१२ च्या भावात...!!

Submitted by paragmokashi on 12 July, 2011 - 08:55

प्रसंग १ला

आईला ! खरंच!! म्हणजे मक्या गेला आता १२च्या भावात.. काय लेकाला घाई लागून राहिली होती काय माहित.. संजय उवाच

मग काय!!! सांगत होतो त्याला आधी नवीन जॉब हातात पडू दे.. मग भीड .. तर नाय .. कळवली आपली काशी ... इति मिलिंद..

ए संज्या ! ए १२ चा भाव म्हणजे काय रे... (अर्थातच "मी")

एका हातात चहा आणि दुसर्या हातात सिगारेट .. तोंडातून धूर सोडत एकदम विचित्र भाव चेहऱ्यावर आणीत आणि माझ्याकडे शून्यात बघावे तसा बघत संजय ... क्क्काय!? ...
(दोघांचे गहन संभाषणात मी लैच बाळबोध आणि असंबद्ध प्रश्न केल्याने बहुतेक हा सटकला होता..)
मोक्या ! काय एड लागलाय का लेका ... का उगाच तापवतो.. (त्याला डोके म्हणायचे होते बहुतेक.. कारण सिगारेट वाला हाताचे मधले बोट कपाळाला लावीत म्हणाला..) च्यायला काय ... चाललेय काय .. बोलतोय काय..
गप न मोक्या.. लई नाटक झालाय आज.. मक्या ला बहुतेक नारळ मिळणारे संध्याकाळ पर्यंत.. - मिलिंद
matter तसा serious होता.. पण माझ्या डोक्यात दुसरेच घुसले होते.. हा १२च भाव काय प्रकार आहे... (म्हणजे वर वर अर्थ जरी माहित असला तरी.. या शब्दाला काय पार्श्वभूमी आहे, याचा उगम स्थान काय.. वगैरे विचार सुरु झाला होता .. )
साला काय प्रकार आहे नक्की हा १२ चा भाव ! म्हणजे त्याला तसे गाळात जाणे, खड्यात पडणे, असे काही समानार्थी शब्द सांप्रत भाषेत आहेत.. पण साला १२चा भाव काही झेपत नवते . भाव १२चाच का असावा??... पाणी हे नेहमी १२ गावचेच कां??... एखादा नेमका १२ ...डाच का असतो?? (गावरान भाषेत एकधा जरा जास्तच हरामखोर आहे .. हे सांगण्या साठी "१२ ....डा चा हाय .." आणि त्याचाच शोर्ट फोरम " लई १२च हाय बेनं " असे संभोधतात.) हे १२ की प्रकरण आहे राव??
तूर्तास तरी १२च्या भावावरच विचार केंद्रित करायचे ठरवले...

प्रसंग २रा

" घ्या १० ला १२ .. १० ला १२.. "" रस्त्यावरून केळीवाला ओरडत चालला होता..
कशी दिली भाऊ ..
१०ला १२ ताई
१० ला १२?? "मी"
१०ला १२ !! परत मी..
आता केली वाला भाऊ आणि केली घेणारी त्याची ताई दोघेही माझ्या कडे विचित्र नजरेने पाहू लागले..
माझ्या तोंडावर एकदम अमेरिका गवसल्याचा आनंद होता..
केलीवाल्याच्या तोंडावर.. आईला !! लैच कमी भाव लावला वाटतं आपण.. !! असला भाव..
ताई मात्र हा काय प्रकार आहे.. हा भाव आईकून येवढा का आनंदला... आता काय अक्खी गाडी घेतो का काय..? असला काहीतरी भाव दर्शवित होत्या...
मी मात्र तसाच पुढे.. निघालो.. च्या मारी असा आहे तर एकंदर.. १२ चा म्हणजे डझना च्या भावात.. म्हणजे फालतू किमतीत.. हुश.!! सुटलो एकदाचा.. case solved .. matter closed .. येस्स्स.. वगैरे मनातल्या मनात ओरडून घेतले.. आणि तेवढ्यात....!!!
पण! .... मध्ये आमच्या शेजारच्या काकांना म्हणालो होतो काका स्कूटर खूप जुनी झालीये विका आता..तर...
" .. अरे विकायची तर किलोच्या भावात विकावी लागेल.. त्या पेक्षा बरी आहे चालतेय तो वर चालवायची.. हे हे हे ..!" असे काहीतरी म्हणाले होते... हे हि आठवले..
अरे!.. स्कूटर किलोच्या.. अन मक्या १२च्या.. असं कसं..! काही तरी गोची आहे..

.. एक अर्थी १२ चा भाव म्हणजे द्झ्नाचा भाव .. म्हणजे फाल्तुत..अगदी 'फुक्कट चा गेला' असे काही तरी .. हे काही अंशी जुलत होते.. पण तरीही कुठे तरी गोम वाटत होती..
परत विचार चक्र सुरु....

प्रसंग ३रा ..
ज्योतिष हा माझा आवडता विषय (म्हणजे आता जरा जास्तच आवडू लागला आहे..).. काय सांगा.. उद्या आपलीही नोकरी गेलीच तर जोड धंदा म्हणून ...आणि त्यात हि उगाच पोपटावर विसंबून रहायला नको... साला..एखाद दिवशी तो आजारी पडला तर आपली उपासमार !!...म्हणून कुंडली का काय असते त्याचा अभ्यास सुरु करू असे माझे मत पडले..
अभ्यास अर्थात पुस्तके वाचून... "अगदी गरज पडली तर क्लास लावू.. इथ कुठ परीक्षा द्यायचीये.. पहिले झेपतंय का हे तरी बघू.. " असे स्वतालाच समजावून मी ओमप्रकाश ला फोन लावला.. या सुट्टीला भेट. तुला देतो पुस्तके.. असे काही ठरले..
अभ्यासाला बसलं पाहिजे बाबा (लक्ष्मीकांत बेर्डे च्या स्टायलीत)... असे काही पुटपुटत रविवारी सकाळीच त्यातले एक पुस्तक उघडले.. अर्थात सुरुवात कुंडलीची तोंड ओळख .. किती घर, आखायची कशी.. घरांचे अर्थ वगैरे..

१ले घर.. लग्न स्थान .. हे घर फार महत्वाचे असते.. या घरात जी रास असेल किवा आकडा असेल ती आपली लग्न रास..या घरा वरून.. म्हणजे कोणता ग्रह या घरात राहतो या वरून.. आरोग्य.वर्ण..रंग.. बांधा.. वगैरेंचा. अंदाज येतो.. असे की की लिहिले होते..

द्वितीय .. तृतीय... असे करत करत...१२व्या घरावर आलो.. आजकाल कुठेही १२ दिसले कि माझे अंतर्मन जागृत होते.. आणि पटकन आठवण करून देते... १२... १२... १२...

तर हे १२ वे स्थान.. या वरून. तोटा ,अचानक उद्भवणारे खर्च,दुर्दैव..अथवा परदेश गमन .. असे बघतात.. थोडक्यात की.. कि या स्थानाला व्यय स्थान म्हणतात.. काय काय जाणार हे या वरून कळते.. अगदी माणूस सुद्धा देश सोडून जाणार असेल (किवा देशोधडीला लागणार असेल..) तरी ते यावरूनच बघतात.. इतके कळले.. हळू हळू एक एक उमगत गेले.. घर.. घर म्हणजेच स्थान.. स्थान म्हणजेच भाव.. आणि १२ वे घर...व्यय स्थान...व्यय भाव.. १२ वा भाव.. बारा चा भाव... हां.. हे जरा पटतंय..
ठरलं तर.. १२ चा भाव... म्हणजे व्यय भाव.. एखादा ह्या भावात जाणे.. म्हणजे त्याचे काय होत असेल हे आलेच कि ओघ ओघ ने.. काय?? पटतंय का??

सध्या तरी मला १२ चा भाव म्हणजे हाच अर्थ अभिप्रेत आहे...
पण साला मग.. पाणी १२ गावचच का असत? .. एखाद बेन हे नेम्क १२ चच का असत.. हे नवीन प्रश्न पड्ले आहेत .. बघा आपापल्या परीने विचार करून... काही उगले तर उत्तमच.. काय??

गुलमोहर: 

@ निवान्त पाटिल

>> भारी जम्या है
- - मनःपुर्वक आभार.. Happy

>> अजुन कोणितरी लिहलयं १२ च महत्व
- - धागा देणे जमल्यास उत्तम.. Happy

गावातला बाजार साधारण दुपारी १२ वाजता उठत असे, त्यामुळे दुकान बंद करायच्या घाईत येईल त्या भावाला माल संपवण्यात येत असे. त्यावरुन १२ च्या भावात हा शब्दप्रयोग आला