साडेसाती-- एक कथा
डिसेंबरच्या ऐन थंडीची रात्र; तुरळक वस्तीच्या खेड्याचा आसमंत. निर्मनुष्य टोकाला असलेल्या रेल्वे स्टेशनचा परिसर. आकाशाला न पेलणार धुकं सर्वत्र पसरत होतं. गोरठून निष्प्राण झालेले लांबचलांब रूळ; अधलल्या-मधल्या तुरळक भागी, पोलादी चमक दाखवत होते. फलाटाच्या
जवळच्या केबिन मधला पिंवळसर प्रकाश -- आसमंतातील जिवंतपणाचा एक पुरावा मात्रच !
फलाट म्हणावं पण खरं तर नांवापुरताच, चबुतरावजा ओटा दिसत होता. त्या ओट्याच्या एकीकडे रूळ
आणि दुसरीकडे दोन बसक्या खोल्या; एका खोलीला निरावरोध येजा करता यावी म्हणून दारा ऎवजी
झडप. तें स्टेशनमास्तरांच ऑफिस असावं. थोडं जवळ जाता अर्धी झडप तुटलेली दिसली; आणि तिथेच
पिवळ्या प्रकाशाचा स्रोत. खोलीत एक उंच स्टुलासारखी खुर्ची,एक बसकं टेबल आणि टेबला भोवती दीड
बाकडी ! फलाटाच्या बाजूच्या भिंतीला एक खिडकी - जाम बंद.
खोली तशी वापरात कमीच असावी; कारण जमीन काय, फर्निचर काय, सगळीकडे धुळीचा जाड गालिचा पसरलेला!
माणसांचा वावर म्हणावं तर जमिनीवर कुत्री, शेळी, मांजर, उंदीर अशा प्राण्यांचेच अस्पष्ट ठसे होते. एकांत-
विसाव्याला येत असावीत कधी !
मास्तरांच्या ऑफिस टेबलवर शांतता भंग करणारी "कडकट्ट" यंत्रणा, सिग्नलच्या
खोबळ्यातून तुटलेल्या जाड भिंगाचा पेपरवेट आणि त्या खाली दडलेले आडव्या-उभ्या रेघा आखलेले काही फॉर्म.
लाल रंगात अधिक चिन्ह असलेली एक; अडीअडचणीला उपयोगी पडणारी फर्स्ट-एड बॉक्स !
मास्तरांच्या जुनाट शिसवीच्या खुर्चीचर लोंबकळून पडलेला टॉवेल अन् मागच्या भिंतीलगत टेकून एक स्ट्रेचर. एकूण
दृष्य गावठी सूतिकागृहाची आठवण व्हावी असं.
प्रतिक्षा्लय? खोल्यांच्या ओळीत नाममात्र एक शेड. बहुधा बांधकाम ठेकेदार बिलाचे पैसे न मिळाल्यामुळे वैतागून
पळून गेला म्हणून अपूर्ण आणि दुर्लक्षित. प्रवाशांसाठी पाण्याची सोय म्हणून जमीनीत धसलेला हॅंडपंप; गंजलेला आणि
स्वतःच तहानेनी व्याकूळ
प्रतिक्षालय आणि मास्तरांच ऑफिस यां मधेबंद जाळीची खिडकी -- तिकिट मास्तरांची नक्की. जाळीला वेढलेली
जळमट प्रवाशांची वर्दळ आणि तिकिट विक्रिची कल्पना येण्यास पुरेशी. एकंदरीत पाहता तिकिटमास्तर "फावल्या"
वेळात "इतर" अनेक कर्मचार्यांचे रोल करीत असावेअत असा अंदाज नक्कीच यावा.
तांबड फुटू लागणार वाटलं. केंव्हाचा प्रतिक्षालया लगतच्या वृक्षाच्या कट्ट्यावर अवघडून बसलो होतो.
दूरवर, धुक्यात गुरफटलेल्या मानवी आकृतीची मंद पावली हालचाल दिसली आणि थोड हायसं वाटलं. नक्कीच कुणितरी
य़ॆत होत. उठलो. म्हटल, गारठलेले हात-पाय पण मोकळे करावे आणि, तिकिटमास्तर किंवा स्टेशनमास्तर असले तर त्यांना
आपली गाडी केंव्हा येणार, तिकिट कसे-केंव्हा मिळणार वगैरे विचाराव. अन् हो, गरमागरम चहा कुठे मिळेल कां तेही विचारावं.
आपाद मस्तक आछादनात दडलेली ती मानवाकृती सरळ मास्तरांच्या खोलीत शिरली दाराची एक झडप हेलावून
पुन्हा स्थिर झाली. पाठमोरी आकृतीच असल्याने चेहेरेपट्टी दिसत नव्हती. सबंध चेहेर्याला गुंडाळलेला मफलर काढून त्यानी "कडक्ट्ट"
यंत्रातून बाहेर आलेल्या कागदाच्या पट्टी वर बॅटरीचा झोत टाकला. रोखलेला श्वास सोडला तशी समाधानाची अस्पष्ट शीळ उमटली.
मी बाहेरूनच चौकशी केली-- "गाडी येणार कां वेळेवर ? " उत्तरा आधि बॅटरीचा प्रखर झोत माझ्या डोळ्यांना पार
दिपवून गेला आणि मागोमाग शब्द घुमले --" तिकिटाची खिडकी उघडेल थोड्याच वेळात , सर्व माहिती तिथेच मिळेल."
अजून काही विचारण्याची सोय नव्हती. मास्तरांच्या बगलेत दोन दांड्यांना लपेटलेले कापडी झेंडे आणि एका हाती कडीला अडकलेला
गोळा दिसला. दुसर्या हातात भक्कम हतोडा. खोलीतल्या पिंवळसर प्रकाशामुळे मास्तरांची सावली झेंड्यांवर पडली होती. मग रंग
ओळखणार कसे?. अंदाज-- एक लाल अन दुसरा हिरवा.
करकर - खट्ट आवाजा बरोबर तिकिट-खिडकीची जाळी सरकली - अगदी "तिळा उघड" म्हटल्या प्रमाणे. लागोपाठ ध्वनिक्षेपित सूचना चकित करणारी.
"गंतव्य स्थान कुठलेही असो तिकिट एकच मिळेल आणि ते ही प्रवासी स्थानापन्न झाल्यावर जागेवरच मिळेल. त्यासाठी आवश्यक ओळखपत्र, क्रेडिट / डेबिट कार्ड खिडकीच्या जाळीतून जमा करावे. आकार वसूलीत खानपान खर्च, विमाशुल्क, वैद्यकीयसेवा, इ. सर्व खर्च समाविष्ठ असणार".
गर्दी काही नव्हतीच. फलाटावर इतस्तः विखुरलेल्या हलक्या-अवजड सामानाची ने-आण सुरू झाल्याच जाणवल. हमालांची सफ़ाई वाखाणावी अशी
होती. कार्ड वगैरे खिडकीतून सरकवण्यासाठी हात पुढे केला अन् त्याच क्षणि हाताला विजेचा झटका बसला आणि डोक्यावर जबरजस्त
दणका. सुन्न झाली गात्र. धावपळ करताना स्टेशनमास्तरांच्या हातातला हतोडा लागला कदाचित. लोंबकळत्या रुळाच्या तुकड्यावर पडायचा तो आधि
डोक्यावर! घणघण आवाज कानी पडला म्हणून अंदाज. शुद्धच हरपली किती वेळ कुणास ठाऊक.
आपण स्ट्रेचरवर असल्याच जाणवलं. उजवा हात खांद्यापासून सुन्न पडलेला. दोन परिचारिका-कम-हमाल आजुबाजूस दिसल्या पण ग्लानिमुळे
स्पष्ट नाहीच. त्यांची आपसात कुजबुज- " एकदा बर्थवर झोपवल कि सुटलॊ आपण. पूर्वजन्मीचे भोग असतील बिचार्याचे." केंव्हा कुठे गेल्या कळलंच नाही. पुरूष हमालांना तीस टक्के आरक्षणात जागा मिळाल्या असाव्या इतकीच त्याची संख्या दिसली !
डब्यातल्या लोअर बर्थवर पडून असल्याचं जाणवलं.लहान-मोठे "डाग" इकडूनतिकडे -- ने-आण, जमवाजमव चालू असल्याचे आवाज
कानावर येत होते. बोलण्याचे ही आवाज होतेच पण संदर्भ लागेल तर शपथ.बराच वेळ गेला आणि डब्यातली वर्दळ बर्यापैकी कमी झाली. समोरच्या
खिडकीतून सामानाची, हातगाड्यांची जा-ये थोडी दिसू लागली. . एवढ्यात बाहेरून खिडकीच्या गजाला धरून उभ्याउभ्या दुसर्या कुणाला खुणेनी बोलावून काही हुकुम करीत असल्याचं दिसल. हातवार्यांवरून तो पुरुषच होता. चेहेरा-मोहरा स्टेशनमास्तरांसारखा पण डोक्यावर शिंग ! धक्काच बसला पाहून.
वाटलं, जवळचा नातेवाईक असू शकतो _ आपल्या डिपार्ट्मेंटमधे "चिकटवून" घेतलेला !
लगबगीने टीसीबाई आत आली. तिकिटांच वाटप करण्याची ड्यूटी. जवळ आली तेंव्हा थोडी रेंगाळली म्हणून चेहेरा दिसला. कपाळावर मोठ्ठ कुंकू !
तोंडानी पुटपुटत डोक्यावर शिंग असलेल्या अधिकार्याला चक्क "शनि" म्हणून लाखोली देत होती, "स्त्रियांशी नम्रतेन वागाव-बोलाव हे कोण सांगणार
या धटिंगणाला ? " वैताग व्यक्त करताना तिकिट माझ्या कपाळावर कुठल्याश्या पक्क्या लईनी चिकटवूनच दिल. तेवढ्यात, त्या "शनि"
च्या करड्या आवाजात नवा धाक-- " ए सटवाई, लवकर आटप. गाडीची वेळ होतीए - लवकर आटप" तिकिटांच्या पट्ट्यांच भेंडोळ सावरून गेली
तरातरा.
नवजात शिशूच्या टाहो सारखी शिट्टी वाजली अन् गाडी सरकू लागली. खिडकीतून दिसणार बाहेरच दृष्य हळूहळू मागे सरू लागलं. तांबड फुटू
लागलं होत म्हणून थोड स्पष्ट. अंधार-उजेडाचा खेळ! क्षणभर, हातात हेलावणारा हिरवा कंदिल आणि शिंग असलेलं डोकं पहून धस्स झाल ! बापरे, हाच
गार्ड संपूर्ण प्रवासात असणार !
किती वेळ डुलकी लागली कुणास ठाऊक. कळलंच नाही. गाडीच्या नादबद्ध लयीत सुखावलो. तांबडं फुटू लागलं होतं. थांबा आला कि प्रवासी आणि सामानाची चढउतर व्हायची; गावाच्या नांवाची घोषणा सुद्धा कानावर यायची. अवजड, लहान-मोठी पार्सल्सच्या उचला-ठेवीचे आवाज आणि हमालांना दिलेल्या सूचनांचे कोरडे कानांवर आदळत. आटोपता टाहो फोडून गाडी पुढच्या प्रवासाला सज्ज! सकाळचा चहा, नाश्ता, डब्यातली स्वछता इ.
कामं एका आगळ्या यांत्रिक शिस्तित घडताना दिसत होती.
कुणीतरी खांद्यांना धरून मला बर्थवर बसवलं. उजव्या खांद्यात उपटलेली कळ सोसवली नाही म्हणून डोळे बंद झाले अन् कोणी
बसवल ते दिसलेच नाही. माझ्या सामानाची आवरासावर होताना परिचारिकेची सूचना आली___ ’पुढच्या जंक्शनला उतरून दुसर्या मार्गाच्या दिशेला
पुढचा प्रवास करायचा आणि तो शक्यतेवढा स्वबळावर हंss ! इंशुरंन्सची मर्यादा ओलांडली तर खर्च वाढेल म्हणून सांगितलं"
गाडीचा वेग मंदावत होता होता थांबली एका ठिकाणी. इंजिनानी दमून उसासा टाकला. डाव्या खांद्याला लटकलेल्या पिशवीत हलकं सामान घेऊन
मी प्लॅटफौर्मवर उभा. फारसे कोणी प्रवासी उतरले दिसले नाही. स्टेशनच्या नांवाच्या बोर्डावर ठळक सूचना दिसली __ "मोक्षधाम च्या प्रवास्यांनी
इथे उतरून पुढची गाडी घ्यावी"
प्रश्नांच रान उठल डोक्यात --- कॆंव्हा,कुठे, कसा करायचा पुढचा प्रवास ? मटकन बसणार इतक्यात तो शिंगवाला टीसी-कम-गार्ड-कम वगैरेवगैरच
समोर उभा ! म्हणाला -- " माझी ड्युटी आता पुढच्या गाडीवरच आहे;मीच बसवून देईन पुढच्या प्रवासाला."
पर्याय नाही. वाट तर पहातच आहे !
साडेसाती
Submitted by bnlele on 25 July, 2011 - 00:18
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
वा .. तुला अश्या कल्पना
वा .. तुला अश्या कल्पना सुचतात तरी कशा??
बरेचसे संदर्भ लागत नाहियेत..
बरेचसे संदर्भ लागत नाहियेत.. अर्थात फक्त मलाच संदर्भ लागत नाहियेत.. बाकि सर्वांना कदाचित कळालि असावि कथा...
छान कथा.
छान कथा.
कथा आवडल्याच वाचून समाधान
कथा आवडल्याच वाचून समाधान झालं
जन्मापासून आयुष्याच्या प्र्वासाची एक सांकेतिक गुंफण लिहिण्याचा माझा प्रयत्न असा विचार केला तर संदर्भ लागेल असं वाटतं
जन्मापासून आयुष्याच्या
जन्मापासून आयुष्याच्या प्र्वासाची एक सांकेतिक गुंफण लिहिण्याचा माझा प्रयत्न असा विचार केला तर संदर्भ लागेल असं वाटतं>> या संदर्भासह वाचली तर कथा बरीच कळते... धन्यवाद..
कथा आवडली. पण साडेसाती नाव का
कथा आवडली. पण साडेसाती नाव का दिलय हे कळले नाही. वर तुम्ही 'शनी' असे एक पात्र घातले आहे... त्याला खरं तर 'यम' नाव द्यायला हवं होतं का?
कथेची सुरवात जन्म प्रक्रिये
कथेची सुरवात जन्म प्रक्रिये पासून आहे. त्या क्षणी अपंगत्व येण्या मागे प्रचलित समजानुसार शनिच असणार. यम आयुष्याच्या अंतिम टप्प्यातच येतो अशी समजूत रूढ आहे.
सटवाई जन्मा नंतर पाच दिवसात नशीब लिहीत असते या आधारे "प्रवासाच्या तिकिटाची " कल्प्ना सुचली.
पुन्हा सांगावे से वाटते कि मी साहित्तिक वगैरे नाहि. सांकेतिक शब्दचित्र डोळ्यासमोर आलं तसंच उतरल हेच सत्य.
शीर्षक साडेसाती
शीर्षक साडेसाती ऐवजी...............नशीब जन्माचे..... जरा चांगले वाटले असते.
कल्पना छान आहे........पण साडेसाती बद्दल विचार पटले नाही........... साधारण दुष्टचक्र मागे लागल्यावर साडेसाती लागली असे मानले जाते....... एक तर सगळ्यांचेच वाईट होत नाही त्या साडेसाती मधे.......खुप जणांना साडेसातीच्या सात वर्षातच जास्त लाभ झालेला दिसुन आलेला आहे...(मी ही एक त्यातलाच) दिवस वाईट आल्यावर चांगले दिवस सुध्दा जास्तच येतात........त्यामुळे साडेसाती चांगलीच..............
खुप छान.
खुप छान.
आवडली कथा! पण साडेसाती हे नाव
आवडली कथा!
पण साडेसाती हे नाव इतर संकेतात नाही बसत असे वाटले. साडेसाती साडेसात वर्षांनी संपते पण आयुष्याचा प्रवास तेवढाच असतोच असे नाही (अधिक करून नसतोच).
वाचकांचे दृष्टिकोन आणि
वाचकांचे दृष्टिकोन आणि त्यासोबत मिळणारी माहिती हा अमूल्य ठेवाच आहे.