खरतर भरपुर विचार करुन काही न सुचल्याने इथे लिहितेय.
गेले काही आठवडे लेक खुप जास्त चिडचिड करतेय. आधी आम्हाला वाटलं कि असेच मुलांचा स्वभाव बदलतो किंवा मधे मधे एक एक फेजेस येतात तशी हि नविन फेज असेल. म्हणुन दुर्लक्ष केले.
पण अगदी मला मारायला येणे टोचणे असे प्रकारही अलिकडे सुरु झालेत. हे सहसा मुलं दुसर्या वर्षी करतात पण तीने हे कधीच केलं नव्हतं. त्याशिवाय ती तीच्या वयापेक्षा जास्त सेन्सिटिव्ह आणि मॅचुअर आहे असे नेहेमीच आम्हाला वाटते दिसते. मग हा बदल का ते लक्षात येत नव्हते.
शिवाय आता तीला जपानी डेकेअर मधे जायला आता विषेश आवडत नाही , कंटाळा येतो म्हणते. इंटरनॅशनल शाळा आठवड्यातुन दोन दिवस असते ती मात्र खुप आवडते. खरतर शाळेत तिला इंग्रजी बोलताही येत नाही. नुसती खेळते तिथे. तीला ते जड जाऊ नये म्हणुनच आम्ही दोन दिवसांच्या शाळेचा पर्याय निवडला. म्हणजे आधीच रुळलेल्या जपानी डे केअर पासुन सुद्धा तीला तुटल्यासारखे होणार नाही. डेकेअर मधे दुपारचे झोपायलाही मिळते, आराम असतो. एरवि खरच खुप चांगल्या गोष्टी चालु असतात इथे. शिक्षकही प्रेमळ आहेत.
पण मागच्या आठवड्यात बोलताना तीने सांगितले की जपानी डे केअर मधला अमुक एक 'अ' मुलगा आणि त्याचा 'ब' मित्र ( दोघे जपानी) दोघे तीच्याशी खेळत नाहीत कारण ती ब्राऊन आहे.
मग तीला विचारलं कि इतर कोण खेळतं? तर ती म्हणाली तिच्या वयाचे(वर्गातले) कोणीच नाही. लहान वर्गातले खेळतात. एरवीही हा 'अ' तीला आवडायचा नाही कारण फार गुंडगिरी करायचा, सगळ्यांना मारायचा/ मारतो. लहान मुलं इतकी क्रुर का होतात देव जाणे.
सध्यातर ती इतकी चिडते कि बोलायची सोय नाही. आणि गेले एक दोन आठवडे आम्हीही चुकीचे वागलो. तीने उगीच कारण नसताना मारलं तर आम्ही तीला कान पकडण्याची शिक्षा दोन तीन वेळा केली. मला माहितेय की हे पुर्ण चुकीचे होते आणि त्याचे काहि जस्टिफिकेशन करायचे नाहीये. ती आमची चुक होतीच. पण हिच वर सांगितलेली गोष्ट तीने दोन तीन वेळा सांगितली. तीच्या वागण्यातील बदलाचा आणि या डेकेअरमधील मुलांच्या वागण्याचा संबंध असावा असे मला वाटायला लागले आहे. असेल का? असे काही अनुभव तुम्हाला कोणालाही आलेले आहेत का? त्यावेळी काय करायचे, मुलांना कसे वागवायचे?
माझ्या समोर असलेले पर्याय
#१ डेकेअर बंद करुन पुर्ण वेळ ८ ते ४ शाळेत पाठवणे. ( प्ल्स साधारण १ तास दोन्ही वेळेच्या प्रवासाचा) या प्रकारात दुसरी काही सोय झाली नाही तर कदाचित मला नोकरी सोडावी लागेल. पण त्याला काही हरकत नाहीये माझी. पण रोज इतका वेळ शाळेत जाऊन ती दमेल. शिवाय शाळेत ती फारसे बोलत नाही त्यामुळे कंटाळेल की इंग्रजी बोलायला शिकेल?
#२ डेकेअर तसेच चालु ठेवुन तीला या प्रकाराला सामोरे जाऊ द्यायचे. पण ती इतकी सेन्सिटिव्ह आहे कि तीची सगळी एनर्जी यातच जाते. शिवाय फिजीकलीही ती स्ट्राँग नाहीये फारशी की कोणाचा मार खाऊन त्याला उत्तर देईल.
#३ तुम्हाला सुचत असेल तर अजुन काही वेगळा उपाय. .
वर्षू अगदी अगदी. १) जपानवर
वर्षू अगदी अगदी.
१) जपानवर कधीच कोणीही कॉलोनाइज केलेले नाही त्यामुळे त्यांचे कल्चर अतिशय एकसंध व वेगळे टिकले आहे. सरमिसळ झाली आहे ती २० - २१ व्या शतकातच. पण म्हणून आपले पिल्लू हिरमुसले पाहिजे असे नाही. एक ऑल कलर्स आर ब्युटिफूल असे वर्क शॉप मुलांसाठी घेता येइल का त्यात सर्व वर्णाचे व वंशाचे मोठे शूर लोक व स्त्रीया यांची माहिती पोर सुलभ करून त्यांना द्यायची.
जसे ओबामा/ नेल्सन मंडेला , गांधी, स्वीडिश /नॉर्वेजिअन फ्लॅक्सन हेअर गोरे निळ्या डोळ्याचे योद्धे,
रशिअन थोर लोक - नेते पुरुष/स्त्रीया, चीन मधील कर्तुत्ववान लोक इत्यादी. जगाचा मॅप आणून ते ते लोक
त्यांचे फोटो तिथे पिनप करता येतील मुलांना. किंवा पर्फॉर्मर्स, गायक कलाकार, कार्टून कॅरेक्टर्स, प्रत्येक वर्णाचे रंगाचे घेओन त्या मुलांची फॅन्सीड्रेस स्पर्धा घेता येइल. व पाच वाक्ये माहिती सांगायची. हॅरी पॉटर,
बार्ट सिम्सन, शिन्चान, पोकाहोंटास इत्यादी. त्या पार्कात इन्फॉर्मल इवेंट करता येइल.
चांगली चर्चा चालली आहे. मला
चांगली चर्चा चालली आहे.
मला एक मुद्दा मांडावासा वाटतो, कि लहान मूलांच्या मनात हा विचार नेमका येतो कुठून ?
घरात तसे बोलतात का ? लहान मूलांच्या पुस्तकात / टिव्ही शो मधे तसे काही सूचवलेले असते का ?
त्यांचे विश्व ते केवढेसे ? त्यात असले विचार येतात कूठून ?
आपण सगळीकडे आफ्रिकेतील वांशिक दंगली बद्दल वाचत असतो. पण पुर्व आफ्रिकेत परिस्थिती, निदान मूलांच्या बाबतीत वेगळी आहे. या भागातील रम्य निसर्गामूळे इथे अनेक युरोपीयन लोक पहिल्यापासून स्थानिक झालेत. तसेच भारतीय वंशाचे पण अनेक लोक स्थायिक झालेत. पूर्वी असणार्या अपुर्या साधनांमूळे ते लोक मायदेशी कधी गेलेच नाहीत आणि मग त्यांनी स्थानिक जोडीदार निवडले. त्यांच्या मूलांनीदेखील तेच केले. त्यामूळे आताची जी शहरी मूले आहेत, त्यांचा वंश सांगणे कठीण आहे.
त्यांच्या शाळा एकत्रच असतात, शिवाय वसाहती देखील एकत्रच, त्यामूळे मूलांना एकत्र वावरावे आणि खेळावेच लागते. आणि मला हे बघून खुप आनंद होतो, ती सर्व मूले आनंदाने एकत्र खेळत असतात. भाषेचीही अडचण नसते. त्यांच्या मनात हे विष अजूनतरी नाही.
धर्म, जात यावरून निर्माण
धर्म, जात यावरून निर्माण झालेले प्रॉब्लेम्स आणि व्हिज्युअली सेपर्सेशन दिसत असल्याने लहान वयात निर्माण होणारा प्रॉब्लेम हे मिक्स नकोत व्हायला.
मोठ्यांना जसे बर्ण रंग द्वेष
मोठ्यांना जसे बर्ण रंग द्वेष असतात तसे लहान मुलांचे बहुधा नसतात. ते रंगभेद असतात किंवा पॉइटिंग आउट ऑड अशा प्रकारचे असतात. या विषयी नीट चर्चा वगरे न झाल्यास मोठेपणी ते द्वेषात रुपांतरित होते. त्याच वेळी अजुबाजुला लोक काय बघतात बोलतात हे हि परिणाम करते असे मला वाटते.
अमा छान उपक्रम होइल. प्रयत्न करते करायचा.
सांजसंध्या हो
सांजसंध्या हो
मुळात इतक्या लहान मुलांना
मुळात इतक्या लहान मुलांना रेसिझम वगैरे जास्त कळत नसले तरी पॅटर्न मधील ऑड गोष्ट कळते. ह्यावयातील मुले नेहमी व्हाइट ( व्हॅनिला) आइस्क्रीम मागतात कारण ते सर्वात सोपे व सगळीकडे असते. हळू हळू इतर कलर्स कळतात. व फ्लेवर्स समजतात. आइस्क्रीमचे वर्कशॉप तर फारच हिट होइल. सर्व फ्लेवर्स सर्व्ह करायचे मुलांना व हळू हळू कंडिशन करायचे कि चॉकोलेट फ्लेवर आवड्तो ना? स्ट्रॉबेरी तर पिंक आहे,
असे.
चित्रकलेच्या माध्यमातूनही हे करता येइल किंवा पेंट बॉल सारख्या खेळातून. / केक बेकिंग मधून.
जपानी राइस केक, आपले गुलाब जाम, चॉकोलेट पेस्ट्री, असे सर्व करून.
जास्त जाड किंवा उंच किंवा बुटक्या /अपंग मुलांनाही हा त्रास सहन करावा लागतो कारण कुठल्याही पॅटर्न मध्ये ती फिट होत नाहीत.
हम्म.. लेकीशी सहज गप्पा
हम्म.. लेकीशी सहज गप्पा मारल्या.
तिने सांगितले की सगळे खेळत नाहीत माझ्याशी.. पण का ग असं? ह्या प्रश्णाला तिनेच उत्तर दिले की मी काय सांगते ते कळतच नाही त्यांना.. टिचरला पण.. तिला आतापर्यंत मराठी/हिंदीची सवय आहे/होती.. इंग्रजी संवादाचा अभाव आहे.. म्हणजे ती एकाद्या गोष्टीतलं वाक्य म्हणते.. पण पूर्ण स्वतःच वाक्य तिला येत नाही.
त्यामुळे आम्ही आपापसात इंग्रजी बोलतोय थोडे थोडे सध्या.. तिच्या कानावरून जाऊन ही भाषा तिला येईल.. असे वाटते.. अॅक्सेंट्चा प्रश्ण राहिल.. पण ती स्वतः पिक अप करेल असे वाटते.
आय होप आमचे हे सोल्युशन योग्य आहे.
Pages