एक साथ अशी हवी..

Submitted by अखिला on 17 July, 2011 - 01:00

एक साथ अशी असावी..

आयुष्यात खूप मोलाच काहीतरी देऊन जाणारी..

आठवणीत नेहमीच राहणारी..

आठवणी अशा असाव्यात..

जेव्हा कधी दुरावा येईल ..

मैलांच अंतर जरी असेल..

तरी नुसत्या आठवणींनेच भेट व्हावी..

एक साथ अशी असावी..

शब्दांवीनाच सगळं काही सांगणारी..

शब्दांचे अर्थ फिके व्हावेत..

ह्रदयातलं सारकाही न सांगताच समजून घेणारी..

एक अशी सोबत असावी..

एक साथ अशी असावी..

रोज नव्या दिवसात नवा जन्म घेणारी..

आयुष्यातले क्षण सुगंधीत करुन टाकणारी..

अशी एक संगत असावी..

एक साथ अशी असावी..

अचानक बरसणार्‍या सरीसारखी..

हिवाळयातल्या गोठ्वणार्‍या थंडीत..

हळूच डोकाऊन ऊब देऊन जाणार्‍या सुर्यकिरणांसारखी..

गुलमोहर: 
शब्दखुणा: