मेथीचे पिठ १ वाटी (१०० ग्रॅम)
५ वाट्या गव्हाचे पिठ
२ वाट्या रवा
१०० ग्रॅम डिंक
५० ग्रॅम हालिम (अळीव)
२ वाट्या सुके खोबरे
५ १/२ वाट्या गुळ
१ चमचा सुंठपावडर
अडीच ते ३ वाट्या साजुक तुप
खारीक बदामचे बारीक तुकडे
मेथिचे पिठ आदल्या दिवशी तुपात भिजवत ठेवा. त्यामुळे कडूपणा कमी होतो.
सुके खोबरे किसुन मंद आचेवर खरपुस भाजुन घ्या.
खारीक व बदाम बारीक करुन घ्या.
तुपात थोडा थोडा डिंक घालुन तळा व थंड झाल्यावर तो कुस्करुन बारीक करा.
चमचाभर तुपात हालिम (अळीव) तळून घ्या.
भांड्यात दिड वाटी तुप घालुन रवा व गव्हाचे पिठ मंद गॅसवर खरपुस भाजुन घ्या व भाजल्यावर एका परातीत काढा.
त्या पिठात भिजत घातलेले तुप भाजलेल्या पिठा घाला व हाताने चांगले फेसुन मेथिच्या पिठाच्या गुठळ्या मोडा.
आता त्यात भाजलेले खोबरे जरा कुस्करुन घाला. बारीक केलेले बदाम व खारीक घाला. सुंठपावडर व डिंक घाला व चांगले मिसळा.
आता एका मोठ्या भांड्यात १ चमचा तुप टाकुन गुळ चिरुन टाका. आता गॅस एकदम मंद ठेवा व गुळ विरघळेपर्यंत ढवळा. गुळ विरघळला की लगेच गॅस बंद करा.
From Methi ladu
भांडे गॅसवरुन काढून त्यात लगेच पिठाचे मिश्रण घाला व चांगले ढवळा.
आता पटापट लाडू वळून घ्या.
हे लाडू पौष्टीक असतात.
हे लाडू थंडीत खातात.
बाळंतीणीसाठी हे लाडू खुपच उपयुक्त ठरतात.
पाक करताना गॅस मोठा मुळीच ठेउ नका. एकदम मंद ठेवा नाहीतर पाक पक्का तयार होइल इ लाडू कडक होतील.
लाडू वळताना मिश्रण थंड झाले आणि भांड्याला चिकटले किंवा लाडू वळता येत नसतील तर पुन्हा मंद गॅसवर २-३ मिनिटे ठेवावेत म्हणजे मिश्रण ओले होउन लाडू वळता येतील.
जागू बाई जागू तुझ्या पाय लागू
जागू बाई जागू
तुझ्या पाय लागू
काय काय करतेस ग? उरक दांडगा आहे बाई तुझा.
जागु, एक मोठा डबा तुझ्या घरी
जागु, एक मोठा डबा तुझ्या घरी पाठवायच्या विचारात आहे.
लले एसी लाव आणि लाडू खा
लले एसी लाव आणि लाडू खा
प्राची व्यसन लागलय ग माबोच आणि रेसिपीच
आशुतोष डब्यात तुमच्याकडचा खाउ भरुन पाठवा मग मी तुम्हाला लाडू पाठवेन.
नणंद बाळंत झाली म्हणजे आपण
नणंद बाळंत झाली म्हणजे आपण मामी झालात नाही का जागूतै?
पुन्हा एकदा, लाडू ए-वन!!
जागु,(डबाभर) लाडु के लिये कुछ
जागु,(डबाभर) लाडु के लिये कुछ भी करेगा
मृण्मे अग मी सन २०११ ला
मृण्मे अग मी सन २०११ ला नुकत्याच जन्म जालेल्या बाळाची मामी झालेय. तुझे जन्मसाल किती ?
आशुतोष टिफिनचाच डबा घेउन या.
मृण्मयी मी सगळी मस्ती करतेय.
मृण्मयी मी सगळी मस्ती करतेय. प्लिज लाईटली घे. अग मला आजी म्हणालीस तरी मला काही फरक नाही पडणार. शेवटी कुठलही नात असल तरी त्यात प्रेम हे असतच.
खतरा. जागू तू माझ्या शेजारी
खतरा. जागू तू माझ्या शेजारी रहायला येच गडे. केवढा तो उरक. तू खर तर एक गृहोद्योग सुरू करायला हवा. माबोच्या सगळ्या गटगला तुझ्याकडून सप्लाय होईल या सगळ्यांचा.
रूनी, घरी तरी बोलाव. शेजारी
रूनी, घरी तरी बोलाव. शेजारी ये काय!
अगदी बरोबर स्वातीताई. आता
अगदी बरोबर स्वातीताई. आता तुझ्या शेजारी येउन मी तुझ्या घरातल कस आवरु ?
धन्स रुनी.
जागूतै.. मस्तच आहेत हो लाडू
जागूतै.. मस्तच आहेत हो लाडू ..आत्ताच खावेसे वाटतील
माझी आई आता माझ्या बाळंतपणाला आली इकडे की तिला सांगेन करायला लाडू तुमच्या रेसिपी नुसार
जागुले, लै भारी गं बयो.
जागुले, लै भारी गं बयो.
जागु, ही रेसिपी पणशीकरांकडे पाठव ना, म्हणजे मलाही या पद्धतीचे लाडू खायला मिळतील.
रुतू नक्की सांग ग अजुन
रुतू नक्की सांग ग अजुन रेसिपीज हव्या असतील तर मला विपुत विचार. देईन मी तुझ्यासाठी.
मामी धन्स ग. तु परत ये माझ्याकदे पणशिकरांकडे जाण्यापेक्षा.
जागु ताई तुमचे कित्ती आभार
जागु ताई तुमचे कित्ती आभार मानु असे झाले आहे
मी आजच केले असे लाडु स्वतसाठीच (बाळतीन आहे न मी म्हणून ) खुप खुप छान झालेत
फक्त गुळ थोडा कमी होता म्हणून सगळे पीठ मिक्स केले नाही किमान १० लाडु होतील इतके कोरडे पीठ(यात गुळ सोडून सगळे टाकले आहे) बाक़ी आहे.ते फ्रिज मधे ठेउ की बाहेर?
नाही ठेवले फ्रीज ला.केलेले
नाही ठेवले फ्रीज ला.केलेले लाडुच इतके अप्रतिम झाले होते की माझा खाण्याचा स्पीड खुपच वाढला म्हणून आज लगेच गुळ आणून करुन टाकले
इतक्या अप्रतिम चवीच्या लाडू रेसिपीसाठी पुन्हा धन्यवाद
आदू छान वाटल वाचून. अभिनंदन
आदू छान वाटल वाचून. अभिनंदन आईपणासाठी
फ्रिज मध्ये नाही ठेवावे लागत. चांगले राहतात बाहेर.
जागू,
जागू,
गूळ गरम असताना लाडू वळताना हाताला चटके बसत नाहीत का? एकदा मी ट्राय केला होता,पण चटके बसले म्हणून सोडून दिले.तर गुळाचे छोटे छोटे खडे झाले होते.हे लाडू अतिशय आवडीचे आहेत.
जसे तिळाचे करताना बसतात तसे
जसे तिळाचे करताना बसतात तसे थोडे बसतात. पण बिन पाकाचेही करता येतात. त्याची चव मला जास्त आवडते. माझी आई तसे करते. गुळ फक्त चुरुन घ्यायचा आणि एकत्र करुन वळायचे. पण ते वळायला जरा कठीण जातात.
मस्त पाककृती
मस्त पाककृती
Pages