Submitted by छाया देसाई on 3 August, 2011 - 04:29
दग्ध बी रुजवीत नाही
ही जगाची रीत नाही
शोधसी जेथे प्रकाशा
स्नेह त्या समईत नाही
कोरड्या वातीस ज्योती
मंदशी जळवीत नाही
वाळल्या पुष्पास भ्रमरा
प्रीत खिजगणतीत नाही
राग नाही सूर नाही
हे तुझे संगीत नाही
मोहवी जो तनमनाला
गंध तो मातीत नाही
सूर्यही झेलून छाया
रात्रिला उजळीत नाही
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
छान आहे.
छान आहे.:)
वाहवा, छान रचना
वाहवा, छान रचना![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
राग नाही सूर नाही हे तुझे
राग नाही सूर नाही
हे तुझे संगीत नाही
सुंदर !!
मस्तचं.....
मस्तचं.....
छायाजी, मस्त ग़ज़ल. प्रत्येक
छायाजी,
मस्त ग़ज़ल. प्रत्येक शेर सशक्त. ही दुसरी वेळ जेंव्हा पहिली तरही ग़ज़ल आपणाकडून आली आहे. शुभेच्छा.
शोधसी जेथे प्रकाशा स्नेह त्या
शोधसी जेथे प्रकाशा
खूप आवडला हा शेर!
स्नेह त्या समईत नाही>> सुंदर शेर!
संगीत नाही..... सुंदर
संगीत नाही..... सुंदर व्दिपदी.
आवडली.
समईचा शेर आवडला
समईचा शेर आवडला
सुरेख..!
सुरेख..!
मस्त.मतला आणि समईची द्विपदी
मस्त.मतला आणि समईची द्विपदी आवडली.
शोधसी जेथे प्रकाशा स्नेह त्या
शोधसी जेथे प्रकाशा
स्नेह त्या समईत नाही...
---छान
---छान गझल
---छान गझल