थोडासा पश्चीम ऑस्ट्रेलिया : फ्रिमँटल आणि पर्थ

Submitted by विशाल कुलकर्णी on 21 June, 2011 - 01:12

अवघ्या एक आठवड्याचा मुक्काम, त्यातही अतिशय व्यस्त आणि हेक्टीक वेळापत्रक. त्यामुळे चार दिवस कसे गेले ते कळालेच नाही. शेवटच्या दिवशी मात्र माझा ऑस्ट्रेलियन सहकारी किथ डायर याने मला पर्थ आणि फ्रिमँटलचा बराचसा भाग त्याच्या गाडीतून फिरवून दाखवला. धन्यवाद किथ !

प्रचि १ :
फ्रिमँटलकडे जाताना...

प्रचि २

प्रचि ३
फ्रिमँटल : हार्बर कम यॉटींग क्लब

प्रचि ३ - अ Wink

प्रचि ४

प्रचि ५
द फिशरमॅन

प्रचि ६
फ्रिमँटलची खाऊ गल्ली

प्रचि ७
थोडासा खाऊ पण...
हवे असल्यास इथल्या फिशमार्केट मधुन आपल्याला हवे ते विकत घेवून आपण तिथल्या कुकला ते बनवायला देवु शकतो.

प्रचि ८
ताजे (जिवंत) खाद्य पण उपलब्ध असते..

प्रचि ९
हा सागरी किनारा....

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२
काश, मेरा भी एक ऐसा घरोंदा होता.......

प्रचि १३
पर्थ

प्रचि १४
पर्थ सीबीडी

प्रचि १५
संथ वाहते.... स्वॅनमाई !

प्रचि १६
संध्याकाळी साडे पाच - सहाच्या दरम्यान किंग्स पार्कच्या टेकडीवरून टिपलेला पर्थ सी.बी.डी. आणि स्वॅन नदीचा देखावा

प्रचि १७
पंढरी

प्रचि १८
मनसोक्त उंडगून झाल्यावर फ्रिमँटलच्या सुप्रसिद्ध " 'गिनो'ज कॅफे" मधली मस्त आणि कडक कॉफी प्यायला थांबलेलं आमचं त्रिकुट...
# विंन्स्टन कोह (डावीकडचा) आणि किथ डायर (उजवीकडचा)
विंन्स्टन (जो चायनीज आहे) सिंगापूरहून आला होता, तर किथ (ऑस्ट्रेलियन) मेलबर्नचा. ही सफर किथच्या सौजन्याने होती. त्याच्या गाडीने त्याच्याच खर्चाने Wink धन्स अ लॉट किथ !

प्रचि १९
आणि अर्थातच अस्मादिक...

प्रचि २०
शेवटचा आणि सगळ्यात त्रासदायक फोटो !
माझ्या हॉटेलमधील फ्रीजचा. एवढं काही समोर दिसतय पण उपभोगता येत नाही अशी वाईट अवस्था होती. माझ्या बॉसने काय हवे ते कर खर्च अ‍ॅप्रुव्ह करायची जबाबदारी माझी असे सांगितले होते. पण आमच्या डॉक्टरांनी परवानगी दिलेली नसल्याने सगळाच तोंड दाबुन बुक्क्यांचा मार होता.

विशाल...

गुलमोहर: 

मस्त रे, मासे छान आहेत!!!
प्रचि १९ मधे कपात कॉफी दिसेल ही दक्षता घेतली आहेस त्यामुळे प्रचि २० खालची टीप खरी मानायला हरकत नाही Wink

छान आहेत फोटो..
वॅका नाही का पाहिलं ?
पर्थला स्वान नदीच्या काठावर एक टेकडी आहे... तिथे एक सुंदर पार्क आहे.. ते पाहिलं का?

धन्यवाद पराग !
वाका स्टेडियम त्यादिवशी दुरुस्तीसाठी बंद होतं म्हणुन आत नाही जाता आलं. तो प्रचि क्र. १७ चा जो फोटो आहे तो वाकाच्या बॅरी शेफर्ड प्रवेशद्वाराचाच आहे.
प्रचि क्र. १६ हे स्वॅन जवळील टेकडीवर असलेल्या किंग्स पार्कमधून टिपलेलं आहे. Happy

मस्त फोटो, ५ व्या फोटोतील फिशर मॅन पाहून, प्लाझा जवळील, कॉमन मॅन ( मुंबईकरांचा) पुतळा आठवला

अमोल

प्रचि क्र. १६ हे स्वॅन जवळील टेकडीवर असलेल्या किंग्स पार्कमधून टिपलेलं आहे >>> अच्छा त्याचं नाव किंग्ज पार्कच आहे का? मला आठवत नव्हतं.. Happy

Pages