हाण त्याच्या टाळक्यात : नागपुरी तडका
ऊठ मर्दा ऊठ
आवळून घे मूठ
हाण त्याच्या टाळक्यात
पायामधला बूट
सत्तेपुढे शहाणपण
जेव्हा व्यर्थ जाते
माणुसकीचे लचके तोडून
लाचखोर खाते
पौरुषाच्या नशेचे, तेव्हा लाव दोन घूट
अन्
हाण त्याच्या टाळक्यात, पायामधला बूट
अन्यायाची सीमा जेव्हा
मर्यादेला लांघते
तुझे हक्क तुडवून
तिरडीवर बांधते
शेपटी तेव्हा खाली नको, वाघासारखा ऊठ
अन्
हाण त्याच्या टाळक्यात, पायामधला बूट
पोशिंद्याच्या छाताडावर
हरामींच्या मौजा
तेव्हा राज्य करतात
लुटारूंच्या फौजा
सत्ता आणि दलालांची, कर ताटातूट
अन्
हाण त्याच्या टाळक्यात, पायामधला बूट
माय तुझी बैलावाणी
राबराबून मेली
गल्लीमध्ये मुळं अन्
दिल्लीमध्ये वेली
अभयाने शोध घे, कोणी केली लूट
अन्
हाण त्याच्या टाळक्यात, पायामधला बूट
गंगाधर मुटे
-------------------------------------------------
खणखणीत !!!
खणखणीत !!!
हाण तिच्या मारी..!! जबराट
हाण तिच्या मारी..!! जबराट मुटेस्टाईल तडका..!
झणझणीत, हातोडा, चाबूक, तोडफोड
झणझणीत, हातोडा, चाबूक, तोडफोड
मस्तच
सिंघम कविता !
सिंघम कविता !
मस्त !!
मस्त !!
जबरदस्त.
जबरदस्त.
भारी... !
भारी... !
प्रतिसादाबद्दल सर्वांचा आभारी
प्रतिसादाबद्दल सर्वांचा आभारी आहे.
कविता अप्रतिम्,पण खरोखरच बुट
कविता अप्रतिम्,पण खरोखरच बुट हानायची पाळी येते (निवड्णू़क) तेव्हा आम्ही सुट्टी उपभोगत घूट घेत बसलेलो असतो.
मुटेजी, लई भारी..तुफानी,
मुटेजी,

लई भारी..तुफानी, मर्मावर घाव घालणारी कविता !
या ओळीं वाचुन या पोशींद्याची लेकरं आता नक्कीच आणखीन पेटुन उठतील यात शंका नाही
हाण तिच्या मारी द-ण-द-णी-त
हाण तिच्या मारी
द-ण-द-णी-त हाणलंय मुटेजी
मुटेसाहेब,एकदम दणदणीत हाणलंय
मुटेसाहेब,एकदम दणदणीत हाणलंय की.
आमचा एक केविलवाणा प्रयत्न ऐका.
प्रतिसादाबद्दल सर्वांचा आभारी
प्रतिसादाबद्दल सर्वांचा आभारी आहे.
देवसाहेब, मस्त जमलीय चाल. धन्यवाद.
सणसणीत आणि तितकीच एक
सणसणीत आणि तितकीच एक अॅक्शनपॅक्ड कविता ... वा !! मुटेसाहेब ...
धन्यवाद मुटेसाहेब.
धन्यवाद मुटेसाहेब.
नेहमीसारखाच सणसणीत तडका
नेहमीसारखाच सणसणीत तडका
हाण हाण तिच्यामायला
हाण हाण तिच्यामायला
धन्यवाद मित्रांनो.
धन्यवाद मित्रांनो.
मुटेसाहेब खूप दिवसानन्तर एक
मुटेसाहेब खूप दिवसानन्तर एक तडाखेबाज गीत वाचायला अन ऐकायला मिळाले.
प्रमोद देवची चाल छान.
नादखुळा, टांगा पलटी घोडे
नादखुळा, टांगा पलटी घोडे फरार....
मुटेजी , तुमचा तडका नेहमीच लाजवाब असतो... त्यात कवितेला काकांनी दिलेली चाल, व्वा!!!
सुरेखाजी, धनेषजी धन्यवाद.
सुरेखाजी, धनेषजी धन्यवाद.
सुंदर्,अप्रतिम. पायामधला बूट
सुंदर्,अप्रतिम.
पायामधला बूट मतदानाच्यावेळी हाणुया का आपण?