! याच्या लाट्या मटकावायला मजा येते!(तश्याही कुठल्याही पापडाच्या लाट्या पापडापेक्षा भारिच लागतात)

वाळवणाच्या पदार्थांना मीठ कणभर कमीच घालतात ना ? नाही तर वाळल्यावर खारट होतात.

लाट्यांसाठी तरी करावेच एकदा Happy

मी हे पापड लाटायला रोटी मेकर वापरते.. २ प्लास्टिक पेपर मध्ये लाटी ठेवायची आणि वरुन रोटी मेकर प्रेस करायचा..फटाफट आणि मस्त गोल होतात..माझा नवरा एकदम उत्साहाने मदत करतो कारण बिघडण्याची काहि भानगड नाही.. आणि परत तेवढाच उपयोग.. रोटीमेकरचा.. Wink

उकुख

Has any one used Rotti maker for making Rotti? I saw the demo on net and bought one. I tried every thing, but ...........? Please help

>>माझा नवरा एकदम उत्साहाने मदत करतो कारण बिघडण्याची काहि भानगड नाही.. आणि परत तेवढाच उपयोग..रोटीमेकरचा..

ए मी चक्क "रीकामटेकडा" वाचलं :ड