Submitted by अखिला on 10 July, 2011 - 08:39
रुणझुणत्या पैंजणांच्या नादातून तू भेटतोस जेव्हा,
कोवळया नवलाईच्या हिरवळीत
येतोस तेव्हा..
तेव्हा..
मनातले सूर गवसल्यासारखं वाटतं..
तारा ह्रदयातल्या,
झंकारुन..
शब्द गुंफू लागतात..
आठवणी तूझ्या
माझ्याभोवती कोश विणू लागतात,
त्या कोशात मी इतकी गुरफटून जाते,
की..
ना मी इतरांची उरते ,
ना स्वतची..
माझं पूर्ण जगच विरघळून जातं..
त्या नवीन जगाच्या सीमेवर
मी तूझीच वाट पाहत राहते...
तुझ्यासोबत त्या जगात हरवून जायचं असतं,
सोनेरी स्वप्नांची गुंफण घालायची असते...
त्या जगातल्या वाटा अशाच चालत रहाव्याश्या वाटतात..
तुझ्याच सोबतीने..
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
जमलीये..पु.ले.शु
जमलीये..पु.ले.शु
धन्यवाद.. पण पु.ले.शु म्हणजे
धन्यवाद..
पण पु.ले.शु म्हणजे काय???
अग पुढील लेखनास शुभेच्छा छान
अग पुढील लेखनास शुभेच्छा छान आहे कविता!
धन्यवाद जुई..
धन्यवाद जुई..