Submitted by सूर्यकिरण on 18 July, 2011 - 03:53
हुंदके गिळूनी टाळतो
आता शल्य हे मनीचे,
पार भेटता अडवळणी,
घेई झोके आठवणींचे
कोसळताच सरी बेभान,
उडते छप्पर ओसरीचे,
आसर्याला थारा देण्या,
थरथरते पान आभाळाचे
दुर भेटता क्षितीज मग,
पाऊलवाट सोडून जाते,
खुणा झाकण्यास सार्या,
समई विझूनी रात्र होते..
काळाची हि रित अघोरी?
भावना सार्या गोठवते,
क्षणांची फुले वेचण्याआधी,
अंगणी वादळ ऐसे का भेटते?
- सूर्यकिरण
गुलमोहर:
शेअर करा
मस्त जमलीय कविता....
मस्त जमलीय कविता....
आवडली
आवडली
काळाची हि रित अघोरी? भावना
काळाची हि रित अघोरी?
भावना सार्या गोठवते,
क्षणांची फुले वेचण्याआधी,
अंगणी वादळ ऐसे का भेटते?
यथार्थ्.............खूप छान..............
“काळाची हि रित अघोरी? भावना
“काळाची हि रित अघोरी?
भावना सार्या गोठवते,
क्षणांची फुले वेचण्याआधी,
अंगणी वादळ ऐसे का भेटते?”
....छान
-----------------------------------------------
अवांतर
(काही ठिकाणचे र्हस्व दीर्घच्या टायपोंकडे कृपया लक्ष द्यावे..... राग नसावा)
मस्त रे सुर्या.
मस्त रे सुर्या.
सुकि खूपच छान .. आवडली
सुकि
खूपच छान .. आवडली
सर्वांचे मनापासून धन्यवाद.
सर्वांचे मनापासून धन्यवाद. उल्हास काका मी योग्य ते बदल करतो.
Kay rav tumhi tar manatl
Kay rav tumhi tar manatl
livta ki ,man kavde tari nahi na.
Chan.........
सुंदर.
सुंदर.
काळाची हि रित अघोरी? भावना
काळाची हि रित अघोरी?
भावना सार्या गोठवते,
क्षणांची फुले वेचण्याआधी,
अंगणी वादळ ऐसे का भेटते?>>> ह्म्म नेमकं टिपलयस.. !!सुंदर कविता !!
छान.
छान.
क्लास रे....!!!
क्लास रे....!!!
सुंदर कविता.
सुंदर कविता.