Submitted by माधव on 6 July, 2011 - 06:05
आज आपल्या भोवती अनुदानीत / विनाअनुदानीत, मराठी / इंग्रजी माध्यम, SSC / ICSC / CBSC असे वेगवेगळे बोर्ड अशा अनेक पर्याय असलेल्या शाळा उपलब्ध आहेत. आपल्या पाल्याला नक्की कुठल्या शाळेत घालावे याचा गोंधळ उडतो. या विविध पर्यांयांचे फायदे / तोटे आणि त्याच्या अनुषंगाने इतर बाबींची चर्चा करण्यासाठी हा बाफ.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खरंतर ही चर्चा << मुलांना
खरंतर ही चर्चा << मुलांना कितव्या वर्षी शाळेत पाठवावे?>> या बाफवर योग्य नाही. पुढे कधी गरज भासल्यास पटकन संदर्भ मिळणार नाही.>>>>>> धन्यावद सगळ्यांचे पण शाळेची निवड हाच बाफ मला सापडला आणि शाळेच्या अनुषंगाने आलेले/उद्भवलेले सर्व प्रश्न होते म्हणून इथे लिहीले त्रास झाला असल्यास माफ करा
मी वरती लिहिल्या प्रमाणे
प्लेग्रूप ला २ वय वर्षे असणाऱ्याना अडमिशन मिळत आहे पण ओळखीतील असल्या मुळे दोन ऑप्शन मिळाले आहेत
१. जूनला अडमिशन घेऊन ति रुळतेय काते पहाणे (कारण थोडी समज कमी असते )
२. किवां मग ऑक्टोबर ला शाळा जॉईन करणे ( २ वय वर्षे झाल्यावर ऑक्टोबर २०१२ ला)
ईथले प्रतिसाद बघून आता काय करावे कळत नाही ? आमच्या बाबतीत जे घडले ते घडूनये म्हणून हा सर्व प्रायास
प्लेग्रूपला बंद करावा का ?
की ऑक्टोबर मध्ये २ वर्षे पूर्ण झाल्यावर प्लेग्रूपला पाठवावे ?
माझ्या मुलाला ६ वर्षे पुर्ण
माझ्या मुलाला ६ वर्षे पुर्ण झाल्यावर 'डायरेक्ट' पहिलीला घातले (तो पर्यंत तो घरीच होता )>>
@ निवांत पाटील, असा sr आणि jr KG न करता पहिलीत घेतात का? कोणत्या शाळेत आहे तुमचा मुलगा? म्हणजे मला खरच याबद्दल माहिती नाहीये म्हणून विचारतेय
केदार२०, मला त्रास वगैरे काही
केदार२०, मला त्रास वगैरे काही नाही हो... इथे का नको? त्याचे कारण मी लिहिलेले आहेच.
तुम्ही प्लेग्रूपच्या बाईंशी बोलून बघा. तिला शाळेत असुरक्षित वाटण्याचे काय कारण आहे त्याचा शोध घ्यायचा प्रयत्न करा. आत्ता तातडीने शाळा बंद करून ऑक्टोबरमधे पाठवायचं ठरवलंत तर मुलीने शाळेचा धसका घेण्याचि शक्यता आहे. ते टाळण्यासाठी शक्य असेल तर तुमच्या दोघांपैकी कोणीतरी तिच्याबरोबर शाळेत काही वेळ बसा. प्लेग्रूपच्या बाईंशी तुम्हाला पडणार्या सर्व प्रश्नांवर चर्चा करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वय वर्ष २ असणार्या अपत्यासाठी इतके चिंतीत होऊ नका, अजून तुम्हाला बराच मोठा पल्ला गाठायचाय.
तुम्ही असा काहीच ताण न घेता
तुम्ही असा काहीच ताण न घेता जे मुलासाठी योग्य तेच केलेत याबद्दल अभिनंदन. > +१
आम्हीच अती काळजी करोय अस
आम्हीच अती काळजी करोय अस होतंय <<< हो, बर्याचदा असेच होते.
तुम्ही राहता कुठे?? इथे मुंबईत मुल ५ पुर्ण आणि तरीही अजुन शाळेत नाही हे बघुन लोक पालकांना वेड्यात काढतील, मुलाचे पुढचे पुर्ण आयुष्य बरबाद करताहेत म्हणुन. <<< साधना, अगदी, अगदी.
शाळेत केव्हा घालावे, याचे ज्याचे त्याचे आराखडे वेगवेगळे असू शकतात. फक्त एवढेच सांगणे की जग करतेय म्हणून तुम्ही करू नका. तुमच्या मुलाला काय पचनी पडतेय हे बघा.
ते टाळण्यासाठी शक्य असेल तर
ते टाळण्यासाठी शक्य असेल तर तुमच्या दोघांपैकी कोणीतरी तिच्याबरोबर शाळेत काही वेळ बसा.>>>>>> पहीले दोन दिवस असेच केले होते रुळली पण होती पण तो एक मुलगा चावल्या पासून हे चालू झालंय
प्लेग्रूपच्या बाईंशी तुम्हाला पडणार्या सर्व प्रश्नांवर चर्चा करा.>>> केली त्या म्हणतायत ती ईतर मुलां पेक्षा लवकर रुळली (पण सध्या ४ दिवस सारखी रडतेय ) आणि कम्प्लेंट तरी किती करायच्या त्याना त्यांच्या प्लेग्रूपच्या दर्जा मध्य दोष आहेत असे होईल,
आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वय वर्ष २ असणार्या अपत्यासाठी इतके चिंतीत होऊ नका, अजून तुम्हाला बराच मोठा पल्ला गाठायचाय. >>> मी पेण-रायगड येथे राहतो ईथे शिक्षणाच्या योग्य संधी नाहीयेत पुढे जावून ती बाहेर गावी कुठे शिक्षणात कमी पडूनये म्हणून काळजी वाटतेय आणि ही काळजी आम्हा दोघांची आहे.
माझी मुलगी दोन वर्षाची आहे.
माझी मुलगी दोन वर्षाची आहे. तिला या जूनपासून प्लेग्रूपला घातले आहे. आतापर्यंत तरी सर्व सुरळीत चालू आहे. उत्साहाने शाळेत जाते. तिथल्या मुलाबरोबर मस्ती करणे हाच मुख्य अभ्यासक्रम आहे.
मुळात प्लेग्रूप म्हणजे शाळा नव्हे. शिशुविहार किंवा बालवाडी हेच त्याचे स्वरूप असावे.
आमच्या घराच्या जवळच एक काकू गेली वीस वर्षे ही नर्सरी चालवतात. इथे घालण्याआधी मी इतर प्लेग्रूप फ्रँचायझीमधेदेखील चौकशी केली होती. मला स्वतःला हीच नर्सरी योग्य वाटली. त्याची कारणे अशी:
१. या बाईना अनुभव जास्त आहे. इतर फ्रँचायझीमधल्या टीचरना इतका अनुभव नव्हता. आमच्या बिल्डिंगमधली बहुतांश मुले यांच्याच नर्सरीमधे शिकली आहेत. त्या सर्व मुलांच्या पालकानी बाईंबद्दल चांगले मत दिले.
२. घरापासून अगदी जवळ आहे. गरज पडल्यास एक दोन गडगे उडी मारून मला ताबडतोब जाता येते. नेण्याआणण्याचा खर्च आणि वेळ दोन्ही वाचतो.
३. इथे फक्त दहा ते बारा मुले आहेत. त्यामुळे बाईंचे प्रत्येक मुलाकडे लक्ष असते.
४. या बाईंना कोकणी-कानडीसोबत उत्तम मराठी बोलता येते. सुनिधीचा हा भाषेचा प्रॉब्लेम सर्वात मोठा आहे.
५. फी वाजवी आहे. प्लेग्रूपला हजारो रूपयांची फी देण्याची आवश्यकता मला तरी वाटत नाही.
६. इतर सर्वत्र टॉयलेट ट्रेनिंग हवेच असे सांगितले होते. या बाईनी डायपर वगैरे काही नको, मी शिकवते हे स्वतःहून सांगितले. आणि शिकवलेदेखील.
सुनिधीला आत्ताच नर्सरीला घालण्यामागे कारणे पुढीलप्रमाणे:
१. दोन वर्षाची झाली तरी ती अजून स्पष्ट बोलत नाही. इन फॅक्ट जूनपर्यंत तरी ती बोलतच नव्हती. डॉक्टर म्हणे इतर मुलामधे मिसळली की ती बोलायला लागेल. म्हणून प्लेग्रूपचा निर्णय घेतला. महिन्याभरामधे तरी तिची प्रगती उत्तम आहे. दादान दरिंदे घड जा जा हे रस्ताभर ओरडत फिरता येतय.
२. तिचे टॉयलेट ट्रेनिंग करणे मला जमत नव्हते. नर्सरीच्या बाईनी माझे हे काम केले.
३. आमच्याकडे मी, सतिश आणि सुनिधी हे तीनच जण आहोत. त्यामुळे ती "आईबाबा पायज्जे" म्हणून भोकाड पसरणार्या मुलामधली होऊ नये ही माझी इच्छा होती. आता आईवडलापासून थोडंतरी दूर ती दोन तीन तास राहू शकते. स्वतःच स्वत: डबा खाऊन पाणी पिऊ शकते. आपला खाऊ दुसर्या मुलाना देऊ शकते. अन्यथा हे शेअरिंग करणे घरात मला शिकवता आलं नसतं.
४. शाळेत जात असली तरी अभ्यास असा काहीच नाही. चार नर्सरी र्हाईम्स म्हणता आल्या तरी पुरे. एकंदरीत व्यवस्थित बोलता येऊ देत हीच अपेक्षा आहे.
केदार, << मी पेण-रायगड येथे
केदार,
<< मी पेण-रायगड येथे राहतो ईथे शिक्षणाच्या योग्य संधी नाहीयेत पुढे जावून ती बाहेर गावी कुठे शिक्षणात कमी पडूनये म्हणून काळजी वाटतेय >> हे लिहिलेले वाचले. तुम्हां दोघांना काळजी वाटणे स्वाभिविक आहे. पण बाकीची मुलं जातात म्हणून दिड वर्षाच्या मुलीला शाळेत जबरदस्ती पाठवू नका. हे तिचं छान मुक्तपणे बागडण्याचं वय आहे. ओळखीतल्या मुलाला १.२५ वर्षापासुन शाळेत सारखं बसुन ठेवल्यामुळे पाठदुखीचा त्रास सुरु झाल्याचं उदाहरण आहे. हे कारण त्याच्या डॉ.ने सांगितले. अर्थात इतरही कारणे असु शकतात. सांगायचा मुद्दा हा की प्ले ग्रुप असला तरी तिथे बंधन असतात.
व्यक्तिमत्व आकारण्यात शाळेचा मोठा सहभाग असतोच. पण आपण हल्लीचे पालक त्याचा फार बाऊ करतो, असं वाटतं. शाळा निवडतांना देखिल तिचं नाव पाहुन, पहाटेपासुन रांगेत उभं राहुन, २-२.५ वर्षाच्या मुलाचा- आई-वडिलांच्या वेगवेगळ्या लेखी परिक्षा देऊन, मोठं-मोठ्या रक्कमेचे डोनेशन्स देऊन आपण प्रवेश घेतो. आणि शाळेत ६ तास डांबल्यावर परत क्लाससाठी २ तास पाठवतो. शाळेत जर मुलांना शिकवलेलं समजतं की नाही हे पाहिलं जात नसेल तर काय उपयोग नाव मोठं असुन.
माझ्या मुलाला त्याची इच्छा होती म्हणुन सव्वा तिन वर्षाचा झाल्यावर मराठी माध्यमाच्या शाळेत घातलं. पहिल्या दिवसापासुन उड्या मारत गेला. शाळा फार आवडते.
अर्थात ही माझी वैयक्तिक मतं आहेत. ह्याला दुसरी बाजु असु शकते.
साधना, माधव, अवंतिका,
साधना, माधव, अवंतिका, इंद्रधनुष्य ... पोष्ट समजुन घेतल्याबद्दल धन्यवाद. माझा मुलगा ५ वर्षाचा होइपर्यंत मुंबैतच रहात होतो. तेंव्हा तो घरीच असायचा. पण त्याचवेळी २ महिण्यांकरीता तो वेंगुर्ल्याला गेला. त्या दरम्यान मात्र २ महिने तो घराजवळच्या केजी मध्ये गेल्याचे आठवते. त्यानंतर आम्ही युएस ला गेलो. आणि त्याचे वय ६ पुर्ण झाल्यावर संप्टेंबर मध्ये तिथल्या पब्लिक स्कुल मध्ये घातले. भारतात यायचा निर्णय घेतल्यावर तो २ रीत शिकत होता. मग भारतात आल्यावर ३ जानेवारीला त्याला मराठी मिडियम ला अॅडमिशन घेतली. आणि आता तो ४थीत आहे. सगळाच अर्धा मुर्धा प्रवास
.
शाळेची निवड करतानाचा निकषः घराजवळ आहे. प्रवास नाही.
शाळेतील प्रगती चांगली म्हणजे, मागच्या वर्षी त्याने २ लोकल लेवलच्या स्पर्धा परीक्षा दिल्या. एकात तो जिल्ह्यात ४ था दुसर्यामध्ये ४१०० मुलांत राज्यात २८ वा आला. यावर्षी स्कॉलरशिप परीक्षेत नक्कि कळॅल कि त्याची नेमकी प्रगती कशी आहे. (या प्रगती मोजायच्या फुटपट्या आहेत असं मी म्हणत नाहिय, )
आता लोक काय म्हणतातः वर उल्लेख केल्याप्रमाणे अगोदर सगळॅजण असच म्हणायचे कि मी त्याचे भयंकर नुकसानच करतोय. अमेरिकेतुन परत यायच्या वेळीही असेच म्हणायचे कि मी त्याला चांगल्या शिक्षणापासुन दुर ठेवतोय. (महा भयंकर नुकसान करतोय.) आणि आता मुलीच्या बाबतीतही असेच कॉमेंट सुरु असतात. पण काय फरक पडत नाही
पण सगळ्यात अप्रिसिएट करण्यासारखी गोष्ट म्हणजे माझ्या बायकोचा असलेला पाठींबा. सगळे काही तिनेच केले आहे, फक्त निर्णय मी घेतला होता.
CBSE , ICSE , IGCSE या
CBSE , ICSE , IGCSE या तिघांच्या अभ्यासक्रमात नेमका फरक काय आहे....... जर सतत देश-परदेश करावे लागत असेल, तर मुलांच्या दृष्टीने यातील कोणत्या बोर्डमध्ये अॅडमिशन घेणे योग्य आहे? सध्या माझा मुलगा नर्सरीत आहे, तो ज्या शाळेत जातो ती CBSE बोर्डाची शाळा आहे. एकदा CBSE बोर्डाच्या शाळेत गेले तर पुढे ICSE , IGCSE या बोर्डातील पुढील इयत्तेत अॅडमिशन मिळते का ? अभ्यासक्रमात मोठा फरक पडतो का?
CBSE , ICSE हे भारतीय आहेत.
CBSE , ICSE हे भारतीय आहेत. पण middle east, singapore, malaysia पण याच्या शाळा आहेत. त्यामुळे या ठिकाणी येणार असाल तर हे अभ्यासक्रम चालतील CBSE to ICSE or vice versa बदलायला प्रायमरी ला काही प्रोब्लेम नाही.
IGCSE हा cambridge uni चा अभ्यासक्रम आहे. ह्याच्या शाळा जगात बर्याच ठिकाणी आहेत. पण भारतात प्रचंड महाग आहेत.
माझ्यामते middle east, singapore, malaysia येथे राहुन परत भारतात यायचे असेल तर CBSE , ICSE बेस्ट. अधिक माहीती साठी आगाऊ सरांना भेटा.
धन्यवाद मंदार , CBSE , ICSE
धन्यवाद मंदार , CBSE , ICSE या दोन्ही बोर्डाच्या अभ्यासक्रमात महत्वाचा फरक कोणता आहे हे सांगु शकाल का ? ...... यापैकी कोणता अभ्यासक्रम जास्त चांगला आहे.....
अधिक माहीती साठी आगाऊ सरांना भेटा.<<<<<<<<< हे काही कळले नाही, तुम्ही कोणाला भेटायला सांगत आहात
अधिक माहीती साठी आगाऊ सरांना
अधिक माहीती साठी आगाऊ सरांना भेटा.<<<<<<<<< हे काही कळले नाही, तुम्ही कोणाला भेटायला सांगत आहात>>>>>
आगाऊ हा मा बो वरिल एक आय डी आहे. ते स्वतः International school मधे शिकवतात. ते याबाबतीत योग्य माहिती देऊ शकतात.
>>> CBSE , ICSE या दोन्ही
>>> CBSE , ICSE या दोन्ही बोर्डाच्या अभ्यासक्रमात महत्वाचा फरक कोणता आहे हे सांगु शकाल का ? ...... यापैकी कोणता अभ्यासक्रम जास्त चांगला आहे.....
माझ्या माहितीप्रमाणे CBSE सर्वात चांगला, त्याखालोखाल SSC व नंतर ICSE असा क्रम आहे. CBSE च्या पाठ्यपुस्तकात बर्याच आधुनिक काळातील घटना दिलेल्या असतात. SSC ची पाठ्यपुस्तके त्या तुलनेत लवकर बदलत नाहीत.
धन्यवाद मंदार आणि मास्तुरे
धन्यवाद मंदार आणि मास्तुरे
आपल्या बाळाला कधी शाळेत
आपल्या बाळाला कधी शाळेत घालावे या संबंधी काही उपयुक्त माहिती:
"मानवाने निसर्गापासून खूप फारकत घेतल्यामुळे तो शालेय शिक्षणाला खूप महत्व देतोय. पण निसर्गात औपचारीक शालेय शिक्षणाची गरज शून्य आहे" - फुकुओका
(No subject)
माझी लेक २ पुर्ण आहे प्लेल
माझी लेक २ पुर्ण आहे
प्लेल स्कुल ला १.५ असताना पासुन जाते आजुन प्लेस्कुल चालु आहे
तिला नर्सरीला शाळेत च घालु की आहे त्या टिचर कढे नर्सरी करु या विचारात आहे कारण शाळा म्हटल्यावर जाण्या येण्यात खर्च ,वेळ तिच्या वर या गोस्टीचे दडापण देउ वाटत नाहि आताह काय करु?
प्रिभू, मला वाटते तुझा बीबी
प्रिभू,
मला वाटते तुझा बीबी चुकला. हा बीबी शाळांच्या निवडीचे निकष व त्या अनुषंगाने चर्चा ह्या विषयावर आहे. तु विचारलेल्या प्रश्नावर 'संगोपन' ग्रूप मध्येच आधी एका बीबी वर चर्चा झाली आहे बहुदा. शोधून लिंक देते.
प्रिभू, प्ले स्कुल / नर्सरी
प्रिभू,
प्ले स्कुल / नर्सरी गरजेचेच आहे का? - http://www.maayboli.com/node/8609
(हा धागा तुझ्या प्रश्नासाठी परफेक्ट आहे असे वाटते.)
ध्न्स निंबु
ध्न्स निंबु
शाळा बंद पडत आहेत किंवा
शाळा बंद पडत आहेत किंवा चांगल्या शाळाच नाहीत, हा विचर करण्यापेक्षा मुलाला 'कळतं' की नाही हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं. इंग्रजी माध्यमात जाऊन मग टिविशन (का ट्युशन) आणि अभ्यासासाठी डोकेफोड, करण्यापेक्षा मराठी माध्यामात (साधारण) शाळेत, आणि गरज असेल तर इंग्रजीसाठी स्वतः प्रयत्न केले (ज्यांना शक्य नसेल् त्यांनी Learn English वगैरे CDस वापरल्या) तरी मुलांना इंग्रजी सहज येउ शकते. खरं तर कोणतीच भाषा native speaker सारखी येऊ शकत नाही अन त्याची इंग्रजीसाठी गरजही नाही.
मुलाला उगाच खुप अभ्यासात बिझी करण्यापेक्षा त्याला जीवनाचा आनंद घेउ द्या या मताचा मी आहे.
विजय, सत्यवचन श्रीमान
विजय, सत्यवचन श्रीमान
इग्रजी माध्यम शाळा शासन
इग्रजी माध्यम शाळा शासन अनुदानित नसल्यास शाळेत प्रवेश घ्यावा की नाही ?
शाळा शासन अनुदानित असल्याने वां नसल्याने काय फरक पडतो ?
शाळा शासन अनुदानित असल्याने
शाळा शासन अनुदानित असल्याने वां नसल्याने काय फरक पडतो ? >> अनुदानीत शाळांची फी बरीच कमी असते. हा एक फरक नक्की पडतो.
शिक्षणाच्या दृष्टीने बघितल्यास काहीच फरक पडायला नको. पण अर्थात हे शाळेच्या व्यवस्थापनावर अवलंबून असते.
हो माधव विना अनुदानित शाळा
हो माधव विना अनुदानित शाळा भरमसाठ डोनेशन मागतेय
ठाणे येथील सरस्वती सेकंडरी
ठाणे येथील सरस्वती सेकंडरी स्कुल (मराठी माध्यम) इथे प्रवेश मिळणे कठीण आहे असे ऐकले. कोणाला काही कल्पना?
स्वाती, सरस्वती सेकंडरी स्कुल
स्वाती,
सरस्वती सेकंडरी स्कुल (मराठी माध्यम) इथे प्रवेश हवा असेल तर जाऊन प्रत्यक्ष भेटुन विचारुन ये. ते लोक चांगले बोलतात असा अनुभव आहे.
मराठी मिडियम सरस्वती ची शीशु
मराठी मिडियम सरस्वती ची शीशु वर्गाची पहिली लिस्ट लागली सुध्धा. बहुदा दुसरीही लागली असावी. २४० जागांसाठी ७०० अर्ज आले होते. ( रेफः अत्ताच ड्रायव्हरच्या मुला साठी अॅडमीशन घेतली) त्याची आर्थातच ओळख होती. आधी एकां साठी ५ वर्षां पुर्वी गेलो तेंव्हाही ओळख होती म्हणुनच अॅडमिशन मिळाली....
ती ठाण्यातली नावाजलेली मराठी माध्यमातिल शाळा आहे त्या मुळे साधारण कठीण असतच... मधल्या वर्गांत हवी असेल तर मात्र व्यवस्थापनाला जाउन भेटावे.....
ओके...
ओके...
Pages