गंमत गाणे
Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago
4
एक होते गंमत गाणे
इवल्या इवल्या शब्दांचे ते
तरल वेल्हाळ नाजुक तराणे
एक होते गंमत गाणे
शब्द सुटले, गंमत झाली
शब्द फुटले, गंमत झाली!
गीत-सुमांच्या शाखेवरती
विहरण्या शोधी किती बहाणे,
एक वेडे गंमत गाणे!
कसे निसटले अक्षर अक्षर?
कुणा गवसले अक्षर अक्षर?
स्वरासमुहा शब्दांत पकडण्या
नकोच म्हणती वाट पहाणे,
असले एक गंमत गाणे
अल्लद असंख्य भाव भाव
घेती मनाचा ठाव ठाव
गुपीत तयांचे शब्दास सांगत
गुंफतात आपुलेच गार्हाणे
असे एक वेडे गंमत गाणे!
विषय:
प्रकार:
शेअर करा
स्वीट !!!
गम्मत! आवडली.
गम्मत!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आवडली.
गंम्मत गाणे, गंम्मत गाणे!
गंम्मत गाणे, गंम्मत गाणे!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तय !
मस्तय !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)