रंगनथिट्टु पक्षी अभयारण्य, म्हैसुर

Submitted by आशुतोष०७११ on 17 June, 2011 - 16:35

ह्या उन्हाळ्यात म्हैसुरच्या नजीकच्या जंगलात भ्रमंती केली. बांदीपुर,नागरहोळे आणि कबिनीच्या जंगलातील हत्ती, वाघ, गवा हे आकर्षण होतं शिवाय आता वीरप्पन नसल्यामुळे त्याच्या तावडीतुन सुटलेले सुळेवाले हत्ती दिसतीलच ही आशा होती. Happy

म्हैसुरहून बांदीपुर, नागरहोळे आणि कबिनी ही तिन्ही ठिकाणं फारशी लांब नसली तरी वेगवेगळ्या दिशेला आहेत, तेव्हा प्रत्येक वेळेस म्हैसुरला भोज्जा करुनच जावे लागणार होते. तेव्हा मध्ये म्हैसुरलाच मुक्काम करुन म्हैसुरही पाहून घ्यायचे ठरवले. लगेच त्यादॄष्टीने आंतरजालावर शोधाशोध चालू केली. त्यात रंगनथिट्टु पक्षी अभयारण्याबद्दल माहिती मिळाली.

रंगनथिट्टु हे पक्षी अभयारण्य कावेरी नदीच्या काठाशी आहे. म्हैसुरपासुन साधारण २० किमी अंतरावर असलेलं हे अभयारण्य.

IMG_0613_General 3.JPGIMG_0614_General 4.JPGIMG_0641_General 5.JPGIMG_0708_General 2.JPGIMG_0710_General1.JPG

कावेरी नदीवर ई.स. १७०० साली धरण बांधलं गेलं,त्यामुळे नदीत छोटी छोटी बेटं तयार झाली. ह्या बेटाच्या सभोवताली असलेल्या झांडावर आणि बेटांवर सथानिक आणि स्थलांतरीत असे दोन्ही प्रकारचे पक्षी नजरेस पडतात. सुप्रसिद्ध पक्षीतज्ञ डॉ. सलीम अली यांच्या अथक प्रयत्नांमुळे म्हैसुरच्या राजाने १९४० साली ह्या जागेला अभयारण्य म्हणुन मान्यता दिली.

ह्या अभयारण्याचे वैशिष्ट्य म्ह्यणजे पक्षी निरीक्षणासाठी बोटीत बसुन ह्या बेटांभोवती फेरी मारता येते.

१) OpenBilled Stork
IMG_0620_Openbilled 1.JPGIMG_0621_Openbilled 2.JPGIMG_0623_Openbilled 3.JPGIMG_0636_Openbilled 4.JPG

2) Painted Stork
IMG_0628_Paintedstork 1.JPGIMG_0711_Paintedstork 2.JPGIMG_0634_Paintedstork 3.JPGIMG_0441_Painted stork 4.JPG

3) Pied Kingfisher
IMG_0644_Pied kingfisher 1.JPG

4) Night Heron
IMG_0651_Night Heron.JPG

5) WhiteIbis
IMG_0702_White Ibis 1.JPGIMG_0653_White Ibis 2.JPG

6) Thickknee
IMG_0670_Thickknee.JPGIMG_0681_Thickknee 2.JPG

7) Cormorant
IMG_0699_Cormorant.JPG

8) Pelican
IMG_0652_Pelican.JPG

9) Cattle Egret
IMG_0657_Cattle egrets.JPGIMG_0659_Cattle egrets 2.JPG

10) ????? कॄपया जाणकारांनी नाव सांगावे.
IMG_0683_Stork 1.JPGIMG_0686_Stork 2.JPG

या ठिकाणी म्हैसुर दर्शनाच्या निमित्ताने कोणतीही ट्रॅव्हल कंपनी वाट वाकडी करुन येत नाही, त्यामुळे फक्त स्थानिकांच्या व्यतिरिक्त या जागी फारशी वर्दळ नसते. गाईड कम नावाड्याला विनंती करुन सगळ्या बेटांभोवती एक मोठी आणि सावकाश फेरी सहज मारता येते.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

फार वर्षांपूर्वीच्या आठवणी जाग्या झाल्या.. Happy पक्षी मात्र सेम पोझ देत असतात..
पण शेवटचा एक्दम हटके.. कार्यक्रमाच्या शेवटी डांसर्स जसे ऑडिअंसना कमरेत वाकून अभिवादन करतात तशी पोझ देतोय चक्क Happy

मस्तच Happy

मस्त फोटो व वर्णन. सर्व पक्षीगण फार गोड दिसत आहेत. शेवट्चा तर अगदी ऑस्कर स्वीकारून आभार देणार असे वाट्त आहे.

ह्या ठिकाणी खरी जाण्याची वेळ असते नोव्हे. ते मार्च मधे मी गेले होते जानेवारी मधे तेव्हा लाखानी पक्षी आले होते.

मस्त फोटो.
<<कार्यक्रमाच्या शेवटी डांसर्स जसे ऑडिअंसना कमरेत वाकून अभिवादन करतात तशी पोझ देतोय चक्क >>>१००० मोदक.

Pages