ह्या उन्हाळ्यात म्हैसुरच्या नजीकच्या जंगलात भ्रमंती केली. बांदीपुर,नागरहोळे आणि कबिनीच्या जंगलातील हत्ती, वाघ, गवा हे आकर्षण होतं शिवाय आता वीरप्पन नसल्यामुळे त्याच्या तावडीतुन सुटलेले सुळेवाले हत्ती दिसतीलच ही आशा होती.
म्हैसुरहून बांदीपुर, नागरहोळे आणि कबिनी ही तिन्ही ठिकाणं फारशी लांब नसली तरी वेगवेगळ्या दिशेला आहेत, तेव्हा प्रत्येक वेळेस म्हैसुरला भोज्जा करुनच जावे लागणार होते. तेव्हा मध्ये म्हैसुरलाच मुक्काम करुन म्हैसुरही पाहून घ्यायचे ठरवले. लगेच त्यादॄष्टीने आंतरजालावर शोधाशोध चालू केली. त्यात रंगनथिट्टु पक्षी अभयारण्याबद्दल माहिती मिळाली.
रंगनथिट्टु हे पक्षी अभयारण्य कावेरी नदीच्या काठाशी आहे. म्हैसुरपासुन साधारण २० किमी अंतरावर असलेलं हे अभयारण्य.
कावेरी नदीवर ई.स. १७०० साली धरण बांधलं गेलं,त्यामुळे नदीत छोटी छोटी बेटं तयार झाली. ह्या बेटाच्या सभोवताली असलेल्या झांडावर आणि बेटांवर सथानिक आणि स्थलांतरीत असे दोन्ही प्रकारचे पक्षी नजरेस पडतात. सुप्रसिद्ध पक्षीतज्ञ डॉ. सलीम अली यांच्या अथक प्रयत्नांमुळे म्हैसुरच्या राजाने १९४० साली ह्या जागेला अभयारण्य म्हणुन मान्यता दिली.
ह्या अभयारण्याचे वैशिष्ट्य म्ह्यणजे पक्षी निरीक्षणासाठी बोटीत बसुन ह्या बेटांभोवती फेरी मारता येते.
१) OpenBilled Stork
2) Painted Stork
3) Pied Kingfisher
4) Night Heron
5) WhiteIbis
6) Thickknee
7) Cormorant
8) Pelican
9) Cattle Egret
10) ????? कॄपया जाणकारांनी नाव सांगावे.
या ठिकाणी म्हैसुर दर्शनाच्या निमित्ताने कोणतीही ट्रॅव्हल कंपनी वाट वाकडी करुन येत नाही, त्यामुळे फक्त स्थानिकांच्या व्यतिरिक्त या जागी फारशी वर्दळ नसते. गाईड कम नावाड्याला विनंती करुन सगळ्या बेटांभोवती एक मोठी आणि सावकाश फेरी सहज मारता येते.
छान प्रचि! शेवटचा फार आवडला
छान प्रचि! शेवटचा फार आवडला बाकी.
तोषा, मस्तच फोटोस !
तोषा, मस्तच फोटोस !
सह्हीच प्रचि रे बंधो
सह्हीच प्रचि रे बंधो
जबरीच! अर्थातच शेवटचा
जबरीच! अर्थातच शेवटचा सुपरडुपर!
शेवटचा खासच.. नि तो नाईट
शेवटचा खासच.. नि तो नाईट हेरॉन पण सही दिसतोय
वा! खासच!!
वा! खासच!!
सर्वच फोटो अतिशय सुंदर!
सर्वच फोटो अतिशय सुंदर!
जबरदस्त फोटो. एक मस्त आणि
जबरदस्त फोटो. एक मस्त आणि नावजलेलं पक्षी अभयारण्य.
शेवटचा प्रचिमधे मला हेरॉन वाटतो आहे.
मस्तच
मस्तच
आशुतोष, शेवटचे दोन फोटो लै
आशुतोष, शेवटचे दोन फोटो लै भारी आहेत.
मस्तच!!!
मस्तच!!!
मस्त ! "काल स्टारमाझा"वर
मस्त !
"काल स्टारमाझा"वर बातमी व व्हिडिओ क्लिप दाखवत होते की म्हैसूरमध्ये ३ हत्ती पिसाळून सगळ्यांवर हल्ला करताहेत. अक्षरशः वाटेत येईल ते तुडवत होते. तिथलं जंगलही कमी झालं असणार म्हणून ते बाहेर पडले असतील.
Pages