कान्हा माझ्या भुकेची वेळ आता झाली

Submitted by पाषाणभेद on 31 July, 2011 - 02:16

कान्हा माझ्या भुकेची वेळ आता झाली

अरे कान्हा माझ्या भुकेची वेळ आता झाली
निट जपून वाढ माझी फाटकी रे झोळी ||धृ||

सकाळीच उठले मी अजाणतेपणी
काय घडेल दिसभर नव्हते ध्यानी
पोट नाही भरले जरी न्याहरी केली
कान्हा माझ्या भुकेची वेळ आता झाली ||१||

पंचपक्वांन्न आहे सोबतीला शिरापुरी
भरलेलं ताट आले समोर दुपारी
किती खावे किती नको झाले त्यावेळी
कान्हा माझ्या भुकेची वेळ आता झाली ||२||

कधीतरी आराम मिळो ह्या पोटाला
संध्यासमय जवळ हा आला
पाषाणगवळण तुझ्या चरणी लीन झाली
कान्हा माझ्या भुकेची वेळ आता झाली ||३||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
३०/०७/२०११

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

छाया ला मोदक!! मलाही तोच अर्थ पोहोचत आहे...

सकाळीच उठले मी अजाणतेपणी
काय घडेल दिसभर नव्हते ध्यानी
पोट नाही भरले जरी न्याहरी केली

कधीतरी आराम मिळो ह्या पोटाला
संध्यासमय जवळ हा आला

>>>>>>
आयुष्याच्या संध्यासमयी झालेली देवाची आठवण...

सजन रे झुठ मत बोलो या गाण्यात एक कडवं आहे...
लडकपन खेल में खोया
जवानी निंद भर सोया
बुढापा देखकर रोया
तसं काहीसं...

पाषाणभेद आता रहस्यभेद करा Happy

कळ्ळ्ळं... सकाळ-दुपार-संध्याकाळ