Submitted by अखिला on 9 July, 2011 - 23:16
माझे अश्रू, माझ्या वेदना घेऊन..
शोधत राहते,धुंडाळत राह्ते
त्या उदध्वस्त शहराचा कोपरा अन् कोपरा..
त्या शहराच्या वेशीवरच,
टांगलेली ल़क्तरं ..
माझ्या सगळया स्वप्नांची,
ते एक उदध्वस्त शहर..
त्या शहराच्या गल्लीबोळात भटकत राहते..
एका नवीन अंकुराच्या शोधात..
जे कधी तरारेल,
फुलवेल पुन्हा त्या मरुभूमीला..
पण,
मला भेटतात फक्त शुष्क निवडूंग अन् काटेरी बाभळी..
ते एक उदध्वस्त शहर..
ज्यात राहतात फक्त अन् फक्त..
धुकट होत जाणार्या आठवणी,
तरीही..
तरीही..
अगदी निकराचा प्रयत्न करुन,
मी शोधू पहाते,
कुठेतरी नवजीवनाची चाहूल..
पण त्या शहरात मात्र सापडतात मला..
जळणार्या चिता..
माझ्याच सोनेरी स्वप्नांच्या..
त्या स्मशानभूमीत मी एकटीच उरलेली,
सगळं राख होत असताना पाहत राहते..
चिता जळतच राहतात..
त्या उदध्वस्त शहरात ..
माझ्या भग्न ह्रदयात ..
चिता जळतच राहतात...
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा