आयुष्य कडेवर घेतो

Submitted by अभय आर्वीकर on 29 July, 2011 - 12:17

आयुष्य कडेवर घेतो

झुंजूमुंजू पहाटेला, आभा चढे आभाळाला
काळोखाच्या भेगातुनी, सूर्य डोकावतो
गारठल्या पंखामधी, आशा जागवतो

सुन्यासुन्या शिवाराला, निजलेल्या आवाजाला
चेव येण्याला कोंबडा, दारी बांग देतो
सुस्तावल्या आळसाला दूर पांगवतो

अन्नासाठी चिलंपीलं, खोप्यामधी किलबिल
लेकराची साद येता, पान्हा जन्म घेतो
चोचीमधी ममतेला, चिंब भिजवतो

अभयता पेरताना, रुजलेली फुलताना
फळलेली पाहताना, जेव्हा आनंदतो
तेव्हा मीच आयुष्याला, कडेवरी घेतो

                                              गंगाधर मुटे
--------------------------------------------

गुलमोहर: 

अन्नासाठी चिलंपीलं, खोप्यामधी किलबिल
लेकराची साद येता, पान्हा जन्म घेतो
चोचीमधी ममतेला, चिंब भिजवतो

सुंदर रचना.

मुटेजी,
खुप छान वाटलं !

या वेळी खुप आवडल्या ...
अन्नासाठी चिलंपीलं, खोप्यामधी किलबिल
लेकराची साद येता, पान्हा जन्म घेतो
चोचीमधी ममतेला, चिंब भिजवतो

दाद देण्यासाठी शेवटचे कडवे थोडे बदलतो

अभय ला पेरताना, रुजलेल फळताना
कविता फुलताना बहरली पाहताना,
मी जेव्हा आनंदतो.....
तेव्हा मी आयुष्याला, कडेवरी घेतो

माती तून आलेली मुटे भाउंची कविता आमच्या आयुष्यात मोठा आनंद घेउन येते. जिओ मुटेभाउ जिओ!!

अन्नासाठी चिलंपीलं, खोप्यामधी किलबिल
लेकराची साद येता, पान्हा जन्म घेतो
चोचीमधी ममतेला, चिंब भिजवतो
छान कविता.

छानच.