'टाईम' ने म्हणे झाशीच्या राणीचा बहुमान केलाय!

Submitted by फारएण्ड on 25 July, 2011 - 01:48

'टाईम' ने म्हणे झाशीच्या राणीचा बहुमान केलाय! ही लिन्क पाहा
http://www.time.com/time/specials/packages/article/0,28804,2084354_20843...

'बॅड-अ‍ॅस' वाईव्ह्स मधे एन्ट्री, रूपर्ट मर्डॉक ची बायको, टायगर वूड्स च्या रागात त्याच्या गाडीची तोडफोड करणारी बायको या लिस्ट मधे झाशीची राणी म्हणजे सन्मान! (पेलिनबाईही आहेत त्यात, पण या लिस्ट मधे त्यांचे असणे चुकीचे नाही. अध्यक्षपदाला लायक बायकांच्या लिस्टमधे आल्या तर प्रॉब्लेम आहे Happy )

मुळातच ही लिस्ट म्हणजे फार अभ्यास वगैरे करून बनवलेली जगातील महान कर्तृत्ववान स्त्रियांची लिस्ट नव्हे. इशान थरूर (बहुधा शशी थरूर यांचे कोणीतरी आहेत) यांनी काही नावे त्यात दिल्याने एक भारतीय एन्ट्री आली असावी एवढेच. पण ती स्पेन ची राणी, झाशीची राणी, कदाचित क्लीओपात्रा या नावात बाकी काही टुकार नावे मिक्स केलेली आहेत.

ही लिस्ट गमतीने बनवल्यासारखी वाटते. 'बॅड-अ‍ॅस' शब्दाचा वापरही अमेरिकेत साधारण तसाच केला जातो. आश्चर्य वाटते ते आपल्याकडच्या बर्‍याच बातम्यांमधे हा जणू मोठा सन्मान असल्यासारखे वातावरण निर्माण केले आहे त्याचे.

आणि याचेही की 'तो' शब्द वापरून झाशीच्या राणीचा, भारताचा, स्त्रियांचा, आपल्या संस्कृतीचा अपमान केला म्हणून निदर्शने, टाईम वर बंदी घालायची मागणी वगैरे अजून आली नाही. बरेच स्फोटक मटेरियल आहे त्या विशेषणात Happy

परदेशी मासिके, लोकांची वक्तव्ये यातील उल्लेखांना अवास्तव महत्त्व दिले जाते त्यामुळे हे होत असावे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्या यादीत एलेनॉर रुझवेल्ट,स्पेनची राणी इझाबेला, क्लिओपात्रा, मिशेल ओबामा, मेलिंडा गेट्स यांचाही समावेश आहे.

बॅडअ‍ॅस या विशेषणाचे अन्य अर्थ असले तरी इथे ते टफ, अ‍ॅग्रेसिव्ह या अर्थी वापरलेले दिसतेय.

सारा पॅलिन नाही पटले. पण बाकी लिस्ट चांगली आहे. एलिनॉर रुझवेल्ट, एलेन डी जेनेरेस, एलिन वूड्स माझ्या फेवरिट. झाशीच्या राणी साहेबांना अवघ्या बाविसाव्या वर्षीच मरण आले हे किती वाइट नाही का? त्यांना जर थोडा अधिक सपोर्ट मिळता तर एक चांगली अधिकारी राणी आपल्याला जास्त दिवस मिळाली असती. रुझवेल्ट बाईंची वचने खूप स्फूर्तीदायक असतात. स्पेनची राणी पण ग्रेटच आहे. आत्मविश्वास डळमळीत झाल्यास वाचावी अशी लिस्ट आहे.

ओबामा वहिनी व गेट्स वहिनींचे पण कौतुक आहेच पण काहीझाले तरी फार कर्तुत्ववान नवरे त्यांच्या पाठीशी आहेत. तेव्हा स्ट्रॉन्ग असणे फार वेगळे असते. आपल्याकडी नीतावैनी कश्या कर्तुत्ववान आहेत वगैरे लिहून येते तसे. बट नो ऑफेन्स.