बोलायचे असेल खूप काही..
सांगायचं असेल सगळं..
मनातलं..मनापासून..,
पण तुझ्या BUSY असण्यात राहूनच गेलं..
दाखवायची असतील सगळी स्वप्नं माझी,
माझ्या अवकाशातली..
मीच काळोख्या रात्री कधीतरी..
चांदण्यांसोबत सजवलेली कधीकाळी,
माझ्याच नजरेतून..,
पण
पण..
तुझ्या BUSY असण्यात सगळच राहूनच गेलं..
ऐकवायचे असतील माझ्या ह्र्दयातले शब्द..
त्या शब्दांनीच गुंफली असती एक लकेर..
धुंद होउन गेली असती मने..
पण ..
राहूनच गेलं सगळं..
निसटले ते क्षण..
नाही पकडता आलं मुठीत त्यांना..
ऊरली फक्त एक रिकामी पोकळी..
राहूनच गेलं..
फुलवायचे होते मला..
मळे ..चंदेरी चांदण्यांचे..सोनेरी स्वप्नांचे,
गंधीत फुलांचे..
राहूनच गेलं सगळं..
तुझ्या नसण्यातच शोधलं अस्तित्व मी तुझं..
तरी वाटतं ..
तू असतास तर..
पण राहूनच गेलं..
जगणच राहून गेलं..
तुझ्यासोबत चालायच्या होत्या आयुष्याच्या पाऊलवाटा..
एकटीनेच तुडवल्या त्या...निवडूंगांसोबत..
तुझ्यासोबत निशिगंधी सुगंध अनुभवायचं..
राहूनच गेलं..
राहूनच गेलं..
माझ्या थड्ग्यावर हवा होता ओलावा मला..
तुझ्या दोन अश्रुंचा..
तुझे फक्त दोन अश्रु..
पण ..ते नव्हते तुजकडे..माझ्यासाठी..
मरताना शेवटचं..शेवटचंच अनुभवायचं होतं तुला..
राहूनच गेलं..
तुझ्या नसण्यात ..
तुझ्या BUSY असण्यात..
सगळं राहूनच गेलं...